ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: April 6, 2018

दबंगगिरीला धडा

चंदेरी पडद्याप्रमाणेच प्रत्यक्ष जीवनातही दबंगगिरी करीत आलेला अभिनेता सलमान खान याला काल काळवीट हत्याप्रकरणी जोधपूरच्या न्यायालयाने पाच वर्षांच्या तुरुंगवासाची सजा सुनावली. मात्र, आज सत्र न्यायालयात त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे आज तो जामीनमुक्त होण्याची शक्यता आहे. सलमानविरुद्धच्या आजवरच्या सर्व प्रकरणांत शेवटी तो निर्दोष मुक्त होत आला आहे. मुंबईत ‘हिट अँड रन’ प्रकरणात एकाच्या मृत्यूस आणि चौघांना जायबंदी होण्यास ... Read More »

समाजवादी कार्यकर्त्यांचे आधारवड ः भाई वैद्य

शंभू भाऊ बांदेकर ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते भाई वैद्य यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या एका स्नेह्याने त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा – ‘तुम्ही लढायची तयारी ठेवा, जिथे जिथे म्हणून अन्याय, अत्याचार, जुलूम होत असेल, तिथे तिथे आम्ही तुमच्या सोबत आहोत’ असे सामान्यातल्या सामान्य माणसाला बळ देणारे आणि त्यासाठी तन, मन, धनपूर्वक कार्यरत असणारे ज्येष्ठ समाजवादी नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री भाई ... Read More »

काळवीट शिकार प्रकरणी सलमान दोषी

>> पाच वर्षांची शिक्षा, सहकार्‍यांची निर्दोष सुटका >> जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी दोन दशकांपूर्वीच्या काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानसाठी धक्कादायक निकाल आला असून जोधपूर न्यायालयाने या प्रकरणी दोषी ठरवत ५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच १० हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. जोधपूर ग्रामीण जिल्हा मुख्य न्यायदंडाधिकारी देवकुमार खत्री यांनी हा निकाल दिला. सलमानला याप्रकरणात पाच वर्ष तुरुंगात जावेच ... Read More »

लीज क्षेत्राबाहेरील खनिज वाहतूक करण्याविषयी एजींचा सल्ला घेणार

>> मंत्रिमंडळ सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय मंत्रिमंडळ सल्लागार समितीच्या काल झालेल्या बैठकीत रॉयल्टी भरलेल्या आणि लीज क्षेत्राबाहेरील खनिज वाहतुकीला परवानगी देण्याबाबत ऍडव्होकेट जनरल यांचा सल्ला घेण्याची सूचना करण्यात आली आहे. दरम्यान, सीएसीने सरकारला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जेटी ते बंदरापर्यंत खनिज वाहतूक करण्यास सुरू करण्याचा सल्ला दिला आहे. खाण व भूगर्भ खात्याने मंत्रिमंडळ सल्लागार समितीसमोर रॉयल्टी भरलेल्या खनिजाच्या वाहतुकीला परवानगी देण्याबाबत ... Read More »

फोंडा पालिका निवडणूक २९ एप्रिल रोजीच होणार

>> स्थगिती याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली फोंडा नगरपालिकेच्या २९ एप्रिल रोजी होणार्‍या निवडणुकीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने नकार दिला आहे. उच्च न्यायालयाने या नगरपालिकेतील आरक्षणाविरोधातील याचिका दाखल करून घेतली आहे. या याचिकेवरील सुनावणी उन्हाळी सुट्टीनंतर होणार आहे. दरम्यान, फोंडा नगरपालिका क्षेत्रात शुक्रवार ६ एप्रिल पासून निवडणूक आचारसंहिता लागू होत आहे. याच दिवसापासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ होणार ... Read More »

ग्रेटर पीडीएविरोधात आज शक्तिप्रदर्शन

‘गोयकार अगेन्स्ट पीडीए’ने ग्रेटर पीडीएच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी ६ एप्रिल रोजी संध्याकाळी ३.३० वाजता आझाद मैदानावर जाहीर सभेचे आयोजन केले आहे. दरम्यान, शहरात जमावबंदीचा आदेश लागू असल्याने पीडीए विरोधकांना मोर्चा काढता येणार नाही. सांताक्रुझ आणि सांत आंद्रे मतदारसंघांतील पीडीए विरोधकांनी गोंयकर अगेन्स्ट पीडीएची स्थापना केली आहे. या दोन्ही मतदारसंघांतील सर्व गावे ग्रेटर पणजी पीडीएतून वगळण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. ... Read More »

विधिमंडळ वार्तांकनासाठीचा ‘तो’ मसुदा कच्चा : सभापती

विधानसभा कामकाजाच्या वार्तांकनाबाबत संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली मार्गदर्शक तत्त्वे हा केवळ कच्चा मसुदा आहे. सर्वांना विश्‍वासात घेऊन वार्तांकनासाठी अंतिम मार्गदर्शक तत्त्वे निश्‍चित केली जाणार आहेत, अशी माहिती सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. विधानसभा वार्तांकनासाठी मार्गदर्शक तत्त्वाच्या प्रश्‍नावर माघार घेणार नाही. पत्रकार संघटना, पीएसीकडून याबाबत योग्य सूचना घेऊन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आवश्यक दुरुस्ती केली जाणार आहे. सुरक्षा व्यवस्थेच्या ... Read More »

रेरा’अंतर्गत नोंदणीसाठी दुसर्‍यांदा मुदतवाढ

>> दंड आकारून १ जुलैपर्यंत नोंदणीची मुभा गोवा रिअल इस्टेट रेग्युलेटरी प्राधिकरणाने (रेरा) चालू असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांच्या नोंदणीसाठी दुसर्‍यांदा मुदतवाढ दिली असून १ जुलै २०१८ पर्यंत दंड आकारून नोंदणीसाठी अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. दरम्यान, रेराअंतर्गत आत्तापर्यंत केवळ २३ एजंट आणि ४३ इमारत प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. चालू असलेल्या प्रकल्पांच्या नोंदणीसाठी १ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत १ लाख ... Read More »

मीराबाईला सुवर्णपदक

मीराबाई चानू हिने महिलांच्या वेटलिफ्टिंगमध्ये ४८ किलोवजनी गटात सुवर्णपदक मिळवून यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. केवळ चार फूट ११ इंच उंचीच्या मीराबाईने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना तब्बल २६ किलोंनी मागे टाकले. २०१४ सालापर्यंत चानूला केवळ १६५ ते १७० किलोंदरम्यान सातत्याने वजन उचलता येत होते. यानंतर मात्र तिने कमालीची मेहनत घेत आपली क्षमता वाढवली. २०० किलोंचे वजन उचलण्याचे लक्ष्य मीराबाईने ... Read More »

पी.गुरुराजाला रौप्य

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या शुभारंभी दिनी भारताचा वेटलिफ्टर गुरुराजा याने ५६ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावत भारताचे पदकांचे खाते उघडले. गुरुराजाने पहिल्या प्रयत्नात १११ किलो वजन उचलले. उत्तरोत्तर त्याने ही कामगिरी उंचावत नेली आणि तिसर्‍या प्रयत्नात २४९ किलो उचलत त्याने स्वत:चाच विक्रम मोडला. मलेशियाच्या मोहम्मद इझार याने २६१ किलो वजन उचलून सुवर्णपदकावर नाव कोरले. तर, श्रीलंकेच्या चतुरंग लकमल याने २४८ ... Read More »