ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: April 20, 2018

भारत की बात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला पुढील महिन्यात चार वर्षे पूर्ण होतील. आता या सरकारचे एकच वर्ष राहिले आहे. पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुकांना नव्याने सामोरे जायचे आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी नुकताच इंग्लंड दौर्‍यात लंडनमध्ये तेथील भारतीयांशी जो जाहीर संवाद साधला, तो त्यांच्या एरव्हीच्या नित्य मौनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा ठरतो. आपल्या सरकारच्या गेल्या चार वर्षांतील कामगिरीबरोबरच देशातील वाढत्या बलात्कारांपासून विरोधकांकडून सतत होणार्‍या टीकेपर्यंत ... Read More »

धूम धडाड धूम हो, रायगडावर नाद

सुरेंद्र शेट्ये (म्हापसा) रायगडावर साजर्‍या झालेल्या शिवपुण्यतिथी कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत यांची यंदा उपस्थिती होती. त्या सोहळ्यामध्ये सहभागी होताना आलेला एक अनुभव – पंचवीस वर्षांनंतर परत एकदा रायगड पादाक्रांत करण्याचा योग आला. जशी प्रभू रामचंद्रांची अयोध्या, तसाच शिवाजी महाराजांचा रायगड आम्हाला ललामभूत. ‘स्वर्णमयी लंका ना मिले मॉं, अवधपूरी की धूल मिले’ या काव्यपंक्ती अयोध्या आणि रायगडाला आमच्या जीवनात किती मोलाचे ... Read More »

सीआरझेड् मर्यादा ५० मीटर

>> केंद्र सरकारचा प्रस्ताव >> मच्छीमारांना मिळणार दिलासा सीआरझेड कायद्यातील वरील दुरुस्तीमुळे किनारी भागात मोठ्या प्रमाणात बांधकामांचा मार्ग खुला होणार आहे. केंद्र सरकारने २०११ मध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेतील तरतुदीमुळे किनारी भागातील बांधकामांवर मोठ्या प्रमाणात निर्बंध आले होते. समुद्र किनार्‍यांपासून ५०० मीटर अंतराच्या आत बांधकाम करण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. त्यामुळे नवीन बांधकामांना चालना मिळत नव्हती. तसेच स्थानिकांच्या राहत्या घरांची दुरुस्ती ... Read More »

शिरगाव जत्रोत्सवात आज लोटणार भक्तांचा महापूर

>> लईराईचा प्रसिद्ध जत्रोत्सव आजपासून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगाव, डिचोली येथील सुप्रसिद्ध श्री देवी लईराईचा जत्रोत्सव आज दि. २० एप्रिल पासून सुरू होत असून तो पाच दिवस चालणार आहे. या उत्सवानिमित्त शिरगावला लाखो भाविक भक्त मंडळींचा महापूर येणार असून आगामी पाच दिवस सर्वत्र मंगलमय वातावरण असेल. दरम्यान, देवस्थान समितीने यंदाची जत्रा प्लॅस्टिकमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. प्रशासनाने भाविकांच्या सोयीसाठी ... Read More »

न्या. लोया यांचा मृत्यू नैसर्गिकच : सुप्रीम कोट

>> एसआयटी चौकशीची याचिका फेटाळली न्यायाधीश बी. एच. लोया यांचा मृत्यू नैसर्गिकच होता. या प्रकरणातून केवळ न्यायव्यवस्थेची बदनामी करण्यात आली आहे. त्यामुळे लोया मृत्यूप्रकरणाची एसआयटी किंवा इतर स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात येणार नाही, असा स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने लोया मृत्यूप्रकरणाची एसआयटी चौकशी करणारी जनहित याचिकाही काल फेटाळली. कॉंग्रेस नेते पुनावाला, पत्रकार बंधूराज लोणे आणि बॉम्बे लॉयर्स असोसिएशनने लोया मृत्यूप्रकरणाची निष्पक्ष ... Read More »

अमित शहा १३ मे रोजी गोव्यात

>> श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर सभा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा येत्या १३ मे रोजी गोव्यात येत असून आगामी लोकसभा निवडणूक प्रचाराच्या कार्याला गती देण्यासाठी या दिवशी बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये भाजप बूथ कार्यकर्त्यांना ते संबोधित करणार आहेत. प्रत्येक मतदारसंघातून भाजप कार्यकर्ते दुचाकीवरून रॅलीने बूथ मेळाव्याला उपस्थितीत राहणार आहेत. निमंत्रित कार्यकर्त्यांना मेळाव्यात सहभागी करून घेतले जाणार आहे. या दुचाकी रॅलीचे ... Read More »

कॉंग्रेस विधिमंडळ गटाची आज तातडीची बैठक

कॉंग्रेस विधिमंडळ गटाची तातडीची बैठक आज दि. २० एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता पर्वरी येथे विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. प्रादेशिक आराखडा २०२१, बेरोजगारी, खाण कंपन्यांकडून कामगार कपात, सरकारचे कोलमडलेले प्रशासन आदी प्रमुख विषयांवर या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारने गेली सहा वर्षे प्रलंबित ठेवण्यात आलेल्या प्रादेशिक आराखडा २०२१ ची अंमलबजावणी ... Read More »

आयडीसीच्या भूखंड शुल्कवाढीला उद्योजकांचा विरोध

>> गोवा चेंबर ऑफ कॉमर्स आणि औद्योगिक वसाहत असोसिएशनच्या बैठकीत संताप गोवा चेंबर ऑफ कॉमर्स र्ऍड इंडस्ट्रीज आणि औद्योगिक वसाहत असोसिएशन यांच्या काल झालेल्या संयुक्त बैठकीत औद्योगिक वसाहतीमधील भूखंड शुल्कवाढीला विरोध करण्यात आला. राज्य सरकारच्या औद्योगिक विकास महामंडळाने औद्योगिक वसाहतीतील भूखंडांसाठीच्या वार्षिक शुल्कात वाढ केल्याने उद्योग क्षेत्रात नाराजी पसरली आहे. महामंडळाच्या भाडेवाढीच्या विरोधात उद्योजकांनी गोवा चेंबर ऑफ कॉमर्स या राज्यव्यापी ... Read More »

प्रमेय माईणकर भाजयुमो अध्यक्ष

भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी पणजी महानगरपालिकेचे नगरसेवक प्रमेय माईणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी भाजप युवा मोर्चाची नूतन कार्यकारी समितीची काल घोषणा केली. उपाध्यक्षपदी सुप्रज तारी, पंकज नाईक गावकर, पूर्वा चोडणकर, सागर मावळणकर सरचिटणीसपदी गजानन तिळवे, ओंमकार वस्त, सचिव – अंकित चणेकर, दिया गावकर, रिमा सोनुर्लीकर, खजिनदारपदी सचिन साळकर यांची नियुक्ती करण्यात आली ... Read More »

गेलसमोर सनरायझर्स ‘फेल’

>> किंग्स इलेव्हन पंजाबचा हैदराबादवर १५ धावांनी विजय किंग्स इलेव्हन पंजाबने सनरायझर्स हैदराबादचा १५ धावांनी पराभव करत यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील आपला तिसरा विजय नोंदविला. हैदराबादने सलग तीन सामन्यांत विजय नोंदवून धमाकेदार सुरूवात केली होती. परंतु, कालच्या पराभवामुळे त्यांच्या घोडदौडीला ब्रेक लागला आहे. ख्रिस गेल याने ठोकलेल्या तडाखेबंद शतकामुळे पंजाबला विजय मिळविणे शक्य झाले. पंजाबने विजयासाठी ठेवलेल्या १९४ धावांच्या ... Read More »