ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: April 13, 2018

गोवा डेअरी वाचवा

गोवा डेअरीमध्ये सध्या शह – काटशहाचे राजकारण जोरात दिसते. अध्यक्ष माधव सहकारी यांनी व्यवस्थापकीय संचालक डॉ. नवसो सावंत यांच्यावर पत्रकार परिषदेत केलेले भ्रष्टाचाराचे आरोप व सहकार निबंधकांकरवी चालू केलेली चौकशी, दुसरीकडे खुद्द अध्यक्ष सहकारी यांच्याविरुद्ध त्यांच्याच संचालक मंडळाच्या सदस्यांनी दिलेली अवि श्वास ठरावाची नोटीस यामुळे गोवा डेअरी सध्या भलत्या कारणांसाठी चर्चेत आहे. भ्रष्टाचाराचा विषय राहिला बाजूलाच, परंतु संचालक मंडळातील बेदिली ... Read More »

खाण भागांतील नागरिकांच्या समस्यांचा आढावा घ्या

>> न्यायालयाची मिनरल फाऊंडेशनला आठवड्याची मुदत जिल्हा मिनरल फाउंडेशनने एका आठवड्यात सोनशी, पिसुर्ले व इतर खाणव्याप्त भागांना भेट देऊन तेथील नागरिकांना भेडसावणार्‍या पाणी व इतर समस्या व गरजांचा आढावा घ्यावा, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने काल केली. खंडपीठाच्या द्विसदस्यीय पीठाने यासंबंधी अहवाल सादर करण्यासाठी मिनरला फाऊंडेशनच्या समितीला दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. खंडपीठाच्या आदेशाच्या अंमलबजावणीसंबंधी दोन आठवड्यात अहवाल ... Read More »

भारताचा श्रीकांत ‘वर्ल्ड नंबर वन’

भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत याने जागतिक पुरुष बॅडमिंटनमध्ये क्रमवारीत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. पुरुष एकेरीत अव्वल स्थान मिळविणारा श्रीकांत हा पहिलाच भारतीय बॅडमिंटनपटू ठरला आहे. जागतिक बॅडमिंटन महासंघाने काल जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत श्रीकांतने डेन्मार्कच्या विश्‍वविजेत्या व्हिक्टर एक्सेलसन याला मागे टाकत ७६,८९५ गुणांसह पहिल्या क्रमांकावर हक्क सांगितला. ७५,४७० गुण असलेल्या एक्सेलसन दुसर्‍या क्रमांकावर आहे. क्रमवारीत अव्वलस्थानापर्यंत पोहोचणारा श्रीकांत ... Read More »

कॉंग्रेसने सरकार स्थापनेची स्वप्ने पाहू नयेत ः भाजप

कॉंग्रेस पक्षाने राज्यात सरकार स्थापन करण्याची स्वप्ने पाहू नयेत, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना मारला. भाजपने येथील आझाद मैदानावर आयोजित धरणे कार्यक्रमाच्या वेळी प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर बोलत होते. कॉंग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली होती. परंतु, या संधीचा फायदा उठवू शकले नाहीत. कॉंग्रेसच्या आमदारांची संख्या १६ वरून १५ वर ... Read More »

भाजप खासदारांचे धरणे हा मोठा विनोद ः कुतिन्हो

सत्ताधारी भाजप खासदारांचे लाक्षणिक धरणे हा मोठा विनोद आहे. केंद्रातील भाजप सरकार लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज चालविण्यात अपयशी ठरल्याचे स्पष्ट होत आहे. भाजपने आपल्या अपयशाचे खापर कॉंग्रेसवर फोडण्याचा प्रयत्न चालविला आहे, अशी टीका गोवा प्रदेश महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष ऍड. प्रतिमा कुतिन्हो यांनी कॉँग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल केली. देशात अन्याय, अत्याचार होणार्‍या दलितांना न्याय मिळत नाही. कॉंग्रेस पक्षाने दलितांवरील ... Read More »

दोघांचे बळी घेणार्‍या बसचा परवाना ३ महिने निलंबित

येथील कदंब बसस्थानकावर १७ फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी ७ च्या सुमारास चुकीच्या दिशेने आणि बेशिस्तपणे प्रवासी मिनिबस चालवून अन्य एका प्रवासी बसमधून उतरणार्‍या दोघांचे बळी घेणार्‍या खासगी प्रवासी सिटी मिनिबसचा (क्र. जीए ०७ एफ १७९२) परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे, यासंबंधीचा आदेश उत्तर गोव्याचे साहाय्यक वाहतूक संचालक नंदकिशोर आरोलकर यांनी १० एप्रिलला जारी केला आहे. ११ एप्रिल २०१८ ... Read More »

एफआयआरनंतरही भाजप आमदारास अटक का नाही? ः न्यायालयाचा सवाल

उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अखेर भाजपचे आमदार कुलदिप सेंगार यांच्यावर काल एफआयआर नोंद करण्यात आले. तर या प्रकरणाची स्वेच्छा दखल घेतलेल्या अलाहाबाद उच्च न्यायालयाने आमदार सेंगार यांना पोलिसांनी याप्रकरणी अटक का केली नाही असा सवाल विचारला. सदर तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला असून त्यात सदर आमदार, त्यांचा भाऊ व अन्य काहींचा सहभाग असल्याचा आरोप ... Read More »

उन्नाव, कठुआप्रकरणी नामवंतांकडून संताप

उन्नाव येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार तसेच जम्मू काश्मीरमधील कठुआ येथील ८ वर्षीय बालिकेची बलात्कारानंतर निर्घृण हत्याप्रकरणांमुळे देशभरात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले असून विविध क्षेत्रातील दिग्गजांनी विविध माध्यमांतून संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. दिग्गज क्रिकेटपटू गौतम गंभीर, स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. चिमुरड्या मुलीवरील निर्घृण अत्याचाराच्या निषेधार्थ आम्ही आता उठणार नाही काय? ... Read More »

कुस्तीत सुशीलकुमार, राहुलला ‘गोल्ड’

भारताच्या सुशील कुमारने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. ७४ किलो वजनी गटात सुशील कुमारने आपला दक्षिण आफ्रिकन प्रतिस्पर्धी जोहान्स बोथावर अवघ्या १ मिनिट २० सेकंदात १०-० अशी मात करत सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. सुशीलचे पदक अपेक्षित होते. परंतु, मराठमोळ्या राहुल आवारेने अनेपक्षित निकालाची नोंद करताना पुरुषांच्या ५७ किलो फ्रीस्टाईल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. अंतिम सामन्यात देदीप्यमान कामगिरी करत त्याने ... Read More »

सिंधू, श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत

रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी.व्ही. सिंधूने आपला तुफानी फॉर्म कायम राखत २१व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनच्या महिला एकेरीची उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. उपउपांत्यपूर्व फेरीत तिने ऑस्ट्रेलियाच्या सुआन यू वेंडी चेन हिला सरळ गेममध्ये २१-१५, २१-९ असे हरविले. कारेरा स्पोटर्‌‌स एरेनावर झालेल्या या सामन्यात २२ वर्षीय सिंधूने केवळ ३४ मिनिटांत प्रतिस्पर्ध्याला गारद केले. उपांत्य फेरीत स्थान मिळविण्यासाठी सिंधूचा सामना कॅनडाच्या ब्रिटनी ... Read More »