ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: April 5, 2018

तुघलकी फर्मान

राजकारण्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली की पहिली गोष्ट केली जाते ती म्हणजे विरोधी स्वर दडपण्याचा प्रयत्न होतो. त्यात सर्वप्रथम स्वतंत्र बाण्याच्या माध्यमांचा गळा घोटण्याचा प्रयत्न होतो. आपल्या देशामध्येही हेच घडत आले आहे. इंदिरा गांधींच्या सत्तेला सुरुंग लागताच त्यांनी आणीबाणी पुकारून पत्रकारांविरुद्ध दमनसत्र अवलंबिले. राजीव गांधींच्या ‘बोफोर्स’ प्रकरणाच्या खोलात पत्रकार शिरू लागताच बदनामी विरोधी कायद्याच्या नावाखाली दडपशाहीचा अयशस्वी प्रयत्न झाला. विद्यमान ... Read More »

नव्या शीतयुद्धाच्या दिशेने…

शैलेंद्र देवळाणकर अलीकडेच इंग्लंडमध्ये सेरजी स्क्रिपल या एका डबल एजंटवर विषप्रयोग करण्यात आला. त्यानंतर ब्रिटन व अमेरिकेसह १८ देशांनी जवळपास १०० रशियन राजदूतांना काढून टाकले. शीतयुद्धानंतर एखाद्या राष्ट्राच्या विरोधामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणाव झालेली ही पहिलीच सामूहिक कारवाई आहे. यातून नव्या जागतिक शीतुयद्धाला प्रारंभ झालेला आहे… जागतिक राजनैतिक संबंधांमध्ये एक ऐतिहासिक घडामोड नुकतीच घडली. जवळपास १८ देशांनी रशियाच्या १२६ हून अधिक ... Read More »

जेटी, बंदर व बार्जेसमधील खनिज वाहतुकीस परवानगी

>> सर्वोच्च न्यायालयाचा आदेश >> खाणींजवळील खनिजाला निर्बंध सर्वोच्च न्यायालयाने काल अत्यंत मर्यादित प्रमाणात खनिज वाहतुकीस परवानगी देताना खाण लिजधारकांनी १५ मार्चपूर्वी किंवा १५ मार्च रोजीपर्यंत खनिजाचे उत्खनन करून जेटी, बंदर अथवा खनिजवाहू बार्जेसमध्ये ठेवलेल्या खनिजाची वाहतूक करता येईल, असा आदेश देत याचिका पुन्हा उच्च न्यायालयाकडे वर्ग केली. या आदेशामुळे खाण बंदीच्या आदेशानंतर राज्यातील खाण मालकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. ... Read More »

१०२१ मद्यालये पुन्हा सुरू करण्याचा मार्ग मोकळा

>> नूतनीकरणास सरकारचा हिरवा कंदील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद असलेल्या राज्यातील १३३२ मद्यालयांपैकी १०२१ मद्यालये पुन्हा सुरू होण्यासाठीचा मार्ग काल मोकळा झाला. या १०२१ मद्यालयांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्याचा आदेश सरकारने काल अबकारी खात्याला दिला आहे. नगरविकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय मंत्र्यांच्या समितीने काल आपल्या बैठकीनंतर बंद असलेल्या १३३२ मद्यालयांपैकी १०२१ मद्यालयांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्यास ... Read More »

प्रादेशिक आराखडा २०२१ ः भाजपकडून जनतेची फसवणूक

>> स्पष्टीकरण देण्याची कॉंग्रेसची मागणी भाजपने प्रादेशिक आराखडा २०२१ ला विरोध केला होता. २०१२ च्या विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात प्रादेशिक आराखडा २०२१ रद्द करून नवीन प्रादेशिक आराखडा तयार करण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सध्या अमेरिकेत वैद्यकीय उपचार घेत असताना सहा वर्षे प्रलंबित ठेवलेला जुनाच प्रादेशिक आराखडा राबविण्याच्या कामाला सुरुवात करून जनतेची मोठी फसवणूक केली जात आहे. यावर भाजपने ... Read More »

लक्ष्मीकांत पार्सेकरांना लोकायुक्तांची नोटीस

>> खाणपट्ट्यांचे बेकायदा नूतनीकरण लोकायुक्त पी. के. मिश्रा यांनी खाण लीज नूतनीकरण प्रकरणी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी खाण सचिव पवन कुमार सेन, खाण खात्याचे संचालक प्रसन्न आचार्य यांना नोटीस बजावली असून ७ मेपर्यंत उत्तर देण्याचा आदेश काल दिला. लोकायुक्तांकडे गोवा फाउंडेशनने ८८ खाणींच्या लीज नूतनीकरण प्रकरणी तक्रार केली आहे. गोवा फाउंडेशनने सर्वोच्च न्यायालयात राज्यातील दुसर्‍या टप्प्यातील खाण लीज नूतनीकरण ... Read More »

एटीएम ग्राहकांच्या हितरक्षणासाठी पोलीस खात्याची कडक नियमावली

पोलीस खात्याने एटीएमच्याद्वारे पैसे काढण्यात येत असल्याच्या ग्राहकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन एटीएमचा वापर करणार्‍या ग्राहकांच्या हितरक्षणासाठी सुरक्षा उपाय आणखीन कडक करण्याच्या सूचना बँकांना केल्या आहेत. एटीएम ग्राहकांच्या कार्डांची माहिती स्किमर किंवा कॅमेर्‍याद्वारे चोरून परस्पर पैसे काढण्याची अनेक प्रकरणे उजेडात आली आहेत. पोलिसांनी या प्रकरणी एका विदेशी नागरिकाला सुध्दा अटक केली होती. त्यामुळे बँकांना सूचनांचे कडक पालन करण्याचे निर्देश देण्यात ... Read More »

विधिमंडळ वार्तांकनासाठीच्या अटी शिथिल करण्यास तयार

>> सभापती डॉ. प्रमोद सावंत यांची ग्वाही विधानसभा कामकाजाच्या वार्तांकनाबाबत जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे जाचक वाटत असतील व त्यासंबंधी वृत्तपत्र सल्लगार समिती अथवा पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी यांनी चर्चा केल्यास त्यातील काही अटी शिथिल करणे शक्य असल्याचे सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी काल स्पष्ट केले. विधानसभेतील पत्रकार गॅलरीत प्रवेश करण्यासाठी पास देण्यास आम्ही जी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत ती पत्रकारांना ... Read More »

सत्तरीत बंद पडणार्‍या १९ मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी शाळा संरक्षण अभियान

>> मराठी शाळांच्या रक्षणासाठी गोवा मराठी अकादमीचा पुढाकार गोव्याच्या गावोगावी मराठी शाळा बंद पडत चालल्याने चिंता व्यक्त होत असतानाच आता या बंद पडणार्‍या सरकारी मराठी प्राथमिक शाळा वाचवण्यासाठी गोवा सरकारच्याच गोवा मराठी अकादमीने प्रयत्न सुरू केले असून पहिल्या टप्प्यात सत्तरी तालुक्यातील यंदा बंद पडणार्‍या १९ मराठी शाळा वाचवण्यासाठी ‘मराठी शाळा संरक्षण अभियान’ सुरू केले आहे. सत्तरी तालुक्यातील जवळजवळ १९ मराठी ... Read More »

नेत्रदीपक सोहळ्याने राष्ट्रकुल स्पर्धेचे उद्घाटन

ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट शहरात २१व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेस दिमाखदार सोहळ्याने प्रारंभ झाला. कॅरारा स्टेडियमवर हा रंगतदार उद्घाटन सोहळा पार पडला. नेत्रदीपक असा हा सोहळा ठरला. या उद्घाटन सोहळ्यात गायन, संगीताच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियाची कला, आणि पुरातन संस्कृतीची नेत्रदीपक झलक दाखवण्यात आली. या सोहळ्यातील रंगतदार कार्यक्रमांनी संपूर्ण जगताला मंत्रमुग्ध केले. या उद्घाटन सोहळ्यात ब्रिटनचा प्रिन्स चार्ल्सने ब्रिटनच्या महाराणीतर्फे राष्ट्रकुल स्पर्धेचा शुभारंभ झाल्याची ... Read More »