ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: April 4, 2018

प्रक्षोभ शमवा

ऍट्रॉसिटी कायद्यासंदर्भात आपण दिलेल्या निवाड्याला स्थगिती देण्यास नकार देऊन सर्वोच्च न्यायालयाने फेरविचार याचिका दाखल करणार्‍या केंद्र सरकारला काल फटकारले. जे लोक विविध राज्यांमध्ये आपल्या निवाड्याविरुद्ध आंदोलन करीत आहेत, त्यांनी मूळ निवाडा वाचलेलाही नसेल ही न्यायालयाने केलेली टिप्पणी खरी मानावी लागेल अशीच परिस्थिती दिसते आहे. ऍट्रॉसिटी कायद्याखाली कोणालाही तक्रारीची शहानिशा न करता अटक करण्याची सदर कायद्यातील तरतूद सर्वोच्च न्यायालयाने वगळली होती ... Read More »

ऍट्रॉसिटी कायदा सक्षम का हवा?

ऍड. असीम सरोद दलित समाजातील मूठभर लोकांनी स्वत:चा वापर या कायद्याचा गैरवापर करण्यासाठी करू दिला हे वास्तव असले तरीही ज्यांच्यापर्यंत हा कायदा पोहोचावा अशा अनेकांपर्यंत कायद्याच्या मदतीचे हात पोहोचलेले नाहीत ही हकीकत लक्षात घ्यावी लागेल. सध्या चाललेल्या ऍट्रॉसिटी वादाची दुसरी बाजू मांडणारा हा लेख- ऍट्रोसिटीच्या प्रकरणांमध्ये तक्रारींबाबत असलेल्या संशयित आरोपींना त्वरित अटक करण्याची कडक तरतूद वितळवून ती सौम्य करण्याच्या सर्वोच्च ... Read More »

उत्खनन केलेल्या खनिज वाहतुकीस परवाना द्या

>> आज सुप्रिम कोर्टात सुनावणी उत्खनन करण्यात आलेल्या खनिजाची वाहतूक करण्यास परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी वेदांता कंपनीने (सेझा) सर्वोच्च न्यायालयात एक विशेष याचिका दाखल केली असून ह्या याचिकेवर आज (बुधवारी) सुनावणी होणार आहे. दरम्यान, ह्या पार्श्‍वभूमीवर काल तीन सदस्यीय मंत्रिमंडळ सल्लागार समितीची बैठक झाली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री फ्रान्सिस डिसोझा म्हणाले की, राज्यातील खाण उद्योग बंद होण्यापूर्वी खाण कंपन्यांनी ... Read More »

ग्रेटर पीडीएविरोधात उद्या पणजीत मोर्चा

>> निमंत्रक आर्थुर डिसोझा यांची पत्रकार परिषदेत माहिती सांताक्रुझ व ताळगाव ह्या मतदारसंघांतील सर्व पंचायती व गावे ग्रेटर पणजी पीडीएतून वगळण्यात यावीत ही आमची मागणी अद्याप मान्य करण्यात आलेली नसल्याने परवा ६ एप्रिल रोजी ठरल्याप्रमाणे पणजीत ‘गोंयकार अगेन्स्ट पीडीए’तर्फे मोर्चा आणण्यात येणार असल्याचे निमंत्रक आर्थुर डिसोझा यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. मोर्चात ५ ते ६ हजार लोक सहभागी होणार ... Read More »

ग्रेटर पीडीएतून ताळगाव वगळा

दत्तप्रसाद नाईक ग्रेटर पणजी पीडीएतून ताळगावला वगळण्यात यावे, अशी मागणी काल भाजप नेते दत्तप्रसाद नाईक यांनी पत्रकार परिषदेतून बोलताना केली. ताळगाववासीयांना ताळगावचा अंदाधुंद विकास झालेला नको आहे. ताळगावमधील शेत जमिनी बुजवून ह्यापूर्वीच इमारती उभ्या झालेल्या आहेत. ताळगावात आवश्यक त्या साधनसुविधा नाहीत. पाण्याची समस्या आहे, कचरा समस्या आहे. तेथे बाजार प्रकल्प नाही. ताळगावात साधनसुविधांचा विकास केल्याशिवाय तेथे पीडीएद्वारे अंदाधुंद विकास केल्यास ... Read More »

पीडीएविरोधी आंदोलन सरकार अस्थिर करण्यासाठी

>> मंत्री विजय सरदेसाईंचा आरोप पीडीएविरोधी आंदोलन हे सरकार अस्थिर करण्यासाठी सुरू केलेले आंदोलन आहे, असा आरोप काल नगर आणि नियोजन खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना केला. पीडीएविरोधी आंदोलनासाठी राज्यातील चर्च संस्थेचा वापर काही जण करून घेऊ लागलेले असून गुड फ्रायडेच्या दिवशी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी आलेल्या लोकांना पीडीएविरोधी मोर्चात (६ एप्रिल रोजीच्या) सहभागी होण्यासाठी सूचित करण्यात आल्याची माहिती आपणाला ... Read More »

पत्रकारांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्याचा मोदींचा आदेश

खोटी बातमी प्रसिद्ध केल्यास पत्रकारांची मान्यता रद्द करण्याचा माहिती व प्रसारण खात्याचा निर्णय मागे घेण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. पत्रकारांच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार सर्वस्वी प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया व पत्रकार संघटनांचा आहे. तो त्यांच्यावरच सोपविण्यात यावा, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे. माहिती व प्रसारण खात्याने पत्रकारांच्या मान्यतेसंबंधी सुधारित नियमावली जारी केली होती. एखाद्या पत्रकाराने पहिल्यांदा खोटी ... Read More »

विधानसभा वृत्तांकन : जाचक अटींमुळे प्रसार माध्यमे अडचणीत

राज्य विधानसभेच्या वृत्तांकनासाठी सरकारने नव्याने नियमावली जारी केली असून सदर नियमावलीमुळे बरीच वर्तमानपत्रे, न्यूज चॅनल्स, साप्ताहिके, पाक्षिके, मासिके तसेच न्यूज पोर्टल, वेबसाइट्‌सना वृत्तांकन करणे अशक्य होणार आहे. यामुळे पत्रकारांमध्ये खळबळ माजली असून श्रमिक पत्रकार संघटनेने सदर नियमावली मागे घेण्याची मागणी केली आहे. नवया नियमावलीमुळे १५ हजार दैनंदिनी खप असलेल्या दैनिकाच्या प्रतिनिधीला विधानसभेचे वृत्तांकन करण्यास प्रवेश दिला जाणार आहे. या अटीमुळे ... Read More »

ऍट्रॉसिटी कायदा निर्णयाला स्थगितीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

>> पुढील सुनावणी ११ रोजी ; पक्षकारांना तीन दिवसांत बाजू मांडण्याचे आदेश ऍट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात पुकारलेल्या भारत बंदला हिंसक वळण मिळाल्याने केंद्र सरकारने दाखल केलेल्या फेरविचार याचिकेवर काल दुपारी सुनावणी झाली. त्यावेळी ‘आम्ही या कायद्याविरोधात नाही. मात्र, यामुळे निरपराधांना शिक्षा व्हायला नको,’ असे व्यक्त करीत सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयाला स्थिगिती देण्यास नकार दिला. त्याचबरोबर या प्रकरणी जे ... Read More »

आाफ्रिकेने केली कांगारूंची शिकार

>> चौथा कसोटी सामना ४९२ धावांनी जिंकला न्यू वॉंडरर्स मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने कांगारूंवर ४९२ धावांनी मोठा विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने कांगारूंना विजयासाठी ६१२ धावांचे डोंगराएवढे आव्हान दिले होते. मंगळवारी पाचव्या दिवशी आफ्रिकेच्या धारदार गोलंदाजीपुढे कांगारूंचे फलंदाज तग धरू शकले आणि त्यांचा संपूर्ण डाव फक्त ११९ धावांमध्ये आटोपला. या विजयासह आफ्रिकेने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ३-१ असा विजय ... Read More »