ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: April 14, 2018

दहावीचा गोंधळ

गोव्याच्या नुकत्याच संपलेल्या शालांत परीक्षेच्या गणित आणि विज्ञान विषयाच्या प्रश्नपत्रिकांसंदर्भात विद्यार्थ्यांमधून आणि विशेषतः पालकांमधून तीव्र नाराजीचे सूर ऐकू येत आहेत. गणिताच्या प्रश्नपत्रिकेतील तीन प्रश्नांबाबत पालक नाराजी दर्शवीत होते, तर त्यानंतर विज्ञानाच्या प्रश्नपत्रिकेतील जवळजवळ सर्वच प्रश्न नेहमीपेक्षा वेगळ्या पठडीतले विचारले गेल्याने विद्यार्थ्यांना समजले नसल्याची तक्रार ऐकू आली. ही तक्रार एखाद्या विशिष्ट शाळेच्या विद्यार्थ्यांकडून आलेली नाही, तर ती सार्वत्रिक दिसते. म्हणजे गोव्याच्या ... Read More »

चीनच्या नव्या कुरापती आणि भारत

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) डोकलामच्या रणनीतीत पिछेहाट झाल्यानंतर चीन सध्या भारतावर विविध मार्गाने दबाव टाकण्याच्या प्रयत्नात आहे. एकतर पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये सुरू असलेल्या प्रकल्पाची धास्ती भारताला दाखवत आहे तर दुसरीकडे धर्मगुरु दलाई लामा यांचे निमित्त पुढे करून दमदाटी करण्याचा प्रयत्न करत आहे. भारताने देखील चीनच्या दबावतंत्राला झुगारण्याची व त्याची प्रत्येक रणनीती हाणून पाडण्याची तयारी करायला हवी. प्रत्येक गोष्ट चर्चेने निश्‍चित करा, ... Read More »

गोव्यात केवळ गोमेकॉत अवयव रोपणास मान्यता

>> आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांची माहिती ः एका डॉक्टरला प्रशिक्षणार्थ विदेशात पाठवणार राज्यात केवळ गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमध्ये अवयव रोपण करण्यास मान्यता दिली जाणार आहे. अन्य कुठल्याही हॉस्पिटलमध्ये अवयव रोपणाला मान्यता दिली जाणार नाही. गोमेकॉच्या एका डॉक्टराला अवयव रोपणाच्या प्रगत प्रशिक्षणासाठी विदेशात पाठविण्याचा प्रस्ताव आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. गोमेकॉला अवयव मिळविण्यासाठी आवश्यक सर्व ... Read More »

कर्नाटकचे आमदार सैल यांना अंतरीम जामीन

>> खाण घोटाळाप्रकरणी एसआयटीसमोर लावली उपस्थिती येथील जिल्हा न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर कारवारचे अपक्ष आमदार संतीश (सतीश) सैल यांनी खाण घोटाळा प्रकरणाचा तपास करणार्‍या एसआयटीसमोर काल उपस्थिती लावली. सैल यांनी येथील न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी केलेल्या अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने त्यांना अंतरीम जामीन मंजूर केला. एसआयटीने मुख्य खाण घोटाळा प्रकरणाच्या तपासासाठी कारवारचे आमदार सैल यांना ९ एप्रिल रोजी उपस्थित राहण्यासाठी ... Read More »

‘विज्ञाना’च्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे पुस्तकात ः मंडळ

दहावी इयत्तेच्या विज्ञानाच्या प्रश्‍नपत्रिकेच्या स्वरुपात यंदा बदल करण्यात आला होता. मात्र, त्याच्या नव्या स्वरुपाची माहिती ऑक्टोबर महिन्यातच विद्यालयांना देण्यात आली होती, असे गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण सामंत व सचिव भागिरथ शेटये यांनी काल पत्रकारांना सांगितले. हा पेपर खूप कठीण असल्याचा दावा त्यांनी नाकारला. प्रश्‍नपत्रिका छाननी समितीने आपल्या अहवालात या प्रश्‍नपत्रिकेतील केवळ २० टक्के प्रश्‍न कठीण ... Read More »

महिला आयोगासाठी सक्षम कायदा करणार

राज्य महिला आयोगाला सक्षम बनविण्यासाठी कायद्यात आवश्यक तरतूद केली जाणार आहे. आगामी राज्य विधानसभेच्या अधिवेशनात यासंबंधीचे विधेयक सादर केले जाणार आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री विश्‍वजित राणे यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. राज्यात १०० अद्ययावत अंगणवाड्या उभारण्याचा प्रस्ताव असल्याचेही त्यांनी सांगितले. मंत्री राणे यांनी राज्यातील महिला व बालकांच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधीकडून महिला व मुलांना भेडसावणार्‍या ... Read More »

बलात्कारप्रकरणी भाजप आमदाराला अटक

उन्नाव येथील एका १७ वर्षीय मुलीवरील बलात्कारप्रकरणी काल अलाहाबाद उच्च न्यायालयाने कडक भूमिका घेताना संशयित आरोपी असलेले भाजपचे आमदार कुलदिप सेंगार यांना ताबडतोब अटक करण्याचे सीबीआयला आदेश दिले. त्यानंतर रात्री उशिरा सीबीआयने सेंगार यांना अटक केली. त्यांची अनेक तास चौकशी झाली. त्याआधी पहाटे सीबीआयने आमदार सेंगार यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. बी. ... Read More »

…तर गोंयकार अगेन्स्ट पीडीए आंदोलन तीव्र करणार ः डिसोझा

पीडीएसाठीची अधिसूचना मागे घेऊन सर्व गावांना पीडीएतून बाहेर काढण्यात यावे, नगर नियोजन कायद्यात दुरुस्ती घडवून आणावी, ग्रामस्थांना घटनात्मक हक्क देण्यात यावेत व प्रादेशिक आराखडा २०२१ रद्द करण्यात यावा अशा चार मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा काल गोंयकार अगेन्स्ट पीडीएने काल पत्रकार परिषदेत दिला. गरज पडल्यास मंत्री विजय सरदेसाई यांच्या मडगाव येथील निवासस्थानावर भव्य मोर्चा नेण्यात येणार असल्याचे संघटनेचे ... Read More »

तेजस्विनी, अनिश, बजरंगकडून सुवर्ण

२१व्या राष्ट्रकुल स्पर्धेत काल भारतासाठी नववा दिवस यशस्वी ठरला. काल भारताने तीन सुवर्ण, ४ रौप्य आणि ४ कांस्य पदके मिळून एकूण ११ पदके प्राप्त केली. त्यामुळे भारताने आपले पदकतक्त्यातील आपले तिसरे स्थान कायम राखले आहे. नेमबाजी, मुष्टियुद्ध, टेबल टेनिस आणि कुस्तीमध्ये काल भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी बजावली. भारताच्या खात्यात एकूण १७ सुवर्ण, ११ रौप्य व १४ कांस्य पदके मिळून एकूण ... Read More »

सायना, सिंधू, श्रीकांत, प्रणॉय एकेरीच्या उपांत्य फेरीत

>> बॅडमिंटनमध्ये भारताचे वर्चस्व कायम २१व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय बॅडमिंटन चमूने आपले वर्चस्व कायम राखण्यात यश मिळविले. फुलराणी सायना नेहवाल, स्टार महिला शटलर पी. व्ही. सिंधू, जागतिक अग्रमानांकित खेळाडू किदम्बी श्रीकांत आणि एच. एस. प्रणॉय यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत महिला व पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. काल खेळविण्यात आलेल्या महिला एकेरीच्या लढतीत सायनाने कॅनडाच्या राशेल होंडिरिचवर मात केली. ... Read More »