ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: April 16, 2018

घातक संघर्ष

सिरियामधील राष्ट्राध्यक्ष बशीर अल असद यांच्या सैन्यावर अमेरिकेने फ्रान्स आणि ब्रिटनसमवेत दुसर्‍यांदा चढवलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे जागतिक संघर्षाची ठिणगी पुन्हा एकदा पडते की काय अशी भीती निर्माण झालेली आहे. सिरियाच्या असद राजवटीला रशिया आणि इराणचा असलेला पाठिंबा जगजाहीर आहे. अशा वेळी असद यांच्या लष्करी तळांना आणि रासायनिक संशोधन केंद्रांना अमेरिका आणि मित्रदेशांच्या क्षेपणास्त्रांनी दुसर्‍यांदा लक्ष्य केल्याने साहजिच असद यांचा मित्र असलेला ... Read More »

अविश्वास उडाला, महाभियोग पळाला, पीआयएल निकाली

लक्ष्मण त्र्यं. जोशी मोदी सरकारला अडचणीत आणण्यासाठी पुढे केलेला अविश्वास प्रस्ताव उडाला, कथित महाभियोग पळाला आणि कथित जनहित याचिका निकालात निघाली. यात कुणाच्या हातात काय लागले हे ज्याचे त्याने ठरवावे. संसद आणि सर्वोच न्यायालय यातील गेल्या महिना दोन महिन्यात घडलेल्या घटनांचा निचोड काढायचे ठरविले तर संसदेत सरकार विरुध्दाचा अविश्वास प्रस्ताव आणि सरन्यायाधीशांच्या विरोधातील कथित महाभियोग यांच्या माध्यमातून मोदी सरकारला आणि ... Read More »

ग्रामसभांसाठी सुधारित नियम

>> सूचना – हरकतींसाठी १५ दिवसांची मुदत पंचायत संचालनालयाने गोवा पंचायत (ग्रामसभा बैठक) नियमात दुरुस्तीसाठी सुधारित मसुदा जाहीर केला आहे. या सुधारित मसुद्यामध्ये ग्रामसभेच्या विषय पत्रिकेबाहेरील विषयांवर चर्चा करण्यात बंदी घालण्यात आली आहे. या मसुद्यासंबंधी सूचना, हरकती पंधरा दिवसांत पंचायत संचालकाकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या नवीन मसुद्यासंबंधी सूचना व हरकती लक्षात घेऊन मसुद्याला अंतिम स्वरूप दिले जाणार ... Read More »

उन्नाव (उत्तर प्रदेश) आणि कठुआ (जम्मू काश्मीर) येथील युवतींवरील लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ पणजीतील आझाद मैदानावर काल रात्री काढण्यात आलेल्या मेणबत्ती मोर्चात युवक – युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन गुन्हेगारांवर कडक कारवाईची मागणी केली. Read More »

चौथीपर्यंतच्या आदिवासी मुलांसाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून योजना

पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण घेणार्‍या आदिवासी समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून योजना सुरू करण्यात येणार असून आदिवासी कल्याण खात्यातर्फे केंद्रीय आदिवासी मंत्रालयाकडे २०१८-२०१९ या आर्थिक वर्षासाठी ६५ कोटी रुपयांचे विविध प्रकल्प मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती आदिवासी कल्याण मंत्री गोविंद गावडे यांनी या प्रतिनिधीशी बोलताना दिली. केंद्रीय आदिवासी मंत्रालयाने गेल्या आर्थिक वर्षात ३० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांना मंजुरी ... Read More »

खाणप्रश्‍नी फेरविचार याचिकेवर ‘सीएसी’च्या बैठकीत उद्या चर्चा

राज्य मंत्रिमंडळ सल्लागार समितीच्या (सीएसी) उद्या १७ एप्रिल रोजी होणार्‍या बैठकीत सर्वोच्च न्यायालयात खाण प्रश्‍नी फेरविचार याचिका सादर करण्यावर चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात खाणबंदी प्रकरणी फेरविचार याचिका दाखल करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांच्या सल्ल्याच्या सरकारी यंत्रणा प्रतीक्षा करीत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात १६ मार्चपासून खाणबंदी लागू करण्यात आली ... Read More »

जमीन विक्रीसाठी प्रक्रिया शुल्क जाहीर

नगरनियोजन कायदा १९७४ च्या कलम ४९ (६) अंतर्गत ना हरकत दाखल्यासाठी अर्जदारांकडून प्रक्रिया शुल्क वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधीची सूचना नगरनियोजन खात्याचे मुख्य नगरनियोजक (प्रशासन) जेम्स मॅथ्यू यांनी जारी केली आहे. दोन हजार मीटर चौरस जागेसाठी १ हजार रुपये, २००१ ते ५००० मीटर चौरस जागेसाठी २ हजार रुपये आणि ५ हजारावरील मीटर चौरस जागेसाठी ३ हजार रुपये प्रक्रिया ... Read More »

दहावीच्या विज्ञान प्रश्‍नपत्रिकेविषयी पालकही मंडळाला जाब विचारणार

गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या नवीन पद्धतीच्या दहावीच्या विज्ञान प्रश्‍नपत्रिकेचे गांभीर्य वाढत चालले आहे. गोवा मुख्याध्यापक संघटनेनंतर काही पालकांनी सुध्दा मंडळाला निवेदन सादर करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. शालान्त मंडळ आपली जबाबदारी झटकू शकत नाही, अशा प्रतिक्रिया पालकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. दहावीच्या विज्ञान प्रश्‍नपत्रिकेच्या बदललेल्या स्वरूपाबाबत पालक, शिक्षण संस्था आणि शिक्षकवर्गात चिंता व्यक्त केली जात आहे. बदललेल्या प्रश्‍न पत्रिकेमुळे ... Read More »

आयटी पार्क, इलेक्ट्रॉनिक सिटीच्या कामाला गती

गोवा माहिती तंत्रज्ञान महामंडळाने चिंबल येथील आयटी पार्क आणि तुये, पेडणे येथील इलेक्ट्रॉनिक सिटीच्या जागेत भूखंड व इतर सुविधा तयार करण्याच्या कामाला गती दिली आहे. राज्य सरकारकडून गेल्या कित्येक वर्षांपासून तुये, पेडणे येथे इलेक्ट्रॉनिक सिटी आणि चिंबल येथे आयटी पार्क उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या दोन्ही प्रकल्पांसाठी जागा गोवा माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या स्वाधीन करण्यात आल्या आहेत. चिंबल येथील आयटी प्रकल्पासाठी ... Read More »

महिला एकेरीत सायनाला सुवर्ण

सायना नेहवालने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पी.व्ही सिंधूवर विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले आहे. बॅडमिंटन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात सायनाने अनुभवाच्या जोरावर सिंधूला २-० ने नमवले. सायनाने आक्रमक खेळी करत पी. व्ही. सिंधूचा २१-१८, २३-२१ असा सरळ दोन गेममध्ये पराभव करत सुवर्ण आपल्या नावे केले. तर सिंधूला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले असून तिला रौप्यपदक मिळाले आहे. भारताच्या दोन दिग्गज खेळाडूंमधील सामना हा ... Read More »