ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: May 5, 2018

पुन्हा फटकार

गोव्यातील ८८ खाण लिजांचे सरकारने दुसर्‍यांदा केलेले नूतनीकरण रद्दबातल करून सर्वोच्च न्यायालयाने १५ मार्च २०१८ पर्यंत त्या खाणींवरील सर्व व्यवहार थांबविण्याचा आदेश दिलेला असूनही त्या आदेशात उत्खनन केलेल्या व शुल्क भरलेल्या खनिजाच्या वाहतुकीसंबंधी उल्लेख नसल्याचे सांगत सरकारने खाण कंपन्यांना त्याची निर्यात करण्यास जी परवानगी दिली होती, ती काल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गोवा फाऊंडेशनच्या जनहित याचिकेवरील अंतिम निवाड्यात रद्दबातल ... Read More »

सलाम सफल युद्धाभ्यासाला!

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) ‘ऑपरेशन गगन शक्ती २०१८’ हा भारतीय वायुसेनेचा मागील तीन दशकांमधला सर्वांत मोठा युद्धाभ्यास होता. माध्यमांनी याकडे ङ्गारसे लक्ष दिलेले नसले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नुकत्याच झालेल्या चीन भेटीमध्ये चीनी राष्ट्रपती शी जिनपिंगनी त्यांना दिलेली शाही वागणूक या युद्धाभ्यासाचा परिपाक होती असे म्हटले तर ते वावगे होणार नाही. १०ते २३ एप्रिल,२०१८ दरम्यान संपन्न झालेले ‘ऑपरेशन गगनशक्ती २०१८’ ... Read More »

खनिज माल वाहतुकीस मनाई

>> ४ आठवड्यात निर्णय घेण्याचा न्यायालयाचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने लीज क्षेत्राबाहेरील खनिज मालाच्या वाहतुकीच्या प्रश्‍नावर राज्य सरकारला जोरदार दणका काल दिला. राज्याच्या मुख्य सचिवांचा २१ मार्च २०१८ रोजीचा लीज क्षेत्राबाहेरील रॉयल्टी भरलेल्या खनिज माल वाहतुकीला परवानगी देणारा आदेश खंडपीठाने रद्दबातल ठरविला आहे. सरकारने येत्या ४ आठवड्यात लीज क्षेत्रातील बाहेरील खनिजाच्या मालकीबाबत निर्णय घेण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. ... Read More »

युपी, राजस्थानातील वादळात बळींची संख्या १२९ वर

उत्तर प्रदेश आणि राजस्थानासह देशाच्या इतर भागात आलेल्या वादळामुळे आतापर्यंत १२९ लोक ठार झाले आहेत. सध्या तरी वादळ ओसरलेले असले तरी आगामी ४८ तास धोक्याचे असून पुन्हा वादळी पाऊस येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पाऊस आणि वाळूचे वादळ एकत्र आल्याने इमारतींच्या भिंतीही खचल्या असून या वादळामुळे ५० कोटींचे नुकसान झाल्याचे राजस्थानच्या वीज विभागाने जाहीर केले आहे. दरम्यान, वादळ ओसरले ... Read More »

नगर नियोजन मंडळाची १६ रोजी पीडीएबाबत बैठक

नगरनियोजन मंडळाच्या १६ मे २०१८ रोजी होणार्‍या बैठकीत ग्रेटर पणजी पीडीएतून गावे वगळण्यावर चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी मार्च महिन्यात गोवा फॉरवर्डच्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ग्रेटर पणजी पीडीएतून गावे वगळण्याची घोषणा केली आहे. याबाबत अंतिम निर्णय टीसीपी मंडळाच्या बैठकीत घेतला जाणार आहे, असे स्पष्ट केले होते. परंतु, अद्यापपर्यंत गावे वगळण्याचा ... Read More »

भाजपचा १३ रोजी ताळगावात महामेळावा

>> अमित शहांची उपस्थिती भारतीय जनता पक्षाने येत्या १३ मे २०१८ रोजी संध्याकाळी ४ वाजता ताळगाव येथील शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये मतदान केंद्र कार्यकर्त्यांचा महामेळावा आयोजित केला आहे. या कार्यकर्ता मेळाव्यात राज्यातील १२ हजार कार्यकर्ते सहभागी होणार असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी पत्रकार परिषदेत काल ... Read More »

जमिनीच्या वादावरून कुर्टीत भाडेकरूवर जीवघेणा हल्ला

>> कोल्हापूरच्या पाच जणांना अटक दीपनगर कुर्टी येथे भाड्याच्या खोलीत राहणार्‍या नितीन मालेशी घोरले (४२, कोंडीगिरी-कोल्हापूर) यांच्यावर ब्लेडच्या साहाय्याने हल्ला चढवून पळून गेलेल्या ५ मल्लांना (कुस्तीपटूंना) फोंडा पोलिसांनी कुळे पोलिसांच्या साहाय्याने मोले चेकनाक्यावर वाहनासह पकडले. संतोष श्रीकांत लवाटे (२६, इचलकरंजी-कोल्हापूर), स्वप्निल सुरेश कोरावी (२५, शिरडवाड-कोल्हापूर), बाळू तुकाराम कोली (४८, तारदाळ-कोल्हापूर), विजय दिलीप घनावर (२५, इस्लामपूर-सांगली) व विक्रम आंबेराव पाटील (२३, ... Read More »

वाहतूक खात्याच्या बैठकीत समन्वय समितीची स्थापना

वाहतूक खात्याने राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुसूत्रता आणण्यासाठी वाहतूक समन्वय समिती स्थापना केली आहे. या समितीच्या शुक्रवारी घेण्यात आलेल्या पहिली बैठकीत प्रवासी बसवाहतुकीतील विविध प्रश्‍नावर विचारविनिमय करण्यात आला आहे. प्रवासी बसवाहतुकीत सुधारणेवर भर देण्यात आला आहे. बसगाड्यांचे वेळापत्रक, बेकायदा बस थांबे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी आदी विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. बसगाड्यांच्या वेळापत्रकावरून वरच्यावर भांडणे, चकमकी होण्याचे प्रकार घडतात. या ... Read More »

वारसा स्थळांबाबत चोडणकरांच्या पुराव्यांची वाट पहातोय ः तेंडुलकर

भारतीय जनता पक्ष राज्यातील सहा वारसा स्थळे खासगी संस्थांना देखभालीसाठी दत्तक देण्याबाबत अनभिज्ञ आहे. गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे नवनियुक्त अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी वारसा स्थळांबाबतच्या सत्ताधारी पक्षांवर केलेला आरोप दिशाभूल करणारा आहे. आम्ही चोडणकर यांच्याकडील पुराव्याची वाट पाहत आहोत. चोडणकर यांनी अवश्य पुरावे जाहीर करावेत, असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिले. स्थानिकांना ... Read More »

गिरीश चोडणकरनी स्वीकारला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षचा पदभार

राज्यात कॉंग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. लोकांच्या समस्या घेऊन रस्त्यावर उतरणार आहे, असे प्रतिपादन नवनियुक्त गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित स्वागत समारंभ सभेत बोलताना काल केले. कॉंग्रेस भवनामध्ये एका कार्यक्रमात मावळते प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांच्याकडे सूत्रे प्रदान केली. यावेळी गोवा प्रभारी डॉ. ए. चेल्लाकुमार, अमित देशमुख, ... Read More »