ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: April 12, 2018

माफीनामा अपुरा

जगातील सर्वांत लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग याला लक्षावधी ग्राहकांच्या माहितीच्या चोरीसंदर्भात अमेरिकी सिनेटसमोर नुकतीच साक्ष द्यावी लागली. आपण फेसबुक सुरू केले, त्यामुळे जबाबदारी आपली आहे असे सांगत त्याने भले प्रांजळपणाचा आव आणला असेल, परंतु या एकूण साक्षीचा फार्स पूर्वनियोजित होता असे आरोप आता होऊ लागलेले दिसतात. ४४ सिनेटर्सपुढे जवळजवळ पाच तास चाललेल्या या साक्षीदरम्यान ... Read More »

तिसर्‍या महायुद्धाची ठिणगी पडणार?

शैलेंद्र देवळाणकर सिरियामध्ये नुकताच झालेला रासायनिक हल्ला हा रशिया व इराणच्या मदतीनेच झाला असल्याचा आरोप करत डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यास कठोर प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. ब्रिटिश गुप्तहेराच्या विषप्रयोगावरुन अमेरिका व युरोपियन देश आणि रशिया यांच्यात विकोपाला गेलेला तणाव पाहता सिरियाच्या मुद्दयावरून युद्धाचा भडका उडतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे. सिरियामधील संघर्ष आज आठव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. ... Read More »

खनिज वाहतूक गोंधळाला सरकार जबाबदार

>> सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाची टिप्पणी ः पुढील सुनावणी १८ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राज्यातील खनिज वाहतुकीतील गोंधळाला सरकारला जबाबदार धरले आहे. सरकारने १५ मार्चनंतर खनिज वाहतुकीला मान्यता देण्यापूर्वी संबंधितांकडून योग्य स्पष्टीकरण घेतले असते तर खनिज वाहतुकीबाबत गोंधळ निर्माण झालाच नसता, असे द्विसदस्यीय खंडपीठाने म्हटले आहे. गोवा खंडपीठाचे न्यायमूर्ती पृथ्वीराज चौहान आणि एन.एम. जामदार यांच्या द्विसदस्यीय पीठासमोर गोवा ... Read More »

संसदेचे कामकाज झालेले भाजपलाच नको ः कॉंग्रेस

विरोधी पक्षानी संसदेत कामकाज होऊ दिले नाही हा भाजपचा आरोप म्हणजे ‘चोराच्या उलट्या…’ असा प्रकार आहे, असे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष शांताराम नाईक यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. वास्तविक भाजपलाच संसदेचे कामकाज झालेले नको आहे बँकांचे हजारो कोटी रु. लुटून निरव मोदी विदेशात पळून गेला. अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांच्याकडे प्रचंड मालमत्ता कशी आली, बँकांना गंडा घालून विदेशात पळून ... Read More »

नगरपालिका निवडणुकांसाठी निरीक्षकांची नियुक्ती

गोवा राज्य निवडणूक आयोगाने फोंडा आणि साखळी नगरपालिकांच्या निवडणुकीच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. फोंडा नगरपालिका मंडळ निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून गोवा राज्य एसटी वित्तीय महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या कामत आणि साखळी नगरपालिकेसाठी राजभाषा खात्याच्या संचालिका स्नेहा मोरजकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. फोंडा पालिका निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून वाहतूक खात्याचे साहाय्यक लेखा अधिकारी अनिल पडवळ आणि साखळी पालिका ... Read More »

गोवा डेअरी अध्यक्षांविरुद्ध अविश्‍वास ठराव दाखल

गोवा डेअरीचे अध्यक्ष माधव सहकारी यांच्याविरुद्ध ८ संचालकांनी सहकार निबंधकांकडे अविश्वास ठराव दाखल केला आहे. सहकारी यांनी मंगळवारी व्यवस्थापकीय संचालक नवसो सावंत यांना निलंबित केल्याचे जाहीर केल्यानंतर बुधवारी सकाळी त्यांच्याविरुद्ध हा अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, निलंबित केलेल्या डॉ. नवसो सावंत यांनी काल संध्याकाळपर्यंत पदाचा ताबा सोडला नव्हता. गोवा डेअरीत लाखो रुपयांचा घोटाळा व्यवस्थापकीय संचालक नवसो सावंत यांनी ... Read More »

एमपीटी प्रकल्पाबाबतची जनसुनावणी रद्द

गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने एमपीटीच्या नियोजित विस्तार प्रकल्पाच्या चर्चेसाठी येत्या २५ एप्रिल रोजी आयोजित जनसुनावणी रद्द केली आहे. मंडळाने एमपीटीचा पर्यावरण परिणाम मोजमाप अहवाल अपूर्ण असल्याने जनसुनावणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळाने मागील महिन्यात एमपीटीच्या विस्तारीत प्रकल्पासंदर्भातील जनसुनावणीबाबत नोटीस जारी केली होती. एमपीटीचा मच्छीमारी जेटी, पॅसेंजर जेटी, मल्टीपर्पज जनरल कार्गो बर्थ आणि विकास कामांचा प्रस्ताव आहे. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी ... Read More »

४९ खाण आंदोलकांना अटकपूर्व जामीन मंजूर

येथील कदंब बसस्थानकाजवळ १९ मार्च २०१८ रोजी खाण अवलंबिताच्या आंदोलनाला हिंसक वळण प्रकरणातील ४९ संशयितांना बाल न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर करून काल दिलासा दिला. या प्रकरणातील संशयितांनी तीन दिवस पोलीस स्टेशनवर हजेरी लावावी. संशयितांना अटक केल्यानंतर त्यांची १० हजार रुपयांच्या हमीवर सुटका करावी, अशा अटी घालण्यात आल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणातील संशयितांना समन्स बजावले होते. येथील कदंब बसस्थानकाजवळ खाण ... Read More »

२६ लाखांचे सोने जप्त

दाबोळी विमानतळावर काल सुमारे २६ लाख रुपये किंमतीचे तस्करीचे सोने जप्त करण्यात आले आहे. सदर सोने दोन लहान एअर बॅग पॅकेटमध्ये एका सीटवर सापडले. कस्टम खात्याच्या गोवा विभागाच्या अधिकार्‍यांनी बुधवारी सकाळी केलेल्या कारवाईत एअर इंडिया (एआय-९९४) विमानाने आलेले हे सोने ९२८ ग्रॅम वजनाचे असून एका सिटवर दोन लहान एअर बॅग पॅकेट मध्ये आठ सोन्याच्या बिस्कीट रुपात एकूण दहा तोळे सोने ... Read More »

साखळी पालिकेसाठी आजपासून अर्ज स्वीकृती

साखळी पालिकेच्या येत्या ६ मे च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज आज गुरुवार १२ एप्रिलपासून उपजिल्हाधिकारी कार्यालयात स्वीकारण्यात येणार असून त्यासाठी डिचोली कार्यालयात सर्व तयारी करण्यात आलेली आहे. साखळी पालिका ११ प्रभागांवरून आता १३ प्रभागांची झाली असून विद्यमान नगरसेवकांबरोबरच अनेक नवीन उमेदवारांनी पालिका निवडणुकीत उतरण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. भाजपा विरुद्ध नगराध्यक्ष धर्मेश सगलानी गट असा हा सामना रंगणार असून आरक्षणाच्या ... Read More »