ब्रेकिंग न्यूज़

Monthly Archives: April 2018

चौकशी व्हावीच, पण..

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना दिल्लीतून हुबळीला घेऊन जाणार्‍या खासगी छोटेखानी विमानात नुकत्याच उड्डाणादरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडांमागे घातपात असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. त्यासंदर्भात हुबळीत पोलीस तक्रारही दाखल झाली आहे. राहुल गांधींसारख्या महत्त्वपूर्ण राजकीय नेत्याच्या विमानामध्ये अशा प्रकारे तांत्रिक बिघाड होणे ही दुर्लक्षिण्याजोगी बाब नाही. त्यासंबंधी सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. राहुल यांच्या विमानात झालेल्या बिघाडासंबंधी कळताच स्वतः पंतप्रधान नरेंद्र ... Read More »

महाभियोग हवाच कुणाला?

ल. त्र्यं. जोशी (नागपूर) ते उपरोक्त सर्व आयुधांचा उपयोग करीत आहेत याचे अर्थ दोनच. एक म्हणजे २०१९ पर्यंंत मोदीविरोधी वातावरण तापवत ठेवणे आणि दुसरे म्हणजे सरन्यायाधीश मिश्रा यांना अयोध्याप्रकरणी निर्णय देण्यापासून रोखणे. महाभियोग प्रस्तावाचे काहीही झाले तरीही आपली ही दोन उद्दिष्ट्‌ये पूर्ण होतातच याची त्यांना खात्री वाटते.. कॉंग्रेससहित सात पक्षांनी भारताचे सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा यांच्या विरोधात उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू ... Read More »

फोंडा पालिकेसाठी ७६.४३ टक्के मतदान

>> रवी नाईक – केतन भाटीकर यांच्यात बाचाबाची >> ७ मे रोजी मतमोजणी फोंडा पालिकेच्या १५ प्रभागांसाठी काल झालेल्या निवडणुकीत एकूण ७६.४३ टक्के मतदान झाले असून दि. ७ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कॉंग्रेस व मगो समर्थकांमध्ये काही ठिकाणी झालेले किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत पार पाडले. प्रचारावेळी भाजप व मगो नेत्यांनी एकमेकांवर चिखलफेक करून प्रचाराची रंगत वाढविली होती. मात्र, ... Read More »

गोंयचो आवाज संघटनेविरोधात अब्रू नुकसानीचा खटला गुदरणार

>> आमदार नीलेश काब्राल यांचा इशारा गोंयचो आवाज संघटनेच्या सभेत प्रादेशिक आराखड्याचा गैरफायदा उठवून जमीन रूपांतर केल्याचा वक्त्यांनी केलेला आरोप दिशाभूल करणारा आहे. येत्या ५ मे पर्यंत संबंधितांनी लेखी स्वरूपात माफी न मागितल्यास आरोप करणार्‍यांच्या विरोधात बदनामी प्रकरणी मायणा कुडतरी पोलीस स्टेशनवर तक्रार दाखल करणार आहे. तसेच अब्रूनुकसानीचा खटला दाखल करणार आहे, असा इशारा कुडचडेचे आमदार तथा गोवा पर्यटन विकास ... Read More »

अमित शहांच्या सभेला मुख्यमंत्री पर्रीकर मुकणार

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावरील उपचाराचा शेवटचा टप्पा १५ मेपर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर ते गोव्यात परतणार असल्याचे भाजपने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे १३ मे रोजी आयोजित ताळगाव येथील भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या सभेला त्यांना मुकावे लागणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्याचे ओएस्‌डी उपेंद्र जोशी अमेरिकेत दाखल झाले असून पुढील १५ ते २० दिवस ते अमेरिकेत राहणार आहेत. कामकाजासंबंधी काही महत्त्वाच्या फाईली ... Read More »

सर्वाधिक वनक्षेत्र : गोवा देशात ९वा

गोवा हे एक अत्यंत प्रगतीशील असे राज्य गणले जात असून येथे झपाट्याने विकास होत असला तरी सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या राज्यांत गोव्याचा देशात ९वा क्रमांक लागत असल्याचे वन खात्यातील सूत्रांनी सांगितले. आकाराने सर्वात छोटे राज्य असलेल्या गोव्याचा ६०.२१ टक्के भूभाग हा वनक्षेत्राखाली येत असल्याचे इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्टच्या ताज्या अहवालात (२०१८) नमूद करण्यात आले असल्याचे वन खात्यातील सूत्रांनी काल स्पष्ट ... Read More »

घरंदाज गानविष्काराने किशोरीताई आमोणकर संगीतोत्सवाची सांगता

कला अकादमी गोवा आयोजित गानसरस्वती किशोरीताई आमोणकर संगीत महोत्सवाची सांगता बुजुर्ग घरंदाज गायक पं. उल्हास कशाळकर यांच्या गायनाने झाली. विशुद्ध गायकीचा आनंद देणार्‍या या मैफलीत त्यांनी केदार राग विस्ताराने आळविला व त्याला जोडून तराणा म्हटला. निकोप स्वर लगाव, संयत आणि रसपरिपोषक आलापी, लयकारी युक्त बोलबॉंट, लोचदार ताना व घरंदाज गानविष्कार यांमुळे रसिक तल्लीन झाले. त्यांचा ‘संपूर्ण मालकंस’ रागही ऐकताना रसिक ... Read More »

हैदराबादचा राजस्थानवर ११ धावांनी विजय

>> विल्यमसनची ६३ धावांची कप्तानी खेळी >> १५१ धावांचा यशस्वी बचाव सनरायझर्स हैदराबादने आपली गोलंदाजी यंदाच्या आयपीएलमधील सर्वांत बलाढ्य असल्याचे काल रविवारी पुन्हा एकदा दाखवून दिले. प्रथम फलंदाजी करताना केवळ ७ बाद १५१ धावा केल्यानंतर त्यांनी राजस्थान रॉयल्सचा डाव १४० धावांवर रोखून ११ धावांनी विजय मिळविला. या विजयासह त्यांनी ८ सामन्यांतून ६ विजय व २ पराभवांसह आपली गुणसंख्या १२ करताना ... Read More »

माधवनला अंडर-१५ बुद्धिबळाचे विजेतेपद

बार्देश-तिसवाडी तालुकास्तरावरील निमंत्रितांच्या १५ वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद तिसवाडी तालुक्याच्या माधवन जी. (इलो १३६७) याने प्राप्त केले. त्याने सातपैकी पाच सामने जिंकताना दोन बरोबरींसह एकूण ६ गुणांची कमाई केली. बार्देश तालुक्याचा मंदार प्रदीप लाड दुसर्‍या क्रमांकावर राहिला. ‘द आर्डी स्कूल ऑफ सांगोल्डा बार्देश’ यांनी बार्देश तालुका बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने सांगोल्डा येथील बेला व्हिस्टा येथे या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धा ... Read More »

केकेआरचा बंगलोरला धक्का

इंडियन प्रीमियर लीगच्या ११व्या पर्वातील २९व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभवाचा डोस पाजला. विजयासाठी आरसीबीने समोर ठेवलेले १७६ धावांचे लक्ष्य केकेआरने ५ चेंडू व ६ गडी राखून गाठले. धावांचा पाठलाग करताना केकेआरकडून सुनील नारायणने आपल्या आवडत्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध आक्रमक सुरुवात केली. त्याने १९ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह २७ धावा जमवून ख्रिस लिन ( ... Read More »