ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: April 7, 2018

शाळा वाचवूया

राज्यातील चारशेहून अधिक सरकारी प्राथमिक मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असल्याची जी भीती सध्या व्यक्त होत आहे ती अनाठायी नाही. एकेकाळी ह्या सरकारी प्राथमिक मराठी शाळा ही गावोगावी उत्तम, संस्कारी नागरिक घडवणारी केंद्रे होती. गोव्याच्या खेड्यापाड्यामध्ये मुक्तीनंतरच्या कालखंडात मराठी शाळांचे हे जाळे आपल्या तत्कालीन द्रष्ट्या नेत्यांनी आणि अधिकार्‍यांनी निर्माण केले होते. मुक्तिपूर्व काळामध्ये तर गावोगावच्या समाजधुरिणांनी स्वयंप्रेरणेने आपल्या ओसरीवर स्वखर्चाने ... Read More »

आयसिस व अल कायदाचा भारतात चंचूप्रवेश

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) नासीर अहमद पंडितच्या पहिल्या बरसीच्या वेळी चेहर्‍यावर मुखवटा घातलेल्या पाच बंदुकधारी मुजाहिद्दीनांंनी ‘यानंतर जो केवळ अल्लासाठी, खलिङ्गतच्या नावे कुर्बान होईल तोच शहीद मानला जाईल’ हे आयसिस ङ्गर्मान जाहीर केले. हा आयसिसच्या काश्मीरमधील चंचूप्रवेशाचा ओनामा होता. जम्मू – काश्मीरप्रमाणेच केरळ, उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रात आयसिस व अल् कायदाला मिळणारा छुपा पाठिंबा द्रुतगतीने वाढतो आहे. काश्मीरमधील सोपोर ... Read More »

पीडीएतून गावे वगळण्यासाठी सरकारला आठ दिवसांची मुदत

>> विरोधकांचा इशारा >> प्रादेशिक आराखडा २०२१ रद्दची मागणी गोंयकार अगेन्स्ट पीडीएने काल ग्रेटर पीडीएविरोधात आझाद मैदानावर आयोजित जाहीर सभेत जोरदार शक्तिप्रदर्शन करून पीडीएतून गावे वगळण्यासाठी सरकारला आठ दिवसांची मुदत दिली. अन्यथा, ही मागणी मान्य करून घेण्यासाठी आक्रमक भूमिका घ्यावी लागणार आहे, असा इशारा गोंयकार अगेन्स्ट पीडीएचे निमंत्रक आर्थुर डिसोझा यांनी सभेत बोलताना दिला. पीडीए विरोधातील सभेला सांताक्रुझ, सांत आंद्रे ... Read More »

सर्वण, डिचोली येथे कारने कदंब बसला धडक दिल्यानंतर पेटलेली कार. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या कारचालकाचे उपचार सुरू असताना गोमेकॉत निधन झाले. Read More »

केंद्र सरकारच्या विकास योजनेंतर्गत कोलवा किनार्‍याचे सौंदर्य खुलणार

भारत सरकारच्या पर्यटन खात्याच्या प्रसिद्ध पर्यटन स्थळ विकास प्रकल्पांतर्गत विकास करण्यात येणार्‍या देशातील १२ समुद्र किनार्‍यांमध्ये दक्षिण गोव्यातील कोलवा समुद्र किनार्‍याचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे पर्यटन, सामाजिक विकास आणि साधन सुविधांच्या विकासाला हातभार लागणार आहे. कोलवा समुद्र किनार्‍याचा विकासाचा मास्टर प्लॅन सर्वांना विश्‍वासात घेऊन तयार केला जाणार आहे. केंद्रीय पर्यटन खात्याच्या सचिव रश्मी वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पर्यटन भवनात ... Read More »

विधिमंडळ वार्तांकनाच्या जाचक अटींना एडिटर्स गिल्डचा कडाडून विरोध

>> सर्व संपादक एकवटले; सभापतींना निवेदन देणार गोवा विधानसभेच्या कामकाजाच्या वार्तांकनासंदर्भात विधिमंडळ सचिवालयाने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांना पूर्णपणे रद्दबातल करण्यात यावे अशी मागणी गोवा एडिटर्स गिल्डच्या वतीने राज्यातील सर्व वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांच्या संपादकांनी काल झालेल्या बैठकीत केली. राज्यातील सर्व प्रमुख दैनिके आणि वृत्तवाहिन्यांचे तेरा संपादक या बैठकीत सहभागी झाले होते. एडिटर्स गिल्डतर्फे सभापती डॉ. प्रमोद सावंत यांना एक औपचारिक ... Read More »

‘ब्रेन डेड्’ झालेल्या रुग्णाचे अवयव प्रत्यारोपणासाठी विमानाने मुंबईला

दोनापावला येथील मणिपाल इस्पितळातील एका मेंदू मृत झालेल्या रुग्णाची मूत्रपिंडे व यकृत काढून काल प्रत्यारोपणासाठी विमानाने मुंबईला पाठवण्यात आली. त्यासाठी काल दोनापावला ते विमानतळ मार्गाचे रुपांतर ग्रीन कॉरिडोरमध्ये करण्यात आले होते. हे अवयव नंतर चार्टर विमानाने मुंबईला प्रत्यारोपणासाठी पाठवण्यात आले. गोव्यातून प्रत्यारोपणासाठी जिवंत अवयव अन्य राज्यात पाठवले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. बीएसआर (नाव गुप्त ठेवण्यात आले आहे) या मेंदू ... Read More »

संजिताला सुवर्ण, दीपकला कांस्य

संजिता चानूने काल शुक्रवारी भारताला यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. तिने महिलांच्या वेटलिफ्टिंगमध्ये ५३ किलो वजनी गटात १९२ किलो वजन उचलून ही सुवर्ण कामगिरी केली. यामुळे भारताच्या सुवर्णपदकांची संख्या आता दोन झाली आहे. याआधी मीराबाई चानूने गुरुवारी राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये सोनेरी कामगिरी केली आहे. त्यामुळे आता दोन सुवर्णपदकांमुळे देशाचा तिरंगा अभिमानाने उंच फडकला आहे. दीपक लाथेरने पुरुषांच्या ... Read More »

अमित नमनची घोडदौड

भारतीय बॉक्सिंगपटू अमित फंगल (४९ किलो) व नमन तन्वर (९१ किलो) यांनी काल शुक्रवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. काल या द्वयीने आपापल्या बाऊटमध्ये प्रतिस्पर्ध्यांवर एकतर्फी विजय प्राप्त केला. तन्वर याने दुपारच्या सत्रात तांझानियाच्या हारुना म्हांडो याला पराजित करत ‘अंतिम ८’ खेळाडूंत स्थान मिळविले तर अमितने संध्याकाळच्या सक्षात घानाच्या तातेह सुलेमानू याला हरविले. या लढतीत पंचांनी अमितच्या बाजूने ... Read More »

स्कॉटलंडचा ५-० असा खुर्दा

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या मिश्र सांघिक बॅडमिंटन प्रकारात भारताने काल शुक्रवारीदेखील आपली अपराजित घोडदौड कायम राखत स्कॉटलंडचा ५-० असा पराभव करत ‘अ’ गटात अव्वल स्थानासह उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाने महिला एकेरीचा सामना जिंकून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. ज्युली मॅकफेरसन हिचा तिने २१-१४, २१-१२ असा एकतर्फी पराभव केला. विजयासाठी तिला अधिक घाम गाळावा लागला नाही. ... Read More »