ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: April 10, 2018

उपवास की उपहास?

देशातील नरेंद्र मोदी सरकार दलितविरोधी असल्याचा आरोप करीत कॉंग्रेसने पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात सद्भावना उपोषण केले खरे, परंतु उपोषणाआधी दिल्लीतील पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी हॉटेलमध्ये छोले भटुर्‍यांवर ताव मारतानाचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने कॉंग्रेसची अब्रू गेली आहे. उपोषणासारख्या अहिंसक सत्याग्रहाच्या माध्यमातून एकेकाळी गांधीजींनी ब्रिटीश सरकारला नमवले. साधा पंचा नेसणार्‍या त्या फकिराने केवळ उपोषणाचे आत्मक्लेश सोसून देशभरामध्ये आपला विचार ... Read More »

सपा – बसपा एकत्र आल्याने भाजपला आव्हान

देवेश कु. कडकडे (डिचोली) भाजपाला २०१९ च्या लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यांत आपली सत्ता राखण्याबरोबरच कर्नाटकमध्येही पुनश्‍च सत्तेवर येण्याची किमया साधावी लागेल, कारण या राज्यातील निवडणुका उपांत्य फेरी म्हणून गणल्या जातील… उत्तर प्रदेश आणि बिहारच्या पोटनिवडणुकीत समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलाने यश मिळवून भाजपाचे विजयाच्या दिशेने चालणारे एक पाऊल रोखून धरले आणि सततच्या ... Read More »

वाहतूक खाते आता पूर्णपणे ऑनलाईन व कॅशलेस

>> वाहतूक संचालक निखिल देसाईंची माहिती; रोख रकमेचा पर्यायही खुला पूर्णपणे ऑनलाईन व ‘कॅशलेस’ व्यवहार करू देण्याची सुविधा असलेले वाहतूक खाते हे राज्यातील पहिले सरकारी खाते बनले आहे. त्यासाठी नव्याने पुनर्रचना करण्यात आलेल्या खात्याच्या वेबसाईटचा काल मंत्रालयात मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला. यापुढे रस्ता कर, प्रवाशी कर, चेक नाक्यांवरील कर आदी करांसह, वाहन नोंदणी शुल्क, वाहन परवाना ... Read More »

कारवारच्या आमदारास दुसर्‍यांदा समन्स जारी

गुन्हा अन्वेषण विभागाच्या खास तपास पथकासमोर खाण घोटाळा प्रकरणाच्या चौकशीसाठी कारवारचे अपक्ष आमदार संतीश सैल काल अनुपस्थित राहिले. आमदार सैल यांना शुक्रवार १३ एप्रिल रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी दुसरा समन्स काल जारी करण्यात आला आहे. एसआयटीने बहुचर्चित खाण घोटाळा प्रकरणाच्या तपासासाठी कारवारचे अपक्ष आमदार संतीश सैल यांना सोमवारी सकाळी ११ वाजता रायबंदर येथील कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावला होता. ... Read More »

आत्महत्येच्या प्रयत्नातील तरुणीच्या वडिलांचा न्यायालयीन कोठडीत मृत्य

>> दोन पोलीस अधिकार्‍यांसह चौघे निलंबित उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या बलात्कार पीडित तरुणीच्या वडिलांचे काल रात्री न्यायालयीन कोठडीत निधन झाले. सदर तरुणीने भाजपचे उन्नावचे आमदार कुलदिप सिंग सेंगार यांनी गेल्या वर्षी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप करून रविवारी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. गेले वर्षभर अत्याचारविरोधात न्यायासाठी संघर्ष करुनही कोणीही दखल घेत नसल्याने आत्महत्येचा प्रयत्न ... Read More »

गोवा डेअरीचे एमडी सावंतांवर अध्यक्षांकडून घोटाळ्याचा आरोप

गोवा डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. नवसो सावंत यांनी आईस्क्रीम व पशूखाद्य प्रकल्पात लाखो रुपयांचा घोटाळा केला असून स्टिंग ऑपरेशनात स्वतः सावंत यांनी लाखो रुपये घेतल्याचे कबूल केले आहे. असा दावा करून सरकारने याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी गोवा डेअरीचे अध्यक्ष माधव सहकारी यांनी काल पत्रकार परिषदेत केली. काही महिन्यांपूर्वी नवीन यंत्रणा खरेदी करण्यासाठी व्यवस्थापकीय संचालकाने २.१७ कोटी रुपयांची निविदा ... Read More »

प्रदेश कॉंग्रेस समितीकडून दलितांवरील अन्यायाचा निषेध

गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीने देशातील काही भागात दलितांवरील होणार्‍या अन्यायाचा निषेध करण्यासाठी काल आझाद मैदानावर सहा तास उपोषण केले. कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी दलितांवरील अन्यायाचा निषेध करण्यासाठी देशपातळीवर उपोषण आंदोलन करण्याची सूचना केली. या निषेध उपोषणात गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष शांताराम नाईक, विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर, आमदार लुईझीन फालेरो, माजी मुख्यमंत्री फ्रान्सीस सार्दिन, आमदार फिलीप नेरी ... Read More »

कॅसिनोतील मद्य चोरीप्रकरणी कर्मचार्‍यास अटक

येथील डेल्टीन जॅक कॅसिनोमधून अंदाजे १ लाख रुपयांच्या मद्याच्या ५० बाटल्या चोरी प्रकरणी कॅसिनोतील कर्मचारी बिटूमन बोरा (२१ वर्षे, मूळ आसाम) याला पणजी पोलिसांनी काल अटक केली. डेल्टीन जॅक कॅसिनोमधून मद्याच्या बाटल्यांच्या चोरी प्रकरणी प्रितेश चोडणकर यांनी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अमिनुल इस्लाम आणि बिटूमन बोरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कॅसिनो जहाजातून मद्याच्या बाटल्या कचर्‍यातून ... Read More »

मेहुलीची रुपेरी कामगिरी

भारताची १७ वर्षीय युवा नेमबाज मेहुली घोष हिने काल सोमवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्यपदक जिंकले. तिने अखेरच्या काही प्रयत्नांत अनुभवी अपूर्वी चंडेला हिला मागे टाकले. सुवर्णपदकसाठी बरोबरी झाल्यामुळे झालेल्या शूटआऊटमध्ये हरल्यामुळे तिला रौप्यवर समाधान मानावे लागले. ग्लास्गोतील राष्ट्रकुल स्पर्धेत याच प्रकारात सुवर्ण जिंकलेल्या २५ वर्षीय अपूर्वीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. आठ खेळाडूंच्या अंतिम फेरीतील ... Read More »

जितूने साधले सुवर्णलक्ष्य

भारताचा अनुभवी नेमबाज जितू राय याने काल सोमवारी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ दाखवत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तोल प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. बेलमॉंट नेमबाजी केंद्रावर झालेल्या या स्पर्धेत भारताच्याच ओम मिथरवाल याने कांस्यपदकाची कमाई केली. चार वर्षांपूर्वी ग्लास्गो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत रायने ५० मीटर एअर पिस्तोल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. पात्रता फेरीत पाचवे स्थान मिळविलेल्या ... Read More »