ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: May 2, 2018

शेवटचा संशोधक

आपल्या गोमंतकाला जशी मुक्तिपूर्व काळापासून साहित्यिकांची थोर परंपरा लाभली आहे, तशीच साहित्य संशोधकांचीही येथे अशीच उज्ज्वल परंपरा राहिली आहे. अ. का. प्रियोळकर, डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर, लक्ष्मीकांत प्रभू भेंब्रे, पां. पु. शिरोडकर अशा या संशोधकांच्या मांदियाळीमध्ये चपखल बसणारे विद्वान गोमंतकीय संशोधक डॉ. विठ्ठल बाबू तथा वि. बा. प्रभुदेसाई यांचे काल पुण्यात निधन झाले आणि व्यासंगी संशोधनाची एक दीर्घ परंपरा खंडित झाली ... Read More »

फाशीसंबंधीचा अध्यादेश अतार्किक

ऍड. असीम सरोदे विशिष्ट वयोमर्यादेपर्यंतच्या मुलींवरील बलात्कारासाठी ङ्गाशीची शिक्षा आणि त्यानंतरच्या वयोगटातील मुलींसाठी-महिलांसाठी वेगळी शिक्षा यामागचा हेतू न उलगडणारा आहे… कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणांनंतर केंद्र सरकारने अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या घटनांची अत्यंत गंभीर दखल घेत दोषींना कठोर शिक्षा होऊन कायद्याची जरब बसावी, यासाठी पाऊल उचलले आहे. पोक्सो, भादंवि, फौजदारी दंड संहिता व भारतीय पुरावे कायद्यात दुरुस्ती करून नराधमांना कमाल शिक्षा ... Read More »

राज्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा

>> जलस्रोत खात्याच्या सूत्रांची माहिती >> साळावली धरणात ३६ टक्के पाणी यंदा मे महिन्याला प्रारंभ झाला तरी धरणामध्ये योग्य प्रमाणात पाण्याचा साठा उपलब्ध आहे. राज्यातील विविध भागात पाण्याचा पुरवठा करणार्‍या प्रमुख साळावली, अंजुणेसह अन्य धरणांमध्ये मुबलक प्रमाणात पाण्याचा साठा उपलब्ध आहे, अशी माहिती जलस्रोत खात्याच्या सूत्रांनी दिली. राज्यातील धरणातील पाण्याची पातळी एप्रिल, मे महिन्यात कमी होते. जलस्रोत खात्याकडून राज्यातील नद्या, ... Read More »

राहुल गांधींनी कागदाविना बोलावे

>> पंतप्रधान मोदींचे खुले प्रतिआव्हान संसदेत बोलण्याची संधी दिल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टिकाव लागणार नाही, या राहुल गांधी यांच्या आव्हानाला मोदींनी प्रतिआव्हान दिले असून कागदाचा एकही तुकडा न घेता फक्त १५ मिनिटे भाषण करण्याचे खुले आव्हान कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल यांना दिले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील प्रचार मोहिमेच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींना लक्ष्य केले. म्हैसूर ... Read More »

बेकायदा खाण व्यवसायातून लुटलेल्या संपत्तीची वसुली करा

>> आयटकच्या कामगार सभेत ठराव राज्य सरकारने गोवा खाण विकास महामंडळ स्थापन करून आणि पर्यावरणाचे संवर्धन करून खाण व्यवसाय त्वरित पुन्हा सुरू करावा. तसेच बेकायदा खाण व्यवसायातून लुटण्यात आलेल्या संपत्तीची वसुली करावी, असे ठराव अखिल भारतीय ट्रेड युनियन कॉंग्रेस (आयटक) गोवा राज्य समितीने चर्च सर्कल उद्यानाजवळ आयोजित कामगार दिन सभेत काल एकमताने संमत करण्यात आले. भविष्य निर्वाह निधी कायद्यात बदल ... Read More »

ज्येष्ठ गोमंतकीय साहित्य संशोधक डॉ. वि. बा. प्रभुदेसाई यांचे निधन

व्यासंगी साहित्य संशोधक व गोव्यातील ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या मराठी वाङ्‌मयाचे गाढे अभ्यासक तसेच नागपूर विद्यापीठाचे माजी मराठी विभाग प्रमुख डॉ. विठ्ठल बाबू तथा वि. बा. प्रभुदेसाई (८५) यांचे काल सकाळी पुणे येथे वृद्धापकाळाने निधन झाले. मूळचे खरेगाळ – पैंगीण येथील डॉ. वि. बा. प्रभुदेसाई यांनी आपल्या प्रदीर्घ साहित्यिक कारकिर्दीत अनेक मौलिक ग्रंथसंपदेची निर्मिती केली. ज्येष्ठ गोमंतकीय संशोधक डॉ. अ. का. प्रियोळकर ... Read More »

मोप जागेतील झाडे तोडण्यास तूर्त बंदी

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने नियोजित मोपा विमानतळ जागेतील झाडे पुढील आदेशापर्यंत तोडू नयेत, असा आदेश दिला आहे. खंडपीठाने विमानतळ जागेतील तोडण्यात येणार्‍या झाडांवर क्रमांक नोंद करण्याची सूचना अधिकार्‍यांना केली आहे. मोपा विमानतळ जागेतील झाडे कापणीबाबत फेडरेशन ऑफ रेनबो वॉरियर्स या स्वयंसेवी संस्थेने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी ६ जून रोजी होणार ... Read More »

गोव्याच्या बाजारपेठेत हापूस व मानकुरादचा दुष्काळ

>> ओखी वादळ व बदलत्या हवामानाचा तडाखा मार्च, एप्रिल संपून मे महिना उजाडला तरी गोव्यातील बर्‍याच लोकांना फळांचा राजा असलेल्या आंब्याची चव अजून चाखता आलेली नाही. आंब्याच्या मोसमाचा शेवटचा महिना उजाडला असला तरी बाजारपेठेत अजूनही आंब्याचा दुष्काळ असून परिणामी दर खाली आलेले नाहीत. त्यामुळे यंदाच्या मोसमात सर्वसामान्य गोमंतकीयांना अद्याप आंबा चाखता आलेला नाही. गेल्या १० वर्षांच्या काळात गोव्याच्या बाजारपेठेत आंब्याचा ... Read More »

बेंगळुरूकडून पराभवाची परतफेड

>> आव्हान जिवंत; मुंबईवर १४ धावांनी मात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने वानखेडेवरील पराभवाची परतफेड करताना मुंबई इंडियन्सवर १४ धावांनी मात करीत इंडियन प्रीमियर लीगच्या ११व्या पर्वातील बाद फेरीच्या आशा जिवंत राखल्या. महत्त्वपूर्ण लढतीत बेंगळुरूने मुंबईला १४ धावांनी पराभूत केले. पराभवामुळे मुंबई इंडियन्स काहीशी बॅकफूटवर गेली आहे. त्यांना आता बाद फेरीतील प्रवेशासाठी मुंबईला उरलेल्या सर्वच्या सर्व सहाही सामन्यांत पूर्ण गुणांची कमाई करणे ... Read More »

भारताचे अव्वलस्थान अधिक भक्कम

>> आयसीसी कसोटी क्रमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने काल मंगळवारी जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत भारतीय संघाने आपले अव्वल स्थान अधिक भक्कम केले आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसर्‍या तर ऑस्ट्रेलिया संघ तिसर्‍या स्थानी आहे. कालची क्रमवारी जाहीर करताना २०१४-१५ वर्षातील कामगिरी विचारात घेण्यात आलेली नाही. २०१५-१६ व २०१६-१७ मधील कामगिरीला ५० टक्के महत्त्व देण्यात आले आहे. यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेवरील गुणांची ... Read More »