ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: May 3, 2018

मुलांवर दगडफेक

काश्मीरच्या शोपियॉंमध्ये काल एका शाळेच्या बसवर झालेल्या दगडफेकीत दोन मुले गंभीर जखमी झाली. वर वर पाहता हिंसाचारग्रस्त काश्मीरमधील ही एक छोटीशीच घटना, परंतु अशा प्रकारची घटना खोर्‍यात प्रथमच घडली आहे आणि त्यामागील इरादे लक्षात घेता ती अतिशय गंभीर स्वरूपाची आहे. काश्मीरमध्ये गेली अनेक वर्षे हिंसाचार आहे, परंतु दहशतवाद्यांकडून पर्यटक आणि स्थानिक नागरिक यांना सहसा आजवर लक्ष केले जात नसे. त्यांच्या ... Read More »

आयसिसचा मोर्चा आता अफगाणिस्तानकडे

शैलेंद्र देवळाणकर इराक आणि सिरियामध्ये नाटो आणि अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांमध्ये हजारो योद्धे मारले गेल्यानंतर आयसिसने आता योद्ध्यांचा शोध सुरू केला असून त्यांनी आपला मोर्चा अङ्गगाणिस्तानकडे वळवला आहे. काबूलमध्ये झालेला ताजा बॉम्बस्ङ्गोट हे आयसिसयचे शक्तीप्रदर्शन आहे. इराक आणि सीरियामध्ये इसिसच्या साम्राज्याला उतरती कळा लागली आहे. मोसूलचा पाडाव झाला तेव्हापासून आयसिसच्या साम्राज्याची घसरण खर्‍या अर्थाने सुरू झाली. आजघडीला ही संघटना आखाती प्रदेशात ... Read More »

कोमुनिदाद कायद्यात दुरूस्तीचा प्रस्ताव ः खंवटे

>> पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडणार राज्यातील कोमुनिदाद संस्थांच्या कारभारात सुसूत्रता आणण्यासाठी कोमुनिदाद कायद्यात दुरुस्तीचा प्रस्ताव विचाराधीन असून विधानसभेच्या आगामी अधिवेशनात दुरुस्ती विधेयक सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री रोहन खंवटे यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. राज्यातील बर्‍याच कोमुनिदाद बेकायदा भूखंड विक्री व हस्तांतर प्रकरणात गुंतलेल्या आहेत. सरकारकडून काही कोमुनिदादच्या बेकायदा भूखंड प्रकरणाची चौकशी केली जात आहे. कोमुनिदादमधील भूखंड गैरव्यवहाराची ... Read More »

वीजमंत्र्यांच्या ओल्ड गोव्यातील बंगल्याप्रकरणी योग्य कारवाई करा

>> राज्यपालांचा मुख्य सचिवांना आदेश राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांच्या ओल्ड गोवा येथील बंगल्याच्या बांधकाम प्रकरणी योग्य कारवाई करण्याचा आदेश मुख्य सचिवांना दिला आहे. वीजमंत्री मडकईकर यांनी ओल्ड गोवा येथील संरक्षित पुरातन वास्तू असलेल्या बेसिलिका ऑफ बॉम जीजस चर्चच्या ३०० मीटर अंतराच्या आत बंगला बांधल्याची ऍड. आयरिश रॉड्रीगीस यांची तक्रार आहे. या भव्य बंगल्याची कंपाऊड भिंत ५० ... Read More »

जागतिक वारसा यादीतील ६ वास्तू खाजगी कंपन्यांना दत्तक

>> केंद्राच्या प्रस्तावाने गोव्यात खळबळ जागतिक वारसा यादीत नाव असलेल्या जुने गोवे येथील चर्चसह राज्यातील काही महत्त्वाच्या वास्तू खासगी कंपन्यांना दत्तक देण्याची योजना केंद्र सरकारने गोवा सरकारला विश्‍वासात न घेता तयार केल्याने सध्या खळबळ माजली आहे. या यादीत काब-द-राम व चोपडे येथील किल्ल्यांचाही समावेश आहे. जागतिक वारसा वास्तूंच्या यादीत अत्यंत वरचे स्थान असलेल्या जुने गोवे येथील चर्चसह एकूण सहा वास्तू ... Read More »

वीज घोटाळाप्रकरणाची आजपासून सुनावणी

पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो आणि सहा जणांचा सहभाग असलेल्या २००१ वर्षातील कथित वीज घोटाळा प्रकरणाच्या सुनावणीला गुरुवार ३ मे २०१८ पासून येथील उत्तर गोवा जिल्हा न्यायालयात प्रारंभ होत आहे. न्यायालयाने पंचायत मंत्री गुदिन्हो व सहा जणांना न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावलेला आहे. वीज खात्यातील घोटाळा प्रकरणी २००१ मध्ये विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी तक्रार दाखल केलेली आहे. सदर प्रकरण घडले त्यावेळी ... Read More »

जे. डे हत्याकांडप्रकरणी छोटा राजनला जन्मठेप

>> विशेष मोक्का न्यायालयाचा निकाल विशेष मोक्का न्यायालयाने बहुचर्चित जे. डे हत्याकांडप्रकरणी अंडरवर्ल्ड गँगस्टर राजेंद्र निकाळजे ऊर्फ छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. छोटा राजनसह या हत्याकांडातील इतर नऊ दोषींनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. विशेष मोक्का न्यायालयाने काल हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. सतीश काल्या, अभिजीत शिंदे, अरुण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, निलेश शेंडगे, मंगेश अगनावे, विनोद असरानी आणि दीपक सिसोदिया ... Read More »

गोवा राज्य चित्रपट महोत्सवाचे आज उद्घाटन

नवव्या गोवा राज्य चित्रपट महोत्सवाच्या आज ३ मे रोजी उद्घाटन होणार आहे. आयनॉक्स पणजीतील थिएटर क्रमांक १ मध्ये संध्याकाळी ५ वा. हे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनानंतर के. सेरा सेरा हा कोकणी चित्रपट दाखवण्यात येणार आहे. दि. ३ ते ६ मे पर्यंत हा राज्य चित्रपट महोत्सव चालणार आहे. सूर्यकांत लवंदेंना जीवनगौरव हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत कॅमेरामन म्हणून काम केलेले कलाकार सूर्यकांत ... Read More »

गुजरातमधील दरोड्यातील संशयितास केप्यात अटक

गुजरातमध्ये तीन कोटी चाळीस लाख रुपयांचा दरोडा घालून पसार झालेल्या सराईत दरोडेखोर नारायण संन्याल (मंगलोर) याला केपे पोलिसांनी केपे येथे अटक केली. गुजरात येथे ३ कोटी ४० लाखांचा दरोडा घातला गेला होता व या दरोड्यातील एका आरोपीला गुजरात पोलिसांनी अटक केली होती. दुसरा आरोपी संन्याल हा फरारीच होता. गुजरात पोलिसांनी त्याच्या मोबाईल फोनचे लोकेशन तपासून तो गोव्यात केपे भागात वावरत ... Read More »

पृथ्वी, श्रेयस, पंतने रॉयल्सला झोडपले

पावसामुळे बाधित झालेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या ११व्या पर्वातील ३२व्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सने राजस्थान रॉयल्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना १७.१ षटकांत १९६ धावा केल्या आहेत. अंतिम वृत्त हाती आले त्यावेळी राजस्थानसमोर विजयासाठी १२ षटकांत १५१ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. पावसामुळे सामना सुरू होण्यास तब्बल दीड तास उशीर झाला. त्यामुळे षटकांची संख्या कमी करून १८ करण्यात आली. पावसाची शक्यता लक्षात घेऊन राजस्थान ... Read More »