ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: March 23, 2018

माहिती चोरीचा धोका

फेसबुक वापरणार्‍या पाच कोटी व्यक्तींची वैयक्तिक माहिती     चोरून तिचा वापर अमेरिका, ब्रिटन आणि भारतामध्ये राजकीय पक्षांच्या निवडणूक प्रचारासाठी झाल्याचे सध्या उघड झालेले प्रकरण एकूणच सोशल मीडिया आणि माहिती तंत्रज्ञानाच्या धोक्यांकडे अंगुलीनिर्देश करते आहे. जसजसे माहिती तंत्रज्ञान प्रगत होत चालले आहे, तसतसे त्यापासूनचे धोकेही वाढत चालले आहेत. त्यात जनतेमध्ये फार मोठ्या प्रमाणावर डिजिटल निरक्षरता असलेल्या भारतासारख्या देशामध्ये तर अशा ... Read More »

गोवा मुक्ती लढ्याचे प्रेरणास्त्रोत

शंभू भाऊ बांदेकर २३ मार्च रोजी डॉ. राममनोहर लोहिया यांची १०८ वी जयंती. गोवा मुक्तीलढ्याचे प्रेरणास्त्रोत व समाजवादाची प्रेरक शक्ती असलेल्या डॉ. लोहियांविषयी… डॉ. राममनोहर लोहिया यांचे गोवा मुक्तीलढ्याशी असलेले आतूर व प्रेरणादायी नाते लक्षात घेऊन स्वा. सै. नागेश करमली यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. लोहिया यांच्या जन्माला २३ मार्च २०१० रोजी शंभर वर्षे पूर्ण होत होती. त्यामुळे एक डॉ. राममनोहर लोहिया ... Read More »

फोंडा व साखळी पालिकांची निवडणूक जाहीर

>> फोंड्यात २९ एप्रिलला तर साखळीत ६ मे रोजी मतदान >> मतमोजणी ७ मे रोजी गोवा राज्य निवडणूक आयोगाने फोंडा आणि साखळी या दोन्ही नगरपालिकांचा निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला आहे. फोंडा नगरपालिकेसाठी २९ एप्रिल आणि साखळी नगरपालिकेसाठी ६ मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. दोन्ही पालिकांची मतमोजणी ७ मे रोजी होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त आर. के. श्रीवास्तव यांनी ... Read More »

‘ऑर्चडर्‌’ जमिनीमध्ये बेकायदा भूखंड तयार करण्यास बंदी

नगरनियोजन खात्याने ‘ऑर्चर्ड्’ (बागायत) जमिनीचे रूपांतर रोखण्यासाठी अखेर कडक पाऊल उचलले आहे. नगर नियोजन ऍक्टच्या ४९ (६) अंतर्गत ऑर्चडर्‌ जमिनीमध्ये बेकायदा भूखंड तयार करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ऑर्चडर्‌ जमिनीच्या रूपांतराला चाप बसणार आहे, अशी माहिती नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी दिली. राज्यातील ऑर्चडर्‌ जमीन गोठवली जाणार आहे. या जमिनीचे बेकायदा रूपांतर करू दिले जाणार नाही, असे मंत्री सरदेसाई ... Read More »

मुळगाव येथील केळबाई देवीची प्रसिद्ध पेठेची जत्रा काल साजरी झाली. उत्सवात पेठ फुलांनी सजविताना देवस्थानचे मानकरी. Read More »

आणखी १५ हुल्लडबाज खाण आंदोलकांविरुद्ध गुन्हा

पणजी पोलिसांनी खाण अवलंबितांच्या आंदोलनावेळी हुल्लडबाजीमध्ये सहभागी झालेल्यांच्या विरोधात कारवाईसाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. या प्रकरणी आणखी १५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, खाण उद्योजक हरीष मेलवानी, ट्रक मालक प्रमोद सावंत, विनोद पेडणेकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी उत्तर गोवा जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. खाण अवलंबितांच्या आंदोलनाच्या वेळी जनतेला वेठीस धरून वाहनचालक व इतरांना त्रास करण्यात आला होता. सामान्य ... Read More »

म्हापसा शहर आराखडा; कृतिदलाची स्थापना

उत्तर गोवा नियोजन व विकास प्राधिकरणाने म्हापसा येथील शहर नियोजन योजनेचा आराखड्याच्या कामाला गती देण्यासाठी कृती दलाची स्थापना केली आहे. या संबंधीची सूचना प्राधिकरणाच्यावतीने जारी करण्यात आली आहे. डाऊन टाऊन म्हापसा टप्पा – १ आणि कामरखाजन आणि गावसवाडा टप्पा -२ ची तयारी व कार्यवाहीसाठी या कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. या कृती दलाच्या अध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक ... Read More »

रॉय नाईकचा जामीन अर्ज निकाली

खाण घोटाळा प्रकरणी रॉय नाईक याच्या अटकेची गरज भासल्यास त्याला ४८ तास आधी अटकेची पूर्व कल्पना देण्यात येईल, असे एसआयटीने न्यायालयात स्पष्ट केले आहे. खाण घोटाळा प्रकरणाचा तपास करणार्‍या खास तपास पथकाने (एसआयटी) रॉय नाईक याला खाण घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी एसआयटीच्या कार्यालयात हजर राहण्याचे समन्स जारी केले होते. त्यामुळे रॉय याने उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज ... Read More »

सांगोल्डा येथे हाईप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

>> मुख्य संशयितासह तिघांना अटक >> चार युवतींची सुटका गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने सांगोल्डा येथे २१ मार्च रोजी छापा घालून एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून चार युवतींची सुटका करण्यात आली आहे. गुन्हा अन्वेषण विभागाला खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी मुख्य संशयित कपिल शर्मा ऊर्फ ... Read More »

वर्ल्डकपसाठी झिंबाब्वे अपात्र

>> आयर्लंड-अफगाण सामन्यातील विजेत्याला मिळणार संधी दुबळ्या संयुक्त अरब अमिरातने आयसीसी विश्‍वचषक पात्रता स्पर्धेच्या ‘सुपर सिक्स’ फेरीत काल गुरुवारी धक्कादायक निकालाची नोंद करताना यजमान झिंबाब्वेचा डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे ३ धावांनी पराभव केला. या पराभवामुळे झिंबाब्वेला आगामी क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळविणे शक्य झाले नाही. आयर्लंड व अफगाणिस्तान यांच्यात आज सामना होणार असून यातील विजेता संघ वर्ल्डकपसाठी पात्र ठरेल. पावसामुळे ... Read More »