ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: April 3, 2018

गरज विवेकाची

महाराष्ट्रातील दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या म्हणजेच ऍट्रॉसिटी कायद्याच्या दोन तरतुदींना सर्वोच्च न्यायालयाने हरकत घेतल्याने त्याविरुद्ध दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान काल अनेक राज्यांमध्ये हिंसाचार झाला. खुद्द महाराष्ट्रापेक्षा इतर राज्यांमध्येच या हिंसाचाराची तीव्रता अधिक होती. या आंदोलनाच्या दबावाखाली येत सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निवाड्याविरोधात सर्वंकष फेरविचार याचिका दाखल करण्याचे तातडीचे पाऊल उचलले आहे. एखाद्या गोष्टीचे राजकारण सुरू झाले की सारासार ... Read More »

प्लास्टिक बंदीत आपलाही सहभाग हवा…

देवेश कु. कडकडे (डिचोली) गोवा सरकारने प्लास्टिक बंदीच्या कार्यवाहीच्या दिशेने पावले टाकायला सुरूवात केलेली आहे, परंतु जोवर आपण नागरिक त्याबाबत सक्रिय होत नाही, तोवर अशा मोहिमा यशस्वी होणे कठीण असेल.. ‘वापरा आणि फेकून द्या’ ही संस्कृती समाजात रुजल्यामुळे सगळीकडे टाकाऊ कचर्‍याचा प्रश्‍न बिकट होत चालला आहे. वेगाने होणार्‍या शहरीकरणामुळे या समस्येने अधिकच उग्र स्वरुप धारण केले आहे. ‘सर्वत्र स्वच्छ भारत, ... Read More »

वीजदरवाढ २०० युनिटपर्यंत लागू नाही

>> वीज मंत्र्यांची घोषणा >> कृषिविषयक वीज जोडण्यांनाही सूट >> ३ लाख ४४ हजार वीज ग्राहकांना दिलासा राज्यातील ज्वलंत वीज दरवाढीच्या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी पर्वरी येथे मंत्रालयात काल घेतलेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत २०० युनिटपर्यंत वीज वापरणार्‍या घरगुती ग्राहकांना नवीन वीज दरवाढीतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०० युनिटपेक्षा जास्त विजेचा वापर करणार्‍या वीज ग्राहकांना नवीन ४.९ ... Read More »

भारत बंदला हिंसक वळण : ८ ठार

>> केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल ऍट्रोसिटी कायद्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला विरोध करत विविध दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला हिंसक वळण लागल्याने ८ जणांचा मृत्यू झाला आहे. मध्ये प्रदेशात ५, उत्तर प्रदेशमध्ये २ तर राजस्थानमध्ये १ अशा पाच जणांचा या आंदोलनात आत्तापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती वृत्त संस्थेने दिली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने ऍट्रोसिटी कायद्यात बदल करू ... Read More »

माजी मुख्यमंत्री पार्सेकरांना नोटिस बजावण्याचा लोकायुक्तांचा आदेश

>> ८८ खाणपट्ट्यांचे बेकायदा नूतनीकरण लोकायुक्त पी. के. मिश्रा यांनी गोवा फाउंडेशनने केलेल्या ८८ खाणींच्या लीज नूतनीकरण तक्रारीच्या सुनावणीला सुरुवात केली आहे. या प्रकरणी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी खाण सचिव पवन कुमार सेन, खाण खात्याचे संचालक प्रसन्न आचार्य यांना नोटीस बजावण्याचा आदेश काल जारी केला. या प्रकरणी पुढील सुनावणी ७ मे रोजी होणार आहे. गोवा फाउंडेशनने सर्वोच्च न्यायालयात राज्यातील ... Read More »

प्रादेशिक आराखडा स्थगित ठेवण्यास कायद्यात तरतूद नाही

>> माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा दावा नगर नियोजन (टीसीपी) कायद्यात प्रादेशिक आराखडा स्थगित ठेवण्यासाठी तरतूद नाही. प्रादेशिक आराखडा २०२१ स्थगित ठेवण्याचा २०१२ मधील निर्णय निव्वळ धूळफेक आहे, असा दावा माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी पत्रकार परिषदेत काल केला. टीसीपी कायद्यानुसार सरकारला प्रादेशिक आराखडा मागे घेण्याचा अधिकार आहे. परंतु, स्थगित ठेवण्याची तरतूद नाही. प्रादेशिक आराखड्यातील विसंगती लक्षात आणून दिल्यास दुरुस्ती ... Read More »

नदाल नंबर १

स्पेनच्या राफेल नदालने स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररला मागे टाकत काल जाहीर झालेल्या ताज्या एटीपी क्रमवारीत अपेक्षेप्रमाणे पहिला क्रमांक मिळविला. मायामी ओपनमध्ये फेडररचा जॉन इस्नरकडून पराभव झाल्यानंतर नदालचे पहिले स्थान निश्‍चित झाले होते. जानेवारी महिन्यातील ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीनंतर एकही सामना न खेळलेल्या नदालला १८ फेब्रुवारी रोजी आपला पहिला क्रमांक गमवावा लागला होता. फेडररने त्याचे स्थान घेतले होते. इस्नरने आठ क्रमांकांची मोठी ... Read More »

रामकुमार, अंकिताची झेप

अंकिता रैना व रामकुमार रामनाथन यांनी काल सोमवारी जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान मिळविले आहे. रैनाने ४३ क्रमांकांची मोठी झेप घेत डब्ल्यूटीए क्रमवारीत २१२वे तर रामकुमारने एटीपी क्रमवारीत चार क्रमांकांची सुधारणा करत १३२वे स्थान मिळविले आहे. रामकुमारने ४३,००० युरो बक्षीस रकमेच्या स्पेनमधील मार्बेला चॅलेंजर स्पर्धेच्या उपात्यपूर्व फेरीत स्थान मिळविले होते तर ग्वाल्हेर येथे झालेल्या २५,००० युएस डॉलर्स ... Read More »

दक्षिण आफ्रिकेला विजयाची संधी

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा चौथा कसोटी सामना जिंकून मालिका ३-१ अशी खिशात घालण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला अजून ७ गड्यांची आवश्यकता आहे. यजमानांनी विजयासाठी ठेवलेल्या ६१२ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची चौथ्या दिवसअखेर ३ बाद ८८ अशी स्थिती झाली आहे. जिगरबाज मॉर्ने मॉर्कलने पूर्ण तंदुरुस्त नसतानादेखील आपल्या शेवटच्या कसोटीच्या शेवटच्या डावात गोलंदाजी करताना कांगारूंची दोन आघाडीचे फलंदाज माघारी धाडत आपल्या संघाला वर्चस्व प्रस्थापित करून ... Read More »

इंग्लंडची पकड ढिली

न्यूझीलंड व इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना अनिर्णिततेकडे झुकला आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने आपला दुसरा डाव ९ बाद ३५२ धावांवर घोषित करत न्यूझीलंडसमोर विजयासाठी ३८२ धावांचे लक्ष्य ठेवले. लेथम व रावल या किवी सलामीवीरांनी २३ षटके खेळून काढत ४२ धावा फलकावर लगावल्या असून इंग्लंडला बळी मिळविण्यात अपयश आल्याने सामना अनिर्णित राहण्याची शक्यता वाढली आहे. इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात ३०७ ... Read More »