ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: May 16, 2018

संमिश्र कौल

कर्नाटकच्या जनतेने अखेर आपला सत्तांतरांचा इतिहास अनुसरत राज्यातील कॉंग्रेस सरकारला पाच वर्षांनी पायउतार करीत भाजपला सत्ता स्थापनेची संधी पुन्हा एकवार बहाल केलेली आहे. मात्र हा निकाल ‘कॉंग्रेसमुक्त भारता’ला दिलेला कौल म्हणता येणार नाही. मतदारांचा कौल संमिश्र स्वरुपाचा आहे. विविध इलाख्यांचे जे भाग जोडून घेऊन कर्नाटक राज्याची निर्मिती झाली, त्या भागांनी आपापल्या प्राधान्यांनुसार स्वतःचा कौल दिलेला आहे. उदाहरणार्थ, भारतीय जनता पक्षाला ... Read More »

औरंगाबाद दंगलीचा बोध

ऍड. असीम सरोदे औरंगाबादमध्ये नुकत्याच झालेल्या दंगलीमुळे पुन्हा एकदा सामाजिक एकोप्यावर प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे. विविध जातींचे, धर्मांचे लोक तेथे एकोप्याने राहात असताना कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणारे कोणते समाजघटक अचानक निर्माण होत आहेत आणि समाजात ङ्गूट पाडणारे हे समाजकंटक सातत्याने यशस्वी का होताना दिसताहेत असे प्रश्‍न या घटनेच्या निमित्ताने निर्माण झाले आहेत. मराठवाड्याचे प्रवेशद्वार आणि अलीकडील काळात औद्योगिक क्षेत्रासाठी पसंती ... Read More »

कर्नाटकात सत्तेचा चेंडू राज्यपालांच्या रिंगणात

>> भाजप सर्वांत मोठा पक्ष >> भाजप तसेच कॉंग्रेस-जेडीएस आघाडीचा सत्तास्थापनेचा दावा पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीची उपांत्य फेरी मानल्या जाणार्‍या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. २२२ पैकी १०४ जागा पटकावीत सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला बहुमताने हुलकावणी दिली आहे. सत्ताधारी कॉंग्रेसला ७८ जागा मिळाल्या असून जनता दल (एस)ने ३८ जागी विजय ... Read More »

प्रमोद मुतालिकांवरील प्रवेश बंदीत पुन्हा वाढ

उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकार्‍यांनी श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालीक यांच्या प्रवेशावरील बंदी आणखीन ६० दिवसांनी वाढविली आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांनी मागील काही वर्षांपासून श्रीराम सेनेचे प्रमुख मुतालीक यांच्या प्रवेशावर बंदी घातलेली आहे. दर दोन महिन्यांनी या बंदीमध्ये वाढ केली जात आहे. ही प्रवेशबंदी १५ मे २०१८ पासून लागू होणार आहे, असे आदेशात म्हटले आहे. Read More »

वाराणसीत उड्डाणपूल कोसळून १८ ठार

येथे बांधकाम सुरू असलेल्या उड्डाणपुलाचा काही भाग कोसळून झालेल्या अपघातामध्ये १८ जण ठार झाले असून सुमारे ५० जण ढिगार्‍याखाली दबले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ढिगार्‍याखाली दबलेल्यांची संख्या पाहता मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेनंतर शोक व्यक्त केला असून घटनास्थळी तातडीने मदतकार्य सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. सुमारे दोन वर्षांपासून या पुलाचे काम ... Read More »

सुनील गर्ग लाचप्रकरण सीबीआयकडे सोपविणार

सरकारने माजी पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांच्या विरोधातील कथित लाच प्रकरण सीबीआयकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षता खात्याने केंद्रीय गृहमंत्रालयाला तसे पत्र पाठवून लाच प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. दक्षता खाते या लाच प्रकरणाच्या तपासासाठी गंभीर नाही. त्यामुळे लाच प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द करण्यासाठी पत्र पाठविण्यात आले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने या तपास प्रकरणी अद्याप ... Read More »

ग्रेटर पीडीएतून गावे वगळण्यावर आजच्या बैठकीत निर्णय शक्य

नगरनियोजन मंडळाची बैठक बुधवार १६ मे रोजी घेण्यात येणार आहे. या बैठकीत ग्रेटर पणजी पीडीएतून सांताक्रुझ आणि सांतआंद्रे या दोन्ही मतदारसंघांतील गावे वगळण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. नगर नियोजन मंडळाच्या बैठकीत पीडीएमध्ये गावांच्या समावेशाच्या विषयावर चर्चा केली जाणार आहे. नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी सांतआंद्रे मतदारसंघातील पंचायत क्षेत्रातील संबंधितांच्या घेतलेल्या बैठकीत पीडीएतून गावे वगळण्यावर सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्‍वासन दिले ... Read More »

कोलकाता नाईट रायडर्सची राजस्थान रॉयल्सवर मात

कुलदीप यादवच्या भेदक गोलंदाजीनंतर कर्णधार दिनेश कार्तिक व ख्रिस लिन यांच्या उपयुक्त फलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सवर ६ गड्यांनी मात करीत आयपीएलच्या चौथ्या पर्वात गुणतक्त्यात तिसर्‍या स्थानावर पोहोचत १४ गुणांसह आपले बाद फेरीतील प्रवेशाचे आव्हान जिवंत राखले. पराभर राजस्थान रॉयल्स १२ गुणांसह चौथ्या स्थानी आहे. या दोन्ही संघांचे अजून प्रत्येकी १ सामना बाकी आहे. कोलकाताला आता बाद फेरीतील ... Read More »

हीनाचा सुवर्णवेध; निवेताला कांस्य

भारतीय नेमबाज हीना सिंधूने जर्मनीच्या हॅन्नोवर (आयएससीएच) आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत १० मी. एअर पिस्तोल प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली. तर भारताच्या पी. श्री. निवेताला कांस्य पदक प्राप्त झाले. हीना आणि रौप्य पदकप्राप्त फ्रान्सच्या मथिल्डे लामोल्ले यांच्यात २३९.८ अशी बरोबरी झाली होती. परंतु शूटआउटमध्ये हीनाने बाजी मारताना ९.४ वि. ८.७ अशी सरस कामगिरी करीत सुवर्ण पदक प्राप्त केले. भारताच्या पी. श्री. ... Read More »

शशांक मनोहर पुन्हा आयसीसी अध्यक्षपदी बिनविरोध

भारताच्या शशांक मनोहर यांची पुन्हा एकदा आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. आणखी पुढील दोन वर्षे ते या पदावर कार्यरत राहतील. यापूर्वी २०१६ साली शशांक यांची अध्यक्षपदावर बिनविरोध निवड करण्यात आली होती. यंदाही या पदासाठी केवळ शशांक मनोहर यांचे एकमेव नाव आले होते आणि ऑडिट समितीचे अध्यक्ष एडवर्ड क्विनलॅन यांनी मनोहर ... Read More »