ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: April 11, 2018

खासगीकरणाकडे

गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि कला अकादमीच्या कँटिनवर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी आकस्मिक छापे टाकून ही उपाहारगृहे बंद करण्याचा आदेश दिला आहे. वरकरणी पाहता स्वच्छतेचे मापदंड न पाळणार्‍या उपाहारगृहांवरील अशा प्रकारच्या कारवाईचे स्वागतच करील, परंतु या छाप्यांची एकंदर साधलेली वेळ आणि त्यामागची पार्श्वभूमी लक्षात घेता यात काही काळेबेरे तर नसावे ना असा संशय घेण्यास वाव आहे. विशेषतः गोवा वैद्यकीय महाविद्यालय ... Read More »

गरज न्यायालयीन सुधारणांची

ऍड. असीम सरोद न्यायिक सुधारणा हा विषय आपल्या आर्थिक विकासाचा मुद्दा आहे. न्यायाधिशांच्या नियुक्त्या पारदर्शकपणे झाल्या पाहिजे हा न्यायिक सुधारणां मधला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. सामान्य माणूस न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचणे ही खूप आवश्यक गोष्ट असते. ऍट्रॉसिटी निवाड्याच्या निमित्ताने, सध्या गरज असलेल्या न्यायिक सुधारणांबाबत गेल्या आठवड्यातील लेखामध्ये विवेचन केले होते. आता त्याविषयी थोडे अधिक ः संगणकांचा वापरः आज न्यायालयांमध्ये बरेचदा एकाच मुद्यांवर ... Read More »

दिल्लीतील उद्याच्या उपोषणात पंतप्रधानांचाही सहभाग

कॉंग्रेस पक्षाने दलितांविरुद्ध होणार्‍या अत्याचारांच्या निषेधार्थ देश पातळीवर उपोषण केल्याच्या दोन दिवसांनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपाध्यक्ष अमित शहा हेही उद्या गुरुवारी एक दिवस उपोषणास बसणार आहेत. संसदेचे कामकाज विरोधकांकडून अनेक दिवस ठप्प केल्याच्या निषेधार्थ पंतप्रधान व भाजपाध्यक्ष खासदारांसह उपोषण करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर दिल्लीतील या उपोषणात भाजपाचे खासदार सहभाग होणार आहेत. तर भाजपाध्यक्ष अमित शहा कर्नाटक विधानसभा ... Read More »

रेल्वेवर झाड पडून १ ठार; दोघेजण जखमी

>> वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाचा दक्षिण गोव्याला तडाखा सासष्टी, केपे, काणकोण, सांगे या तालुक्यांतील अनेक गावांना काल संध्याकाळी वादळी वार्‍यासह जोरदार पावसाचा तडाखा बसला. याच दरम्यान बाळ्ळी येथे मुंबई – मंगळूर मार्गावरील ट्रेनवर मोठे झाड आदळल्याने एक प्रवासी ठार तर दोघेजण जखमी झाले. मात्र अन्यत्र कोठेही जीवितहानीचे वृत्त नाही. वादळीवार्‍यामुळे अनेक भागांमध्ये झाडांची बर्‍याच प्रमाणात पडझड झाली. झाडे पडल्याने घरांचे ... Read More »

पर्रीकर मे महिन्यात गोव्यात

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर अमेरिकेतील उपचार पूर्ण करून येत्या मे महिन्यात गोव्यात परतणार असल्याचे भाजपतर्फे काल अधिकृतरित्या सांगण्यात आले. भाजपचे सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर सध्या अमेरिकेत उपचार चालू असून उपचारांना ते चांगला प्रतिसाद देत आहेत. आता त्यांची प्रकृती सुधारत आहे. आपल्यावरील सगळे उपचार पूर्ण करून पर्रीकर हे पुढील महिन्यात गोव्यात ... Read More »

वाहतूक नियमभंगप्रकरणी २१ हजार ८७२ जणांस दंड

वाहतूक पोलीस विभागाच्या वाहतूक पहारेकरी योजनेअर्ंतंगत मागील तीन महिन्यात २१,८७२ जणांना वाहतूक नियम भंग प्रकरणी दंड ठोठावण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांच्या वाहतूक पहारेकर्‍यांची संख्या २१६६ एवढी झाली आहे. जानेवारी २०१८ पासून वाहतूक नियमांचा भंग करणार्‍या वाहन चालकावर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. वाहतूक पहारेकर्‍याकडून वाहतूक नियमांचा भंग करणार्‍याची छायाचित्रे, व्हिडिओ क्लीप वाहतूक विभागाकडे पाठविले जातात. Read More »

ग्रेटर पणजीप्रश्‍नी भाजपचा गोवा फॉरवर्डला पूर्ण पाठिंबा

ग्रेटर पणजी पीडीएप्रश्‍नी भाजपचा गोवा फॉरवर्ड पार्टीला पूर्ण पाठिंबा आहे, असे काल भाजपचे सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सरकारातील घटक पक्षाचे नेते व नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई हे ग्रेटर पीडीएप्रश्‍नी योग्य काय तो निर्णय घेतील असा आम्हाला विश्वास असून याप्रश्‍नी भाजप सरदेसाई यांच्या पाठीशी राहणार असल्याचे तानावडे यांनी स्पष्ट केले. ग्रेटर पणजी पीडीए प्रश्‍नावरून गोवा फॉरवर्ड ... Read More »

भाजप आमदाराच्या भावास उन्नाव बलात्कारप्रकरणी अटक

उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथील १८ वर्षीय तरुणीवरील सामूहिक बलात्कारप्रकरणी तसेच रविवारी पीडीतेच्या वडिलांच्या मृत्यूप्रकरणी पीडीतेने आरोप केलेल्या भाजप आमदार कुलदिप सिंग सेंगार यांचा भाऊ अतुल सिंग याला काल पोलिसांनी अटक केली. तसेच या सर्व प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. पीडीत तरुणीने आमदार कुलदिप सिंग व त्यांच्या भावांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. तसेच ... Read More »

पाक सैनिकांच्या हल्ल्यात भारताचे २ जवान शहीद

जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेनजीक पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या मोठ्या प्रमाणातील उखळी तोफांच्या वर्षावामुळे भारताचे दोन सैनिक शहीद झाले. रायफलमॅन विनोद सिंग व जाकी शर्मा अशी या शहीद सैनिकांची नावे आहेत. काल संध्या. ५.१५ वा. दरम्यान सुंदरबनी क्षेत्रात पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय हद्दीत स्वयंचलीत बंदुकांच्या गोळीबारासह उखळी तोफांचा जोरदार मारा केला अशी माहिती लष्करी सूत्रांनी दिली. त्यानंतर भारतीय लष्करानेही या हल्ल्यात ... Read More »

हीना सिद्धूची सुवर्ण कमाई

ऑस्ट्रेलियात सुरू असणार्‍या २१व्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारताची अनुभवी महिला नेमबाज हीना सिद्धूने मंगळवारी झालेल्या महिला नेमबाजीच्या २५ मीटर रॅपिड पिस्तोल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. या पदकासह भारताच्या खात्यातील सुवर्णपदकांची संख्या ११ वर पोहोचली आहे. गोल्ड कोस्टमधील हीनाचे हे दुसरे पदक असून १० मीटर एअर पिस्तोल प्रकारात हीनाला रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले होते. मंगळवारी झालेल्या नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या २५ ... Read More »