ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: March 16, 2018

पुन्हा इशारा

ईशान्येतील तीन राज्ये दिमाखात सर करणार्‍या भाजपला उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकसभेच्या तीन जागा मात्र अत्यंत नामुष्कीजनकरीत्या गमवाव्या लागल्या. ईशान्येतील निकाल हे अपवादात्मक होते आणि त्या विजयाला वेगळी परिस्थिती कारणीभूत होती. उर्वरित देशामध्ये वातावरण वेगळे बनत चालले आहे. ईशान्येतील भाजपच्या विजयासंबंधीच्या अग्रलेखात आम्ही ‘‘येथे एक बाब लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे ईशान्य भारताचे हे निकाल म्हणजे काही भाजपच्या भावी यशाचा ... Read More »

भारत – फ्रान्स संबंधांचा नवा अध्याय

शैलेंद्र देवळाणकर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांचा भारत दौरा नुकताच पार पडला. व्यापार, संरक्षण, ऊर्जा अशा अनेक दृष्टींनी तो भारतासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला आहे. दोन्ही देशांचे संबंध आज सामरिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहेत… ङ्ग्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युल मॅक्रॉन यांचा चार दिवसांचा भारत दौरा नुकताच संपन्न झाला. भारतासाठी ही भेट बहुविध दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण होती. मॅक्रॉन हे ङ्ग्रान्सचे सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष आहेत. अत्यंत ... Read More »

राज्यात आजपासून खाण बंदी

>> बंदी आदेश कार्यवाहीसाठी खाण खात्याची कडक पावले सर्वोच्च न्यायालयाच्या ७ फेब्रुवारीच्या आदेशानुसार अखेर शुक्रवार १६ मार्च २०१६ पासून राज्यात खाण बंदी लागू करण्यात आली आहे. राज्यातील काही खाणीवरील उत्खनन केलेले खनिज गुरूवार १५ मार्च रोजी मध्यरात्रीपर्यंत बाहेर काढण्यात आले. खाण खात्याने खाण बंदीच्या कार्यवाहीसाठी कडक पावले उचलली आहेत. खाण खात्याच्या खास पथकांकडून शुक्रवारी बंद खाणींची पुन्हा एकदा पाहणी करून ... Read More »

पुनर्विचार याचिका शिफारशीस मान्यता

मंत्रीमंडळ सल्लागार समितीने सर्वोच्च न्यायालयात खाण प्रश्‍नी पुनर्विचार याचिका दाखल करण्याची शिफारस मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी स्वीकारली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. मंत्रीमंडळ सल्लागार समितीच्या बुधवारी घेण्यात आलेल्या बैठकीत राज्यातील ज्वलंत खाण प्रश्‍नावर चर्चा केल्यानंतर खाण प्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची शिफारस केली होती. मुख्य सचिवांनी मंत्रिमंडळ सल्लागार समितीच्या बैठकीचा अहवाल अमेरिकेत उपचार घेणार्‍या मुख्यमंत्रांना पाठविला होता. खाण ... Read More »

गडकरी मंगळवारी गोव्यात

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी मंगळवार २० मार्च रोजी गोव्यात येणार असून सकाळी ११ वाजता पर्वरी येथील मंत्रालयात खाण व्याप्त भागातील आमदार, व्यावसायिकांची भेट घेऊन खाणबंदीबाबत चर्चा करणार आहेत. राज्यातील खाण बंदीमुळे मोठे संकट उभे ठाकले आहे. या खाण बंदीच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्याची विनंती केंद्रीय मंत्री गडकरी यांना करण्यात आली आहे. खाण व्यावसायिक व खाण व्याप्त भागातील नागरिकांच्या तक्रारी ... Read More »

ग्रेटर पणजीतून पंचायतक्षेत्रे वगळण्यास सोमवारपर्यंत मुदत

>> सांताक्रुझ ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा नगर नियोजन मंडळाच्या सोमवार १९ मार्च रोजी होणार्‍या बैठकीत ग्रेटर पणजी पीडीएमधून सांताक्रुझ आणि सांत आंद्रे मतदारसंघातील पंचायत क्षेत्रे वगळण्याचा निर्णय घ्यावा. अन्यथा, ६ एप्रिलरोजी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सांताक्रुज ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत काल दिला. या पत्रकार परिषदेला ग्रामस्थ समितीचे आर्थुर डिसिल्वा, ओलासियो फर्नांडिस, रूडॉल्फ फर्नांडिस, रामा काणकोणकर, प्रकाश सावंत व इतरांची उपस्थिती होती. ग्रेटर ... Read More »

असली, नकली उत्पादने शोधून काढणारे सॉफ्टवेअर आणणार : गावडे

ब्रँडेड उत्पादनातील असली आणि नकली उत्पादने शोधून काढणारे अत्याधुनिक सॉफ्टवेअर उपलब्ध करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, अशी माहिती नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार मंत्री गोविंद गावडे यांनी काल दिली. पाटो पणजी येथील संस्कृती भवन सभागृहात आयोजित जागतिक ग्राहक हक्क दिन कार्यक्रमात मंत्री गावडे बोलत होते. यावेळी नागरी पुरवठा खात्याचे सचिव रूपेश कुमार ठाकूर, राज्य ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष तथा निवृत्त ... Read More »

जय शहा अब्रुनुकसानी प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

>> जबाबदारीने वागण्याचा पत्रकारांना सल्ला भाजपाध्यक्ष अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांनी ‘द वायर’ या न्यूज पोर्टलविरोधात गुदरलेल्या अब्रुनुकसानी खटल्याचे कामकाज १२ एप्रिलपर्यंत स्थगित ठेवावे असा आदेश काल सर्वोच्च न्यायालयाने गुजरात उच्च न्यायालयाला दिला. वरील न्यूज पोर्टलचे पत्रकार व व्यवस्थापन यांच्याविरोधात जय शहा यांनी गुजरात उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. प्रसारमाध्यमांनी जबाबदारीने वागायला हवे आणि ... Read More »

अवकाळी पावसाचा वीज पुरवठ्यावर परिणाम

राज्यातील विविध भागात बुधवारी पडलेल्या पावसामुळे वीज पुरवठा काही वेळ बंद झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. राज्यातील ढगाळ वातावरण अद्याप कायम आहे. या अवकाळी पावसाचा काजू व इतर पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. नागरिकांना बदललेल्या वातावरणामुळे आरोग्य समस्या भेडसावू लागली आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे राज्यातील हवामान कोरडे ... Read More »

सिंधू, प्रणॉय उपांत्यपूर्व फेरीत

भारताची स्टार महिला शटलर पीव्ही सिंधूने आपला विजयी धडाका कायम राखताना काल गुरुवारी आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूवर मात करीत ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या विजयामुळे सिंधूने महिला एकेरीत भारताचे आव्हान जिवंत राखले आहे. चौथ्या मानांकित सिंधूने दुसर्‍या फेरीत थाइलंडच्या विश्व क्रमाक ११ नित्चाओन जिंदापोल हिच्यावर मात केली. सायनाने १ तास ६ मिनिटे चाललेली ही लढत २१-१३, ... Read More »