ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: May 15, 2018

कर्नाटकचा कौल

सार्‍या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभेचा ऐतिहासिक निकाल आज लागणार आहे. आजचा निकाल ऐतिहासिक असेल कारण या निवडणुकीतून शतकोत्तर वाटचाल करणार्‍या या देशातील सर्वांत जुन्याजाणत्या कॉंग्रेस पक्षाचे भवितव्य मुक्रर होणार आहे. कॉंग्रेस पक्षाची चाललेली घसरण थांबवणारा आणि नवी ऊर्जा देणारा निकाल कर्नाटक देणार का की, भारतीय जनता पक्षाची दक्षिण दिग्विजयाची आजवर मतदारांनी रोखून धरलेली वाट कर्नाटकची जनता पुन्हा मोकळी ... Read More »

खाणींच्या लिलावाचा २०२० सामना व सरकार

विजय कुमार लिलावाच्या दृष्टीने आजवर झालेला विलंब पाहता आणि ज्यांचा लिलाव झालेला आहे ती खाण लीजेस सुरू होण्यातील विलंब पाहता, असे दिसते की सरकारे जणू २०२० चा सामनाच खेळत आहेत… सध्या क्रिकेटचा सर्वत्र हंगाम आहे. त्यामुळे सगळे काही क्रिकेटच्या परिभाषेत मांडणे अधिक सयुक्तिक ठरेल. दुर्दैवाने सरकारला (राज्य आणि केंद्र) जाणीव नाही की ही २० – २० मॅच आहे. अक्षरशः! सरकारकडून ... Read More »

कर्नाटकचा आज फैसला

पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीची उपांत्य फेरी मानल्या जाणार्‍या कर्नाटक विधानसभेच्या २२४ पैकी २२२ जागांचा निकाल आज जाहिर होणार आहे. एक्झिट पोलमध्ये त्रिशंकू विधानसभेची शक्यता वर्तविली असून जेडीएस किंगमेकर ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असल्याने कॉंग्रेस गड राखतो की भाजप मुसंडी मारतो याकडे तमाम देशवासियांच्या नजरा लागून आहेत. आज सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होणार असून तासाभरात निकाल हाती ... Read More »

विरोधकांच्या मतदारसंघांतील १८ कोटींची कामे मार्गी लागणार

सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी विरोधी कॉंग्रेस पक्षाच्या आमदारांची काल बैठक घेऊन कॉंग्रेस आमदारांच्या मतदारसंघांत १८ कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लावण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना संबधितांना केली. आमदारांचे विकास प्रकल्पाच्या प्रस्तावाचे आराखडे तयार करून २५ मे २०१८ पर्यंत सादर करण्याचा आदेश बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांना देण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री ढवळीकर यांनी विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांच्या विनंतीवरून ... Read More »

जीसीईटीचा निकाल जाहिर

राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाने घेतलेल्या गोवा समान प्रवेश परीक्षा २०१८ चा (जीसीईटी) निकाल काल जाहिर करण्यात आला असून भौतीकशास्त्र विषयात सहन शैलेश कामत (६८ गुण), रसायनशास्त्र विषयात अभय रवींद्र कुडचडकर (७० गुण) आणि गणित विषयात अर्श महेश कोरगावकर (७१ गुण) यांनी अनुक्रमे प्रथम क्रमांक पटकाविला आहे. शिक्षण सचिव दौलतराव हवालदार यांनी जीसीईटीचा निकाल जाहिर केला. यावेळी जीसीईटी २०१८ चे चेअरमन डॉ. ... Read More »

भाजपकडून म्हादई प्रश्‍नाचा राजकीय स्वार्थासाठी वापर

>> कॉंग्रेसचा आरोप भाजपने म्हादई प्रश्‍न खासगी मालमत्ता केला आहे. भाजपने म्हादईचा विषय राजकीय स्वार्थासाठी वापरला आहे. म्हादईचा विषय घेऊन जनतेच्या भावनांशी भाजप खेळत असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रवक्ते सिद्धनाथ बुयांव यांनी पत्रकार परिषदेत काल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हादईच्या प्रश्‍नावर कर्नाटक निवडणुकीत वक्तव्ये केली होती. या पार्श्‍वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा भाजपच्या ... Read More »

बंगलोरचा पंजाबवर १० गड्यांनी विजय

>> चेन्नई ‘प्ले ऑफ’मध्ये, मुंबईच्या शक्यता वाढल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने काल सोमवारी झालेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या ११व्या पर्वातील ४८व्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबचा १० गडी व ७१ चेंडू राखून पराभव केला. पंजाबचा डाव ८८ धावांत गुंडाळल्यानंतर कोहली-पार्थिव जोडीने तुफानी फटकेबाजी करत ८.१ षटकांत संघाला विजयी केले. गडी व चेंडूच्या दृष्टीने यंदाच्या स्पर्धेतील हा सर्वांत मोठा विजय ठरला. पंजाबच्या पराभवाचा फायदा ... Read More »

एमसीसी अकादमीला सरदेसाई अंडर-१६ क्रिकेट चषक

शुभम गजिनकरच्या दमदार नाबाद शतकाच्या जोरावर एमसीसी क्रिकेट अकादमीने अंतिम सामन्यात पणजी अरसीसीचा ५२ धावांनी पराभव करीत वास्को वॉरियर्स क्रिकेट अकादमी आयोजित सौरभ सरदेसाई स्मृती अंडर-१६ आंतर आरसीसी क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. प्रथम फलंदाजी करताना एमसीसी क्रिकेट अकादमीने ४५ षट्‌कांत ४ गडी गमावम २३८ अशी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तगात खेळताना पणजी आरसीसीचा डाव १८६ धावांवर संपुष्टात आला. संक्षिप्त धावफलक ः एमसीसी ... Read More »

शेवगा ः एक बहुपयोगी वृक्ष (मॉरिंगा ऑलिफेरा)

– वर्षा नाईक आपण आपल्या अंगणात शेवग्याचे झाड लावून त्यातील पौष्टीक घटकांचा लाभ घेऊ शकतो. हे आकर्षक पदार्थ, ताज्या स्वरूपात तसेच पानांच्या किंवा शेंगांच्या रुपात कोणत्याही वयाच्या व्यक्तीने आणि कोणत्याही ऋतुमध्ये नियमितपणे सेवन करण्याची गरज आहे. मॉरिंगा ऑलिफेरा म्हणजेच शेवगा किंवा सहजन (हिंदी) वृक्षाला आज वाढती लोकप्रियता मिळते आहे ज्यामुळे तिला ‘वृक्षांची राणी’ म्हणता येईल. गोवेकर याला राणी – म्हाशिंग म्हणतात ... Read More »

आहारातील त्रिदोष-त्रिगुण विचार

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) आहार सेवन करताना फक्त प्रोटीन्स, फॅट्‌स, कॅलरीज, व्हिटामिन्स यांचाच विचार न करता आयुर्वेदाने सांगितलेल्या व्यापक दृष्टी ध्यानात ठेवून आहाराची निवड केल्यास हा आहार स्वास्थ्यरक्षणार्थ उपयोगी येईल. आहारामध्ये त्रिदोषांचा, त्रिगुणांचा, लोकपुरुष सिद्धांताचाही विचार व्हायला पाहिजे. उत्तम आहार तोच ज्याने मनुष्य स्वस्थ राहील. शारीरिक, मानसिक, सामाजिक स्वास्थ्य म्हणजेच खर्‍या अर्थाने पूर्ण आरोग्य. उत्तम पोषण होण्यासाठी योग्य गुणकर्माचे ... Read More »