ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: May 9, 2018

पर्यटकांवर हल्ले

काश्मीरमध्ये शाळकरी मुलांच्या बसवर झालेल्या दगडफेकीची घटना ताजी असतानाच श्रीनगरहून गुलमर्गकडे निघालेल्या पर्यटकांच्या एका वाहनावर झालेल्या दगडफेकीत एक पर्यटक मृत्युमुखी पडला. काश्मीर खोर्‍यामध्ये गेली किमान आठ – दहा वर्षे हिंसाचार चालला आहे, परंतु पर्यटकांवर सहसा हल्ले होत नव्हते. जेव्हा दहशतवाद्यांनी तसे हल्ले चढवले तेव्हा स्थानिक काश्मिरी जनतेने त्या विरोधात प्रतिक्रिया व्यक्त केली होती, कारण पर्यटन हे लक्षावधी काश्मिरींसाठी रोजीरोटीचे साधन ... Read More »

अवास्तव आंतरराज्य बस तिकीट दराला चाप

ऍड. असीम सरोदे उन्हाळी सुट्‌ट्या आणि गर्दीच्या हंगामात प्रवाशंाची अडवणूक करून अवास्तव प्रवास भाडे आकारणार्‍या खासगी बस वाहतूकदारांना आता उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार चाप लावला जाणार आहे. खासगी बस वाहतूक कंपन्यांना यापुढे प्रवाशांकडून त्याच तुलनेत तिकीट दर आकारणे बंधनकारक राहील ही समाधानाची बाब आहे. या यशाचे खरे मूल्यमापन मात्र या निर्णयाची अंमलबजावणी प्रत्यक्षात होईपर्यंत करता येणार नाही़ प्रवाशांकडून अवास्तव तिकीट ... Read More »

सोमवारी अजमेर (राजस्थान) शहरात धुळीचे वादळ सुरू झाल्यानंतरचे हे दृश्य. हवामान खात्याने सोमवारी उशिरा उत्तर भारतातील अन्य राज्यांनाही अशा वादळासह पावसाचा इशारा दिला. Read More »

रेराकडे ग्राहकाकडून पहिली तक्रार दाखल

गोवा रेरा नियामक प्राधिकरणाकडे गृहखरेदीदाराकडून पहिली तक्रार दाखल करण्यात आली आहे. उत्तर गोव्यातील ग्राहकाने ही तक्रार केली असून तक्रारीच्या प्राथमिक चौकशीसाठी संबंधित बांधकाम कंपनी, व्यावसायिकाला नोटीस पाठविली जाणार आहे, अशी माहिती नगरविकास खात्याच्या संचालिका आर. मेनका यांनी दिली. केंद्र सरकारने जानेवारी २०१६ पासून मालमत्ता खरेदी करणार्‍याच्या हितरक्षणासाठी स्थावर मालमत्ता नियामक प्राधिकरणाची अंमलबजावणी सुरू केली. तसेच सर्व राज्यातील सरकारांना रेराची अंमलबजावणीची ... Read More »

पंतप्रधान मोदी फर्डे वक्ते; पण भाषणांनी पोटे भरत नाहीत

>> सोनिया गांधींचे नरेंद्र मोदींवर टीकास्त्र पंतप्रधान नरेंद्री मोदी हे उत्कृष्ट वक्ते आहेत. एखाद्या अभिनेत्याप्रमाणे ते बोलतात. मात्र त्यांच्या अशा भाषणांनी भुकेलेल्यांची पोटे भरू शकत नाहीत. त्यासाठी रोजगार आणि अन्नाची गरज असते अशा प्रतिक्रियेद्वारे कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी काल येथे पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. कर्नाटक विधानसभेसाठीच्या निवडणूक प्रचारसभेत श्रीमती गांधी बोलत होत्या. आपल्या भाषणात मोदी यांना लक्ष्य करताना ... Read More »

पंतप्रधानांनी मागविली रोजगाराची आकडेवारी

केंद्रात भाजपप्रणित सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या ४ वर्षात किती रोजगारनिर्मिती झाली याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांकडून मागविली आहे. रोजगार निर्मितीच्या विषयावरून कॉंग्रेस व अन्य विरोधी पक्ष मोदी सरकारला सातत्याने लक्ष्य करीत असून आता विविध राज्यातील तसेच २०१९च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर मोदी यांनी त्या अनुषंगाने रणनीतीचा भाग म्हणून रोजगार निर्मितीची आकडेवारी तयार करण्याचे फर्मान सुनावले आहे. ... Read More »

चोडणकरांचा सरदेसाईंवरील आरोप खोटा : गोवा फॉरवर्ड

जुने गोवे येथील चर्चसह राज्यातील सहा वारसा स्थळे खासगी संस्थांना दत्तक देण्याच्या केंद्र सरकारच्या योजनेविषयी गोवा फॉरवर्डचे नेते तथा मंत्री विजय सरदेसाई यांना माहिती असूनही त्यांनी ती जनतेपासून लपवून ठेवल्याचा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा आरोप खोटा असल्याचे गोवा फॉरवर्डचे प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. सरदेसाई यांना वरील योजनेविषयी माहिती होती असे सिध्द करणारे पुरावे सादर ... Read More »

विजय मल्ल्याला दणका

>> भारतीय बँकांचा दीड अब्ज पौंडस्‌चा दावा न्यायालयाकडून वैध भारतातील अनेक बँकांचे ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून इंग्लंडमध्ये पळालेल्या विजय मल्ल्या याला तेथील न्यायालयाने धक्का दिला आहे. भारतीय बँकांनी मल्ल्याच्या विरोधात दाखल केलेला दीड अब्ज डॉलर्स रकमेचा दावा या न्यायालयाने वैध ठरवला आहे. दरम्यान, दिल्लीतील पतियाळा न्यायालयाने कालच मल्ल्याची भारतातील मालमता गोठवण्याचा निर्णय देऊन पुढील सुनावणी ५ जुलैला ठेवली ... Read More »

मोपासाठी मनुष्यबळ निर्मितीसाठी सरकारने तातडीने पाऊल उचलावे

>> जीसीसीआयच्या माजी अध्यक्षांचे पत्र परिषदेत मत प्रस्तावित मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या रोजगारसंधीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ तयार करण्यासाठी वेळीच योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे, असे मत गोवा चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष मांगिरीष पै रायकर यांनी पत्रकार परिषदेत काल व्यक्त केले. प्रस्तावित मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उपलब्ध होणार्‍या रोजगारासाठी आवश्यक मनुष्यबळ स्थानिक पातळीवर ... Read More »

गोवा डेअरीच्या अध्यक्षपदी राजेश फळदेसाई बिनविरोध

गोवा डेअरीचे नवीन अध्यक्ष म्हणून राजेश फळदेसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदासाठी एकच अर्ज दाखल करण्यात आला होता. माजी अध्यक्ष माधव सहकारी यांच्याविरुद्ध अविश्वास संमत झाल्याने अध्यक्षपद रिक्त झाले होते. मंगळवारी सकाळी निवड प्रक्रियेवेळी सहकार खात्याचे अधिकारी सोनू गावणेकर, गोवा डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक नवसो सावंत, माजी अध्यक्ष माधव सहकारी, नरेश मळीक, राजेंद्र सावळ, असॅल्मो फुर्तादो, बाबू कोमरपंत, धनंजय देसाई, ... Read More »