ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: March 17, 2018

नायडूंचा अविश्वास

आंध्र प्रदेशच्या खास दर्जाच्या मागणीवरून राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून अखेर तेलगू देसम पक्ष बाहेर पडला. नुसता बाहेर पडला नाही तर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध लोकसभेमध्ये अविश्वास ठराव दाखल करण्याचा निर्णयही पक्षाध्यक्ष एन. चंद्रबाबू नायडूंनी घेतला आहे. त्यांचे आंध्र प्रदेशातील राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या जगन्मोहन रेड्डींनी आपल्या वायएसआर कॉंग्रेसतर्फे मोदी सरकारविरुद्ध अविश्वास ठराव आणण्याचे आधीच घोषित केलेले असताना तेलगू देसमनेही स्वतंत्रपणे अविश्वास ठराव ... Read More »

इच्छामरणासंबंधीचा कायदा करावा

मनोहर गोविंद सावंत (म्हापसा) शनिवार दि. १० मार्च रोजीच्या ‘दै. नवप्रभा’त पहिल्या पानावर ‘इच्छामरणाला सुप्रीम कोर्टाची सशर्त परवानगी’ या शिर्षकाखाली प्रसिद्ध झालेली बातमी वाचनात आली. सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देताना इच्छामरणाला सशर्त परवानगी दिली आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे मरणासन्न अवस्थेत असलेल्यांना इच्छा मृत्यूचा अधिकार मिळाला आहे, असे बातमीत पुढे म्हटले आहे. शेवटचा श्‍वास कधी घ्यावा हे ठरविण्याचा अधिकार मरणासन्न व्यक्तीला ... Read More »

हृदयरुग्णांना ग्राम पातळीवर तातडीने सुविधा

>> खास उपक्रम ‘स्टेमी’खाली राज्यभरात ९ केंद्रे सुरू करणार राज्यातील हृदयरुग्णांना ग्राम पातळीवर तातडीची वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यासाठी स्टेमी हा खास उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाखाली राज्यभरात नऊ केंद्र कार्यान्वित केली जाणार असून गरज भासल्यास आणखीन दोन – तीन केंद्राची संख्या वाढविली जाऊ शकते. पहिल्या टप्प्यात २ केंद्रे सुरू केली जाणार आहेत. या नऊ केंद्रावर हृदय विकाराचा झटका येणार्‍या ... Read More »

अखेर तेलगू देसमचा एनडीए सरकारला रामराम

>> सरकारविरोधात अविश्‍वास ठरावही अखेर आंध्र प्रदेशला विशेष राज्य दर्जा देण्याची मागणी केंद्र मान्य करीत नसल्याच्या निषेधार्थ काल तेलगू देसम पार्टीने (तेदेपा) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा पाठिंबा अधिकृतरित्या काढल्याचे जाहीर केले. तेदेपाच्या खासदारांच्या बैठकीतील चर्चेत याबाबत एकमताने हा निर्णय घेण्याबरोबरच सरकारवर अविश्‍वास ठराव लोकसभेत दाखल करण्याचाही निर्णय घेतल्याचे या पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी जाहीर केले. अशा ... Read More »

खाणप्रश्‍नी डिचोलीतील सभेत पंतप्रधानांच्या हस्तक्षेपाची मागणी

राज्यातील खाण बंदीमुळे २ लाख लोक उपाशी पडणार असून सरकारने खाणी सुरूच ठेवाव्यात व पुढील प्रक्रिया चालू ठेवावी. खाणी सरकारने चालवाव्यात व या प्रश्‍नी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हस्तक्षेप करावा असा सूर खाण अवलंबितांनी डिचोली येथील जाहीर सभेत व्यक्त केली. यावेळी ट्रक मालक संघटनेचे अध्यक्ष निळकंठ गावस, डिचोलीचे नगराध्यक्ष राजाराम गांवकर, सुभाष किनळकर, संदिप परब, निलेश कारसेरकर, सुरेश देसाई, यशवंत देसाई ... Read More »

वनहक्क कायद्याखाली सरकारकडे सहा तालुक्यातून ९७५८ दावे

वनहक्क कायद्याखाली राज्यातील सहा तालुक्यातून ९७५८ दावे राज्य सरकारकडे आलेले असून हे दावे जलदगतीने हातावेगळे करण्यासाठीची प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे, असे महसूल मंत्री रोहन खंवटे व आदिवासी कल्याण मंत्री गोविंद गावडे यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. ९७५८ राज्यांपैकी २७८२ दाव्यांसंबंधी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी करण्याचे काम यापूर्वीच पूर्ण झाले असल्याचे या मंत्र्यांनी स्पष्ट केले. ५०४ दाव्यांना वन व अन्य ... Read More »

महानंद नाईकच्या जन्मठेपेवर सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब

सिरीयल किलर महानंद नाईक (तरवळे – शिरोडा) याला वासंती गावडे या युवतीच्या खून प्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. १९९५ ते २००९ या काळातील उघडकीस आलेल्या सोळा युवतींच्या खुनांच्या प्रकरणामुळे गोवा हादरला होता. या प्रकरणी फोंडा पोलिसांनी सिरीयल किलर महानंद नाईक याला अटक करून त्याच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. महानंद नाईक ... Read More »

‘ग्रँड फिनाले’

>> बंगळुरू-चेन्नईत आज इंडियन सुपर लीगमध्ये आज शनिवारी श्री कांतिरवा स्टेडियमवर बंगळुरू एफसी आणि चेन्नईन एफसी यांच्यात अंतिम सामना होईल. दोन्ही संघ चांगल्या फॉर्मात असल्यामुळे रंगतदार लढत अपेक्षित आहे. बंगळुरू एफसीला पदार्पणात विजेतेपद जिंकून इतिहास घडविण्याची संधी आहे. बंगळुरूचे पारडे जड मानले जात आहे, पण आयएसएल अंतिम सामन्यात यजमान संघाची सरशी कधीच झालेली नाही हा इतिहास बंगळुरूच्या चाहत्यांना माहीत आहे. ... Read More »

खेळाडू निडीतील सातत्याचे फळ

बंगळुरू एफसी आणि चेन्नईन एफसी यांनी इंडियन सुपर लीगच्या अंतिम फेरीत योगायोगाने प्रवेश केलेला नाही. योजनाबद्ध संघबांधणी, संघनिवड आणि पूर्वीपासून ज्यांचा खेळ माहित अशा खेळाडूंवर कायम ठेवलेला विश्वास अशा गोष्टी त्यांच्यासाठी उपयुक्त ठरल्या आहेत. बंगळुरूने ११ खेळाडू कायम ठेवले, तर चेन्नईयीनने १० खेळाडूंना पुन्हा करारबद्ध केले. २०१५ मध्ये चेन्नईकडून खेळलेल्या मैल्सन आल्वेसचा विचार केल्यास चेन्नईचा हा आकडा सुद्धा ११ होतो. ... Read More »

धनपालसाठी संमिश्र ठरलेले श्री कांतिरवा स्टेडियम

चेन्नईन एफसीचा मध्यरक्षक धनपाल गणेश याच्यासाठी श्री कांतिरवा स्टेडियमच्या आठवणी संमिश्र ठरल्या आहेत. शनिवारी बंगळुरू एफसीविरुद्ध मैदानावर उतरताना त्याची भावना अशीच असेल. याच स्टेडियमवर मार्च २०१५ मध्ये स्टीफन कॉन्स्टंटाईन यांनी धनपालला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी दिली. इराणविरुद्ध विश्‍वचषक पात्रता लढतीत तो खेळला. गुरप्रीत सिंग संधू याची सुद्धा ही पहिलीच लढत होती. गोलरक्षक गुरप्रीतने काही वेळा चपळ बचाव करीत वाहवा मिळविली, पण ... Read More »