ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: May 14, 2018

दोस्त नेपाळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नेपाळ भेटीवर नुकतेच जाऊन आले. हजारो वर्षांचे सांस्कृतिक अनुबंध असलेल्या भारताच्या या शेजारी राष्ट्राशी असलेल्या संबंधांमधील सततचे चढउतार पाहता ही भेट निश्‍चितच महत्त्वाची होती आणि अत्यावश्यकही होती. या दौर्‍यावर जाण्याआधी पंतप्रधानांनी जे निवेदन प्रसृत केले होते, त्यामध्ये हे उद्दिष्ट स्पष्टपणे अधोरेखित केलेले होते. नेपाळशी ‘रीबिल्डिंग ट्रस्ट अँड गुडविल’ हा या दौर्‍याचा उद्देश असल्याचे त्यात नमूद ... Read More »

विधान परिषद निवडणुकांचे अर्थकारण

ल. त्र्यं. जोशी (नागपूर) आज विधान परिषद निवडणुकीत गुप्त मतदानाची पध्दत रुढ आहे. तेथे पक्षाच्या आदेशाला महत्व दिलेले नाही आणि आदेश पाळला की, नाही हे तपासण्याची व्यवस्थाही नाही. ती जर झाली तर निवडणूक पर्यटनाला व त्यावर होणार्‍या अमाप खर्चाला आळा बसण्याची शक्यता आहे. सन २००१ मध्ये गोव्यात असतांना एका रात्री काही वाहनचालकांची मदत घेण्याची गरज पडली. त्यांनीही तत्परतेने ती देऊ ... Read More »

खाणप्रश्‍न न्यायालयाच्या माध्यमातून सोडविणार

>> भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची ग्वाही >> शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये बूथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन गोव्यातील खाण प्रश्‍नावर न्यायालयाच्या माध्यमातून लवकरच तोडगा काढण्यात येणार आहे, अशी ग्वाही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ताळगाव येथील शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये आयोजित बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना काल दिली. आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला दोन्ही जागा मिळवून देण्यासाठी बूथ कार्यकर्त्यांनी कंबर कसली पाहिजे, ... Read More »

गोसुमंतर्फे शहांना काळे झेंडे

म्हादई प्रश्‍नी केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना गोवा सुरक्षा मंचाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध केला. या निषेधाच्या वेळी भाजपच्या काही समर्थकांनी गोसुमंच्या कार्यकर्त्यांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. तथापि, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. गोसुमंच्या कार्यकर्त्यांनी ताळगाव येथे भाजपच्या मेळाव्याच्या ठिकाणापासून काही अंतरावर मुख्य रस्त्याच्या बाजूला भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित ... Read More »

पर्यायी मुख्यमंत्र्यांसाठी कॉंग्रेसचे धरणे आंदोलन

>> राजभवनवर धडक देणार : गिरीश चोडणकर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या गोवा भेटीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस पक्षाने काल सकाळी मिरामार येथे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या समाधीजवळ धरणे आयोजित करून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत राज्यात पर्यायी मुख्यमंत्री उपलब्ध करण्याची मागणी केली. पर्यायी नेता निवडण्यासाठी राजभवनावर धडक दिली जाणार आहे, अशी माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी ... Read More »

चेन्नई ‘प्ले ऑफ’च्या दारात!

>> अंबाती रायडूचा शतकी धमाका सलामीवीर अंबाती रायडूच्या शतकी धमाक्याच्या जोरावर हैदराबादचा ८ गड्यांनी पराभव करत चेन्नई सुपर किंग्सचा संघ इंडियन प्रीमियर लीगच्या ११व्या पर्वातील ‘प्ले ऑफ’मध्ये प्रवेश करण्याच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. रायडूने आयपीएलमधील आपले पहिले शतक झळकावताना नाबाद १०० धावा केल्या. केवळ ६२ चेंडूंचा सामना करताना त्याने ७ चौकार व ७ षटकारांसह आपली खेळी सजवली. हैदराबादने दिलेले १८० ... Read More »

मुंबई संकटात

इंडियन प्रीमियर लीगच्या ११व्या पर्वातील काल रविवारी झालेल्या ४७व्या सामन्यात मुंबई इंडियन्सला राजस्थान रॉयल्सकडून ७ गडी व १२ चेंडू राखून दारुण पराभव स्वीकारावा लागला. मुंबईने विजयासाठी ठेवलेले १६९ धावांचे किरकोळ लक्ष्य राजस्थानने १८ षटकांत गाठले. जोस बटलरने ५३ चेंडूंत नाबाद ९३ धावांची तुफानी खेळी करताना यंदाच्या स्पर्धेतील आपले सलग पाचवे अर्धशतक लगावले. पराभवामुळे मुंबईला ‘प्ले ऑफ’मधील आगेकूच करण्यासाठी इतर संघांच्या ... Read More »

एफसी शिवोलीला होली क्रॉस करंडक

एफसी शिवोलीने आंबेली स्पोटर्‌‌स क्लबवर ५-१ असा विजय मिळवून २२व्या होली क्रॉस आंतरग्राम फुटबॉल स्पर्धेचे काल विजेतेपद मिळविले. होली क्रॉस स्पोटर्‌‌स क्लबने व्हडलेमळ काकोडा मैदानावर या स्पर्धेचे आयोजन केले होते. सामन्याच्या दुसर्‍या मिनिटाला आंबेलीच्या नियाल कार्दोझने सामन्यातील पिहला गोल नोंदविला. २३व्या मिनिटाला सिध्दांत शिरोडकरने शिवोलीला बरोबरी साधून दिली. २८व्या मिनिटाला सिद्धांतने स्वतःचा दुसरा गोल करत शिवोलीला २-१ अशी आघाडी मिळवून ... Read More »

केंद्र सरकारच्या गेल्या चार वर्षातील आर्थिक निर्णयांवर दृष्टिक्षेप

शशांक मो. गुळगुळे   गेल्या चार वर्षांत या सरकारच्या राजवटीत औद्योगिक मरगळच आहे. बांधकाम उद्योगात प्रचंड मंदी आहे. केंद्र सरकारचे २०२२ पर्यंत सर्वांना घरे हे धोरण असूनही बांधकाम उद्योगातील मंदी आहे तशीच आहे. आपल्या देशात कर्करोगासारखा कित्येक वर्षे पसरलेला भ्रष्टाचार चार वर्षांत शुन्यावर आणणे अशक्यप्राय गोष्ट आहे, पण केंद्र सरकारने याबाबत प्रामाणिक प्रयत्न चालू ठेवले आहेत व काही प्रमाणात भ्रष्टाचाराला, ... Read More »

केदारनाथ सिंह

माधव बोरकर केदारनाथांच्या कवितेत महानगरीय जाणिवा प्रकर्षाने व्यक्त झालेल्या दिसतात. महानगरात किड्यामुंग्यांसारखी जगणारी माणसं त्यांच्या कवितेला आशय देतात. महानगरात जगणार्‍या सामान्य माणसाला त्याची स्वतंत्र अस्मिता जपणारा चेहरा नसतो. गेल्या एका वर्षात हिंदी कवितेने चार प्रमुख कवी गमावले. चंद्रकांत देवताले, कुंवर नारायण, दूधनाथ सिंह व केदारनाथ सिंह. त्यांच्या मृत्यूमुळे हिंदी कवितेचं अपरिमित नुकसान झालं आहे आणि पर्यायाने भारतीय कवितेचं म्हटलं पाहिजे. ... Read More »