ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: March 15, 2018

अखेर खाणी बंद…

गोव्यातील खाण उद्योगाची धडधड सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज पुन्हा एकदा थांबणार आहे. गेल्या वेळी बेसुमार उत्खननाने खाण बंदीचे संकट ओढवून घेतले होते. यावेळी राज्य सरकारने राज्यातील लीजधारकांना दुसर्‍यांदा करून दिलेल्या नूतनीकरणातून हे संकट ओढवले आहे. न्यायालयाने नवे लीज करण्यास सांगितले असताना सरकारने जुन्याच लिजांचे नूतनीकरण ‘नवे’ ठरवण्याची जी चलाखी केली, त्यातून सर्वोच्च न्यायालयाची ही इतराजी ओढवली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा ... Read More »

सामर्थ्य आहे ग्राहक चळवळीचे!

उमाकांत शेटये आज जागतिक ग्राहक दिन. संघटित नसलेल्या ग्राहकांची पदोपदी लुबाडणूक होते. ती टाळण्यासाठी ग्राहकांनी किमान आपल्या हक्कांविषयी जागृत होणे आणि योग्य व्यासपीठांवर दाद मागणे गरजेचे आहे.. सकाळी उठल्यावर आपण कुठली तरी टूथपेस्ट, टुथब्रश वा साबण वापरतो, मग आपल्याला चहा पावडर लागते. दिवसभर आपण विविध वस्तू व सेवा विकत घेऊन वापरत असतो. म्हणजेच आपण ग्राहक असतो. आपली मागणी असते म्हणून ... Read More »

अस्त दुर्दम्य इच्छाशक्तीचा

डॉ.दिपक शिकारपूर शारीरिक विकलांगत्व असूनही आपल्या विलक्षण बुद्धिमत्तेने जगाला स्तिमित करून सोडलेले प्रख्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे काल निधन झाले. या आगळ्यावेगळ्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला श्रद्धांजली – शरीराचे सर्व अवयव सुस्थितीत असूनही, अंगात भरपूर बळ असूनही स्वत:ला दुबळं समजणार्‍या माणसांचा करंटेपणा त्यांच्याच अधोगतीस कारण ठरत असतो. हे लोक स्वत:कडील बुद्धीचा, शारीरिक आणि मानसिक ताकदीचा कधी विचारच करत नाहीत. संधीचा शोध घेण्यात ... Read More »

खाण बंदी ः सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिकेची शिफारस

राज्यातील खाण बंदी प्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची शिफारस मंत्रीमंडळ सल्लागार समितीने (सीएसी) काल केली. या सल्लागार समितीने केलेली शिफारस पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे विचारार्थ पाठविली जाणार आहे. दरम्यान, राज्याचे मुख्य सचिव धर्मेद्र शर्मा खाण विषयासंबंधी केंद्रीय खाण सचिव आणि पर्यावरण सचिवाकडून सल्ला घेणार आहेत, अशी माहिती मंत्रीमंडळ सल्लागार समितीचे सदस्य तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ... Read More »

उ. प्रदेश पोटनिवडणुकीत भाजपचा दारूण पराभव

उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ व केशवप्रसाद मौर्य यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या लोकसभेच्या दोन प्रतिष्ठेच्या जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत केंद्र व राज्यातही सत्तेवर असलेल्या भाजपला दारूण पराभव पत्करावा लागला आहे. विद्यमान मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला असलेल्या गोरखपूरमध्ये समाजवादी पक्षाचे प्रविण निषाद यांनी भाजपच्या उपेंद्र दत्त शुक्ला यांचा २१ हजार मतांनी, तर उपमुख्यमंत्री मौर्य यांच्या फुलपूर मतदारसंघात समाजवादी पक्षाचे नरेंद्र प्रतापसिंह पटेल यांनी ... Read More »

स्टिफन हॉकिंग निवर्तले

महान शास्त्रज्ञ प्रा. स्टिफन हॉकिंग यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी केंब्रिज विद्यापीठानजीकच्या त्यांच्या राहत्या घरी काल निधन झाले. लुसी, रॉबर्ट व टिम या त्यांच्या मुलांनी त्यांच्या निधनाला दुजोरा देणारे निवेदन जारी केले आहे. इंग्लंडमधील ऑक्स्फर्ड येथे १९४२ साली जन्मलेल्या व विश्‍वरचना शास्त्रज्ञ म्हणून जगप्रसिद्ध ठरलेल्या हॉकिंग यांचे जीवन स्तिमित करणारे ठरले. प्रा. हॉकिंग यांना आल्बर्ट आईन्स्टन पुरस्कारासह वुल्फ पुरस्कार, कॉपले ... Read More »

टीम इंडिया अंंतिम फेरीत

>> बांगलादेशवर १७ धावांनी विजय रोहित शर्माच्या टीम इंडियाने बांगलादेशचा १७ धावांनी पराभव करून निदाहास तिरंगी टी-२० मालिकेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. सामनावीर जरी कप्तान रोहित शर्मा ठरला असला तरी या विजयाचा खरा शिल्पकार फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर ठरला. त्याने आपल्या चार षटकांत केवळ २२ धावा देत ३ गडी बाद केले. या सामन्यात भारताने बांगलादेशला विजयासाठी १७७ धावांचे आव्हान दिले ... Read More »

मिचेल सेंटनरच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया

न्यूझीलंडचा अष्टपैलू मिचेल सेंटनर याला क्रिकेटपासून ९ महिने दूर रहावे लागणार आहे. गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने त्याला इंग्लंडविरुद्धची आगामी कसोटी मालिका, इंडियन प्रीमियर लीग व इंग्लिश कौंटी मोसमाला मुकावे लागणार आहे. इंग्लंड व न्यूझीलंड यांच्यात २२ मार्चपासून ईडन पार्कवर दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. प्रामुख्याने गोलंदाजीसाठी संघात असलेल्या सेंटनरने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दोन अर्धशतके झळकावून फलंदाजीत चमक ... Read More »

राष्ट्रकुल ः राणी रामपालकडे नेतृत्व

आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या महिला हॉकी संघाचे नेतृत्व आघाडीपटू राणी रामपाल हिच्याकडे सोपविण्यात आले आहे. भारताचा या ‘अ’ गटात समावेश करण्यात आला असून मलेशिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका व वेल्स हे या गटातील इतर देश आहेत. अनुभवी गोलरक्षक सविता पूनिया हिला उपकर्णधार नेमण्यात आले आहे. २००२ साली भारताने यजमान इंग्लंडचा अतिरिक्त वेळेत ३-२ असा पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. ... Read More »