ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: May 4, 2018

लपवाछपवी का?

जागतिक वारसास्थळे खासगी कॉर्पोरेटस्‌ना दत्तक देणारी केंद्र सरकारची ‘अडॉप्ट अ हेरिटेज’ योजना त्यातील अपारदर्शकतेमुळे वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. गोव्यातील सहा वारसास्थळांना ती लागू करताना गोवा सरकारलाच नव्हे, तर केंद्रीय पुराभिलेख व पुरातत्त्व विभागाच्या स्थानिक अधिकार्‍यांनाही त्याची कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आलेली नाही हे आश्चर्यकारक आहे. राज्याचे पुराभिलेख मंत्री विजय सरदेसाई यांनी राज्य सरकारच्या अनभिज्ञतेविषयी व्यक्त केलेली नापसंती रास्त आहे. वारसास्थळांवर पाणपोई, ... Read More »

युवकांनो, स्वच्छ भारत इंटर्नशीपमध्ये सहभागी व्हा!

नरेंद्र मोदी (भारताचे पंतप्रधान) भारत सरकारच्या क्रीडा, मनुष्यबळ विकास, पेयजल विभाग या तीन-चार मंत्रालयांनी एकत्र येऊन ‘स्वच्छ भारत ग्रीष्मकालीन इंटर्नशिप २०१८’ उपक्रम सुरू केला आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, एनसीसीचे, एनएसएसचे तरुण, नेहरू युवा केंद्रातील तरुण, या सर्वांसाठी ही एक संधी आहे माझ्या प्रिय देशबांधवांनो ! नमस्कार, मागील महिन्यात ‘मन की बात’ मध्ये मी देशवासियांना विशेषतः आपल्या युवकांना फिट इंडियाचे आवाहन केले होते ... Read More »

तालुकास्तरावर समान सेवा केंद्रे

>> महसूलमंत्र्यांची माहिती, मे अखेरीस मडगावात पहिले केंद्र राज्यातील बारा तालुक्यात जनतेच्या सोयीसाठी समान सेवा केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. मे महिन्याच्या अखेरीस पहिले समान सेवा केंद्र मडगाव येथे सुरू केले जाणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री रोहन खंवटे यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. महसूल विभागाकडून ऑन लाइन पद्धतीने विविध प्रकारचे दाखले, एक चौदाचा उतारा घेणार्‍या नागरिकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार ... Read More »

‘गोंयचो आवाज’ला पुरावे सादर करण्यासाठी ११ मेपर्यंत मुदत

नगरनियोजन खात्याच्या पाच सदस्यीय तांत्रिक समितीने गोंयचो आवाज या संघटनेला प्रादेशिक आराखडा २०२१ अंतर्गत बेकायदा जमीन रूपांतर प्रकरणांची पुराव्यानिशी माहिती सादर करण्यासाठी ११ मे २०१८ पर्यत मुदत दिली आहे. मडगाव येथील लोेहिया मैदानावर २७ एप्रिल २०१८ रोजी गोंयचो आवाज या संघटनेने आयोजित सभेत बेकायदा जमीन रूपांतर प्रकरणी १४ राजकीय नेत्यांच्या नावांची घोषणा केली होती. या सभेत करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी ... Read More »

फर्मागुडीत कदंब-खाजगी बस अपघातात २९ जखमी

फर्मागुडी येथील सर्कलजवळ काल गुरूवारी दुपारी झालेल्या खासगी बस व कदंब बस यांच्यातील अपघातात एकूण २९ प्रवासी जखमी झाले. केबिनमध्ये अडकून पडलेल्या चालकांना अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांनी बाहेर काढले असून ८ जखमींना अधिक उपचारासाठी गोमेकॉत नेण्यात आले आहे. फोंडा पोलिसांनी कदंब बसचालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये श्रीकृष्ण बोरकर (कुर्टी), अलोक कुमार (कुर्टी), प्रकाश परब (दुर्भाट), चंपा गावडे ... Read More »

राज्यातील वारसा हक्क स्थळांबाबत आजगावकर, सरदेसाईंची खोटी वक्तव्ये

>> गिरीश चोडणकर यांचा आरोप राज्यातील सहा वारसा स्थळ दत्तक देण्याच्या प्रश्‍नावर पुरातत्त्व मंत्री विजय सरदेसाई आणि पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर खोटारडी वक्तव्ये करून जनतेची दिशाभूल करीत आहेत. या दोन्ही मंत्र्यांनी येत्या दोन दिवसात आपली चूक कबूल करून तमाम जनतेची माफी मागावी, अन्यथा आपणाला दोन्ही मंत्र्यांचा खोटारडेपणा चव्हाट्यावर आणवा लागेल, असा इशारा गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे नूतन प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर ... Read More »

गोवा राज्य चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

गोव्याची चित्रपटसृष्टी बर्‍यापैकी नावलौकिक मिळवत असून राज्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) सुरू झाल्यानंतर आता अनेक चित्रपट महोत्सव होत आहेत. याचे श्रेय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना जाते. चित्रपट महोत्सवामुळे गोमंतकीय निर्माते, दिग्दर्शक व कलाकारांना चित्रपट बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे, असे मत वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केले. गोवा मनोरंजन संस्थेतर्फे आयोजित ९ व्या गोवा राज्य चित्रपट महोत्सवाच्या उद्घघाटनावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ... Read More »

केकेआरकडून चेन्नईचा धुव्वा

कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमियर लीगच्या ११व्या पर्वातील काल गुरुवारी झालेल्या ३३व्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सचा ६ गडी व १४ चेंडू राखून पराभव केला. चेन्नईने विजयासाठी ठेवलेले १७८ धावांचे लक्ष्य केकेआरने १७.४ षटकांत गाठले. शुभमन गिल (नाबाद ५७) व दिनेश कार्तिक (नाबाद ४५) यांनी पाचव्या गड्यासाठी ८३ धावांची भागीदारी केली. तत्पूर्वी, कोलकाताने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिल्यानंतर चेन्नईने २० षटकांत ५ गडी ... Read More »

प्रणॉय, सायना ‘टॉप १०’मध्ये

>> दोन स्थानांच्या प्रगतीसह श्रीकांत तृतीय एच.एस. प्रणॉय व सायना नेहवाल यांनी काल गुरुवारी जाहीर झालेल्या ताज्या बीडब्ल्यूएफ क्रमवारीत ‘टॉप १०’मध्ये प्रवेश केला आहे. चीनमधील वुहान येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेती कांस्यपदकाच्या बळावर या द्वयीने ही मजल मारली आहे. प्रणॉय व नेहवाल यांनी प्रत्येकी दोन स्थानांची सुधारणा करत अनुक्रमे आठवे व दहावे स्थान प्राप्त केले आहे. प्रणॉयचे हे कारकिर्दीतील सर्वोत्तम ... Read More »

लक्ष्य सेनने डानला झुंजविले

भारताचा युवा खेळाडू लक्ष्य सेन याला दोनवेळच्या ऑलिम्पिक विजेत्या लिन डान याच्याकडून पराभव पत्करावा लागल्याने न्यूझीलंड ओपन सुपर ३०० स्पर्धेच्या दुसर्‍याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. सध्या सक्रिय असलेल्या खेळाडूंमधील सर्वांत अनुभवी खेळाडूंमध्ये गणना होत असलेल्या डान याच्याविरुद्धचा पहिला गेम २१-१५ असा जिंकत लक्ष्यने चांगली सुरुवात केली होती. परंतु, पुढील दोन्ही गेम १५-२१, १२-२१ असे गमवावे लागल्याने त्याच्यावर पराभव ओढवला. पुढील ... Read More »