ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: March 21, 2018

संदिग्धता का?

राज्यातील खाण बंदीसंदर्भात तोडगा काढण्याची ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल सर्व संबंधितांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर दिली आहे. गडकरी हे केंद्रीय नेते जरी असले तरी त्यांच्या हातातही काही जादूची कांडी नाही की सर्वोच्च न्यायालयाने लक्ष घातलेला गोव्याचा खाण प्रश्न चुटकीसरशी सोडवता यावा. ते केवळ एक करू शकतात. गोवा आणि केंद्र सरकार यांच्यातला दुवा बनू शकतात, जो आज मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर ... Read More »

गरज साक्षीदार संरक्षण कायद्याची

ऍड. असीम सरोदे साक्षीदारांबाबत गुन्हेगार मंडळींच्या मनात द्वेषाची भावना असते. त्यातूनच साक्षीदारांच्या संरक्षणाचा प्रश्‍न उपस्थित होत असतो. त्यामुळे साक्षीदारांना संरक्षण देण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. अनेक खटल्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचे निर्देश सरकारला दिलेले आहेत. या सर्वांचा विचार करून परिपूर्ण कायदा करणे आवश्यक आहे… कोणत्याही आरोपीला कायद्याने गुन्हेगार ठरवण्यासाठी त्याच्यावर असणार्‍या आरोपांची निश्‍चिती होणे आवश्यक असते. आरोप निश्‍चिती होण्यासाठी ... Read More »

राज्यात नेतृत्व बदलाचा विचार नाही : गडकरी

>> पर्रीकर सहा आठवड्यांत परतणार >> नव्या मांडवी पुलासाठी केंद्राकडून ४५० कोटींचे पॅकेज राज्यात नेतृत्व बदल करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, असे नितीन गडकरी यांनी काल स्पष्ट केले. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हेच सरकारचे नेतृत्व करणार असून आणखी सहा आठवडे अमेरिकेत उपचार घेतल्यानंतर ते गोव्यात परतणार असल्याचे ते म्हणाले. सगळे काही सुरळीत होण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा अवधी लागणार आहे. पण ज्या ... Read More »

लाठीमाराची न्यायालयीन चौकशीची कॉंग्रेसची मागणी

भाजप आघाडी सरकारला राज्यातील खाण बंदीच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्यात अपयश आल्याने खाण अवलंबितांना रस्त्यावर उतरावे लागले. त्यामुळे खाण अवलंबितांचे सोमवारचे रास्ता रोको आंदोलन व लाठीमाराला राज्य सरकार जबाबदार आहे. खाण अवलंबितांवर झालेल्या लाठीमाराची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी कॉंग्रेस विधिमंडळ गटाच्या बैठकीत काल करण्यात आली. याच बैठकीत कॉंग्रेस पक्षाने खाण बंदीच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी सहा सदस्यीय समिती स्थापन केली आहे. ... Read More »

शांताराम नाईक यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष शांताराम नाईक यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजीनाम्याचे पत्र आपण पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना पाठवून दिले असल्याचे नाईक यांनी काल सांगितले. हल्लीच झालेल्या कॉंग्रेस पक्षाच्या परिषदेत पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आता मागे राहून युवा नेत्यांना पुढे येण्यास संधी द्यायला हवी, असे आवाहन केले होते. त्यांनी केलेल्या या आवाहनाने आपण प्रभावीत झालेलो असून त्यामुळेच ... Read More »

विर्डी धरणाचे काम पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली

महाराष्ट्राने विर्डी धरणाचे काम पुन्हा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून प्रकल्पस्थळी मोठ्या प्रमाणात मशिनरी व ट्रक आणलेले आहेत. सध्या धरण परिसरात जाणारा रस्ताही दुरुस्त करून कामाला चालना दिली जात असून यामुळे गोव्यावर पुन्हा नवे संकट कोसळण्याची भीती आहे. काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र सरकारने विर्डी धरणाच्या उभारणीसाठी निधीची तरतूद केली होती व जोड कालवे उभारण्यासाठी निधीचा वापर करण्याचे स्पष्ट केले होते. ... Read More »

विरोधी आमदारांच्या मतदारसंघांत वर्षभरात विकासकामे शून्य : आरोप

राज्यातील भाजप आघाडी सरकारच्या एक वर्षाच्या कार्यकाळात विरोधी कॉंग्रेस पक्षाच्या सोळा आमदारांच्या मतदारसंघात एकही विकासकाम मार्गी लागलेले नाही. राज्यातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी विधिमंडळ गटाच्या बैठकीत चार सदस्यीय समितीची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना काल दिली. वरील समितीकडून विकास कामांचा आढावा घेऊन अहवाल तयार केला जाणार आहे. या समितीमध्ये आलेक्स रेजिनाल्ड, फिलीप ... Read More »

स्त्रीसंगम महिला मराठी संमेलन रविवारी पणजीत

>> नामवंत कवयित्री उषा परब भूषविणार अध्यक्षस्थान >> उत्साहिनींचा संमेलनात होणार गौरव साहित्य, कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रातील महिलांच्या सर्जनशीलतेचा आविष्कार घडविणारे स्त्रीसंगम महिला मराठी संमेलन रविवार २५ मार्च रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ पर्यंत पाटो, पणजी येथील संस्कृती भवनच्या बहुद्देशीय सभागृहात गोवा मराठी अकादमीतर्फे होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षस्थान सावंतवाडी येथील नामवंत लेखिका तथा कवयित्री उषा परब भूषविणार आहेत. ... Read More »

तिसर्‍या कसोटीत रबाडा खेळणार

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाचा केपटाऊन कसोटी खेळण्याचा मार्ग काल मोकळा झाला. पोर्ट एलिझाबेथ कसोटीनंतर सामना अधिकारी जेफ क्रो यांनी सुनावलेल्या शिक्षेला रबाडाने आव्हान दिले होते. रबाडाच्या या याचिकेवर सुनावणी करताना आयसीसीने त्याला लेव्हल २ मधून दोषमुक्त केले आहे. त्यामुळे रबाडा आता लेव्हल १ अंतर्गत दोषी असल्याचा निर्णय आयसीसीने दिला आहे. त्याबद्दल त्याच्या मानधनात २५ टक्के कपात करण्यात येणार ... Read More »

सगुणच्या शतकामुळे जीनो सुस्थितीत

>> प्रीमियर डिव्हीजन क्रिकेट डावखुरा सलामीवीर सगुण कामतच्या (३ षट्‌कार व १४ चौकारांसह १२२ चेंडूत १०० धावा) दमदार शतकाच्या जोरावर जीनो क्रिकेट क्लबने ७ गडी गमावत ३२९ अशी धावसंख्या उभारत साळगावकर स्पोटर्‌‌स क्लबविरुद्ध सुरू असलेल्या गोवा क्रिकेट संघटना आयोजित तीन दिवशीय प्रीमियर डिव्हिजन लीग क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्याच्या पहिल्या दिवशी मजबूत सुस्थिती गाठली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर ... Read More »