ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: March 14, 2018

बळीराजाची धडक

नाशिकहून तब्बल सहा दिवस १८० किलोमीटर उन्हा-तान्हातून चालत येऊन मुंबईत धडकलेल्या आंदोलक शेतकर्‍यांना अखेर महाराष्ट्र सरकारने विविध मागण्या मान्य करीत असल्याचे भरघोस आश्वासन दिले आहे. अर्थात, शेतकर्‍यांच्या मागण्या मुकाट मान्य करण्यावाचून देवेंद्र फडणवीस सरकारपाशी अन्य पर्याय नव्हता, कारण विरोधातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसेबरोबरच सत्तेतील वाटेकरी असलेल्या शिवसेनेनेदेखील या आंदोलक शेतकर्‍यांना पाठिंबा जाहीर केलेला होता आणि या शेतकर्‍यांचे हे आंदोलन दांडगाईने ... Read More »

पुतळ्यांची तोडफोड हा सत्तेचा उन्माद…

शंभू भाऊ बांदेकर भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात तेथे गेली अनेक वर्षे सर्वधर्मसमभाव नांदत आला आहे व ज्या भारत देशाचे पोवाडे इतर देशातही गायले जातात, तेथे असे असहिष्णुतेचे हिंसक निंद्य प्रकार घडावेत हे मुळीच शोभादायक नाही… गोव्यात नुकतेच डॉ. जॅक सिक्वेरा यांच्या पुतळ्याचे प्रकरण बरेच गाजले व कालावधीत ते थंडही पडले किंवा ते थंड पाडले गेले. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा अधिवेशनातही त्याची ... Read More »

बँक खात्यांशी ‘आधार’ जोडण्यास पुन्हा मुदतवाढ

>> सर्वोच्च न्यायालयाचा नागरिकांना तूर्त दिलासा बँक खाते, मोबाईल फोन आदी विविध सेवांशी ‘आधार’ जोडण्याची येत्या ३१ मार्चची मुदत सर्वोच्च न्यायालयाने या संबंधीचा घटनापीठाचा अंतिम निवाडा येईस्तोवर काल पुढे ढकलली. बँक खाते, फोन क्रमांक आणि इतर सेवांना ‘आधार’ जोडायला लावणे हा वैयक्तिक गोपनीयतेचा भंग असल्याच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे प्रलंबित आहेत. त्यामुळे त्या याचिकांवर निवाडा येईस्तोवर आधार जोडणीला मुदतवाढ देण्यात ... Read More »

माओवाद्यांच्या हल्ल्यात ९ जवान शहीद; ६ जखमी

नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात किस्तराम भागात घडवून आणलेल्या शक्तीशाली आयइडी स्फोटात काल सीआरपीएफचे ९ जवान शहीद झाले. तसेच या अतिरेकी हल्ल्यात सहा जवान जखमी झाले असून त्यापैकी चौघेजण गंभीर आहेत. मिळालेल्या वृत्तानुसार काल सकाळी जवानांची तुकडी सकाळी ८ वा. या भागात टेहळणीवर होती. त्यावेळी उभयतांत चकमक झडली होती. नंतर दु. १२.३० वा. माओवाद्यांनी जवानांना लक्ष्य केले. वरील भागातून सीआरपीएफची एक ... Read More »

गोवा खाणप्रश्‍नी अमित शहा लक्ष घालणार : गडकरी लवकरच गोव्यात

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गोव्याच्या खाण प्रश्‍नात वैयक्तिक लक्ष घालून सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन भाजपच्या खासदारांना काल दिले. भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री तथा गोवा प्रभारी नितीन गडकरी खाणप्रश्‍नी जनतेच्या भावना जाणून घेण्यासाठी तसेच तोडगा काढण्यासाठी येत्या आठ दिवसात गोव्यात येणार आहेत, अशी माहिती राज्यसभा खासदार तथा प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी दिली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांचे राज्यातील ... Read More »

महापौर, उपमहापौरपदी मोन्सेरात गटाचे उमेदवार बिनविरोध

>> सिध्दार्थ कुंकळ्येकरांचे सहकार्य : बाबुश महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीतून भाजप समर्थक नगरसेवक गटाने माघार घेतल्याने माजी मंत्री बाबूश मोन्सेरात समर्थक गटाच्या विठ्ठल चोपडेकर यांची महापौरपदी आणि अस्मिता केरकर यांच्या उपमहापौरपदी बिनविरोध निवडीचा मार्ग काल मोकळा झाला. यासंबंधी औपचारीक घोषणा बुधवार दि. १४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता केली जाणार आहे. महापौर सुरेंद्र फुर्तादो, उपमहापौर लता पारेख यांचा एक ... Read More »

खाणींवरील यंत्रसामुग्रीची अखेर आवराआवर सुरू

उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यातील खाणीचें काम १६ मार्चपासून बंद होणार असल्याने दक्षिण गोव्यातील खाण मालकांनी खाणींवरील मशिनरी हलविण्यास सुरूवात केली आहे. येत्या १६ मार्चपासून खाण परिसरात शुकशुकाट निर्माण होण्याची चिन्हे स्पष्ट होऊ लागली आहेत. खाणीवरील पोकलीन, ट्रक्स, मशिनरी, जीप इतरत्र हलविण्याचे काम सुरू केले असून खाणींचा परिसर मशिनरी मुक्त होण्याची शक्यता आहे. खाणी किती वर्षे बंद असणार हे निश्‍चित नसल्यामुळे ... Read More »

पोलिसांच्या दिमतीला स्पीड रडार गन

>> बेदरकार वेगावर आवर : १०० आल्कोमीटरची खरेदी गोवा वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमांचा भंग करणार्‍या वाहन चालकांविरोधातील कारवाईला आणखीन गती देण्याच्या उद्देशाने नवीन चार लेसर स्पीड रडार गन आणि १०० आल्कोमीटरची खरेदी केली आहे, अशी माहिती पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. राज्यात भरधाव वाहन चालविणार्‍या वाहन चालकावर या लेसर स्पीड रडार गनच्या साहाय्याने कारवाई केली जाणार ... Read More »

सरकारकडून कोणतेच उल्लेखनीय कार्य नाही : आम आदमी पार्टी

भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारने ३६५ दिवसांच्या कारभारात आम आदमीच्या हितार्थ कोणतेही उल्लेखनीय कार्य केले नाही. केवळ खास आदमीच्या सोयीसाठी पावले उचलली जात आहेत, असा आरोप आम आदमी पार्टीचे राज्य समन्वयक एल्वीस गोम्स यांनी पत्रकार परिषदेत काल केला. राज्यातील खाण बंदीच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्यात भाजप आघाडी सरकारला यश प्राप्त झाले नाही. भाजप आघाडी सरकारच्या एक वर्षाचा काळाचा आढावा घेतल्यास खाण, प्रदूषण, ... Read More »

चेन्नईन अंतिम फेरीत; गोव्याचे आव्हान संपुष्टात

एफसी गोवा संघावर एकतर्फी विजय मिळवित चेन्नईन एफसीने हिरो इंडियन सुपर लीगच्या चौथ्या पर्वाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. येथील नेहरू स्टेडियमवर चेन्नईने दुसर्‍या उपांत्य फेरीतील दुसर्‍या टप्याच्या सामन्यात एफसी गोवाचे आव्हान ३-० असे संपुष्टात आणले. चेन्नईचा हुकमी भारतीय स्ट्रायकर जेजे लालपेखलुआ याला घरच्या मैदानावर फॉर्म गवसला. त्याने दोन गोलांसह विजयाच मोलाचा वाटा उचलला. संघाचे खाते उघडतानाच त्याने अखेरच्या मिनिटाला ... Read More »