ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: May 1, 2018

तमसो मा ज्योतिर्गमय

उगा सूर्य कैसा कहो मुक्ती का यह | उजाला करोडों घरोंमे न पहुँचा ॥ शनिवारी ईशान्येतील मणीपूरमधील लीसांग नावाच्या एका दुर्गम गावी काही घरांमध्ये वीज उजळली आणि या विशाल देशामध्ये आता एकही गाव असे राहिलेले नाही की जिथे वीज पोहोचलेली नाही, अशी औपचारिक परंतु ऐतिहासिक घोषणा केंद्र सरकारने केली. तीन वर्षांपूर्वी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ... Read More »

राजकीय क्षेत्रात गुन्हेगारांचा शिरकाव

देवेश कु. कडकडे कातडी बचाव भूमिका आणि आपल्या नकारात्मक दृष्टीकोनातून आणि राजकारणापासून अलिप्त राहण्याच्या भूमिकेमुळे या अशा लोकांच्या पथ्यावर पडते आणि समाजाला फार मोठी किंमत मोजावी लागते. महात्मा गांधी एकदा म्हणाले होते, मी राजकारणात आहे कारण मी ईश्वराचा उपासक आहे. ईश्वराची उपासना समाजाच्या सेवेखेरीज करता येत नाही आणि समाजाची सेवा राजकारणाखेरीज करता येत नाही. गांधीजींचे हे विचार आज गुंड, मवाली, ... Read More »

जमीन रूपांतरण चौकशीसाठी समिती स्थापन

>> मंत्री विजय सरदेसाईंची घोषणा >> महिनाभरात समिती देणार अहवाल राज्यातील राजकीय नेते व चर्च संस्थेकडून बेकायदा जमीन रूपांतरे झाल्याचे जे आरोप मडगाव येथील लोहिया मैदानावर झालेल्या सभेतून करण्यात आले होते त्यासंबंधी चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला एका महिन्याच्या आत म्हणजेच १ जून रोजी चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश दिला असल्याचे नगर आणि नियोजन ... Read More »

जमीन रूपांतरण न झाल्याने चर्च संस्थेकडून दबावतंत्र

>> भाजपचा पत्रकार परिषदेत आरोप चर्च संस्थेने स्वत:च ५.५० लाख चौरस मीटर जमिनीचे रूपांतर करण्याचा प्रस्ताव सरकारसमोर ठेवला होता. मात्र, त्यांतील केवळ १.३० लाख चौ. मीटर जमिनीचे रूपांतरण झाले. शेष जमिनीचे रूपांतरण न केल्याने सरकारवर दबाव आणण्यासाठी चर्च संस्थेने ‘गोंयचो आवाज’ या संघटनेला पुढे केले नसावे ना असा संशय भाजपाचे प्रवक्ते शर्मद पै रायतुरकर यांनी काल पत्रकार परिषदेत व्यक्त केला. ... Read More »

‘गोयचो आवाज’ विरोधात कायदेशीर कारवाई : एलिना

‘गोयचो आवाज’ संघटनेच्या नेत्यांनी फुकाची प्रसिद्धी मिळविण्यासाठी आपल्या विरुध्द बिनबुडाचे आरोप केले आहेत. हा प्रकार खालच्या दर्जाचा आहे. आपले व आपल्या परिवाराचे ‘गोयचो आवाज’ नेत्यांनी विनाकारण बदनामी केली असून आमच्या भावना दुखावलेल्या आहेत. त्यांनी ४८ तासांच्या आत जाहीर माफी न मागितल्यास त्यांच्या विरुध्द कायदेशीर कारवाई करणार असल्याचे कुठ्ठाळीच्या आमदार श्रीमती एलिना साल्ढाणा यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. मडगावच्या लोहीया ... Read More »

मंत्रीमंडळ समितीला महिनाभराची मुदतवाढ

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या गैरहजेरीत राज्याचा कारभार सांभाळण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तीन सदस्यीय मंत्र्यांच्या समितीला आणखी एका महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सोमवारी काढण्यात आलेल्या आदेशाद्वारे ह्या समितीचा कार्यकाळ ३१ मेपर्यंत वाढवण्यात आलेला आहे. त्यासंबंधीचा आदेश काल गोव्याचे मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा यांनी काढला. यापूर्वी एकदा या समितीला मुदतवाढ देण्यात आली होती. काल दुसर्‍यांदा मुदतवाढीचा आदेश काढण्यात आला असल्याचे शर्मा ... Read More »

दिगंबर कामत यांची दोन तास चौकशी

>> खाण घोटाळा प्रकरण गुन्हा अन्वेषण विभागाच्या खास तपास पथकाने (एसआयटी) ३५ हजार कोटींच्या कथित खाण घोटाळा प्रकरणी काल माजी मुख्यमंत्री तथा मडगावचे विद्यमान आमदार दिगंबर कामत यांची सुमारे दोन तास चौकशी केली. काल सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आमदार कामत एसआयटी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. यानंतर तपास अधिकार्‍यांनी त्यांना खाण घोटाळा प्रकरणी विविध प्रश्‍न विचारून कसून चौकशी केली. खाण घोटाळा ... Read More »

खाणी सुरू न झाल्यास जनआंदोलन : आयटक

राज्यातील बंद पडलेला खाण उद्योग गोवा सरकारने विनाविलंब सुरू केला नाही तर आयटक राज्यातील खाण अवलंबितांना घेऊन जनांदोलन सुरू करील, असा इशारा आयटकचे सरचिटणीस व कामगार नेते ऍड्. ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी काल कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिला. गोवा सरकारने लवकरात लवकर तोडगा काढून राज्यातील बंद पडलेला खाण उद्योग सुरू करावा. खाण उद्योग बंद पडल्याने राज्यातील सुमारे ३५ ... Read More »

मडगावात ६.४२ लाखांचा गांजा जप्त

>> संशयिताला अटक >> मडगाव पोलिसांची कारवाई येथील मोती डोंगरावर नागेश गार्डन जवळ मडगाव पोलिसांनी छापा टाकून फैजान सैय्यद (२५) या तरूणाला ताब्यात घेतले व त्याच्याकडील ६.४२ लाखांचा गांजा जप्त केला. जप्त केलेल्या गांजा २ किलो १४३ ग्राम इतका होता. इतक्या मोठ्या प्रमाणात दक्षिण गोव्यात पहिल्यांदाच गांजा जप्त करण्यात आला आहे. फैजान सैय्यद हा कर्नाटकातील असून कित्येक काळापासून तो मडगाव ... Read More »

चेन्नई सुपरकिंग्सचा विजयी षटकार

>> वॉटसन, रायडू, धोनीची आक्रमक खेळी >> दिल्लीचा पुन्हा पराभव चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली डेअरडेव्हिल्सचा १३ धावांनी पराभव केला. कालच्या कामगिरीसह त्यांनी ६ विजय आपल्या खात्यात जमा करत १२ गुणांसह गुणतक्त्यात अव्वल स्थानी झेप घेतली. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने २११ धावांचा डोंगर उभारला. परंतु, दिल्ली संघाला ऋषभ पंत व विजय शंकरच्या आक्रमक फलंदाजीनंतरही विजयापासून दूर रहावे लागले. २० षटकांत त्यांनी ... Read More »