ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: March 13, 2018

चंद्रबाबूंची नाराजी

केंद्र सरकारकडून आंध्र प्रदेशच्या चाललेल्या कथित उपेक्षाच्या विरोधात तेलगू देसमच्या दोघा मंत्र्यांनी नरेंद्र मोदी मंत्रिमंडळातून राजीनामे दिले. मात्र, राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय पक्षप्रमुख चंद्रबाबू नायडूंनी अद्याप तरी घेतलेला नाही. तेलगू देसमची ही नाराजी काही एकाएकी निर्माण झालेली नाही. गेले अनेक महिने या ना त्या प्रकारे ती व्यक्त होत होती आणि नायडूंचे राजकीय प्रतिस्पर्धी वाय एस जगन्मोहन रेड्डी यांनी ... Read More »

धंदा – व्यवसायांत गोवेकर मागे का?

देवेश कु. कडकडे (डिचोली ) निवडणुकीत अनेक उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांना सरकारी नोकर्‍यांचे आमीष दाखवतात आणि या भुलभुलैय्याला भुलून हे कार्यकर्ते प्रचारात सर्वस्व अर्पण करतात. आज गोव्यातील बहुसंख्य मुली सरकारी कर्मचार्‍याशीच लग्न करणार असा हट्ट धरू लागल्या आहेत. गोव्यातील बहुसंख्य युवापिढीचे उद्दिष्ट हे शिक्षणानंतर सरकारी नोकरी मिळवणे हेच असते. धंदा, उद्योग याबद्दल गोवेकर उदासीन असतात. त्यामुळे परप्रांतियांनी येथे जम बसविला आहे, ... Read More »

खाणी १५ मार्चपर्यंत चालू राहणार

>> खनिज सुरक्षा महासंचालकांच्या शिफारशीवरून खाण खात्याचा निर्णय राज्यातील खाण उद्योग आज १३ मार्च रोजीपासून बंद होणार नसून तो १५ मार्चपर्यंत चालू राहणार आहे. खनिज सुरक्षा महासंचालकांच्या शिफारशीनुसार खाणी १५ मार्चपर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय खाण खात्याने काल घेतला. त्यापूर्वी राज्याच्या खाण खात्याने आज दि. १३ मार्चपासून राज्यातील खाणी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने १६ मार्चपासून खाणी बंद ... Read More »

सांताक्रूझ, सांत आंद्रे पीडीएतून न वगळल्यास आंदोलन

>> सगळीच गावे वगळणे अशक्य ः सरदेसाई सांतआंद्रे मतदारसंघाचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, सांताक्रुझ मतदारसंघाचे आमदार आंतोनियो उर्फ टोनी फर्नांडिस, माजी आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली सांताक्रुझ व सांतआंद्रे मतदारसंघातील विविध पंचायतींचे सरपंच, पंच व ग्रामस्थांनी काल पर्वरी येथे मंत्रालयात जाऊन नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांची भेट घेतली व सांताक्रुझ आणि सांतआंद्रे मतदारसंघातील पंचायतींना पीडीएखाली आणणारी अधिसूचना त्वरीत मागे घेण्याची ... Read More »

महापौर, उपमहापौरपदासाठी भाजपचे उमेदवार आज ठरणार

पणजी महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार निश्‍चित करण्यासाठी भाजप गटाच्या नगरसेवकांच्या सोमवारी घेण्यात आलेल्या बैठकीत उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. भाजप गटाच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा मंगळवारी सकाळी करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. महापौर व उपमहापौरपदासाठी बुधवार १४ मार्च रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. मोन्सेरात समर्थक गटाने दोन्ही पदासाठी अनुक्रमे विठ्ठल चोपडेकर आणि अस्मिता केरकर यांची नावे ... Read More »

बंद पाडलेले मोपाचे काम पुन्हा आजगावकरांच्या उपस्थितीतच सुरू

पेडणे मतदारसंघाचे आमदार तथा पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी गेल्या शनिवारी सुमारे २०० समर्थकांसह मोर्चा नेऊन बंद पाडलेले मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम जीएमआर कंपनीचे अधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत काल पुन्हा एकदा रितसर विधीवत सुरू करण्यात आले. यावेळी मंत्री आजगावकर हेही उपस्थित होते. यावेळी जीएमआर कंपनीचे मुख्याधिकारी आर. व्ही. शेषन, कंपनीचे एक अधिकारी मिलिंद पैदरकर, माजी नगराध्यक्ष वासुदेव देशप्रभू, वारखंडचे सरपंच ... Read More »

मांड संस्कृती संवर्धनासाठी योजना

कला व संस्कृती खात्याकडून पारंपरिक मांड संस्कृतीच्या संवर्धनासाठी गोवा मांड संस्कृती योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेखाली मांडांवरील लोककलांचे प्रशिक्षण घेण्यासाठी संस्थांना चार लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात २५ संस्थांना अनुदान दिले जाणार आहे, अशी माहिती कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. राज्यातील पारंपरिक जागोर, रणमाले व इतर लोककला प्रकार ... Read More »

पंचायत संचालकपदी पंचवाडकर आर्लेकर मच्छीमारी संचालकपदी

राज्याच्या कार्मिक खात्याने नागरी सेवेतील १७ वरिष्ठ अधिकार्‍याच्या बदल्याचा आदेश काल जारी केला आहे. मच्छिमारी खात्याच्या संचालकपदी विनेश आर्लेकर, पंचायत संचालकपदी अजित पंचवाडकर, राज्य निबंधक व नोटरीपदी आशुतोष आपटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंचायत संचालिका संध्या कामत यांची बदली करण्यात आली असून त्यांची एसटी आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दामोदर शंके यांची प्रिटींग व स्टेशनरी ... Read More »

शैलीनुसारच खेळण्यास गोवा-चेन्नईन सज्ज

हीरो इंडियन सुपर लीगमध्ये चेन्नईन एफसी आणि एफसी गोवा या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये आणखी एक चुरशीचा सामना मंगळवारी होईल. दुसर्‍या उपांत्य फेरीतील दुसर्‍या टप्याच्या सामन्यात आपल्या शैलीनुसारच खेळण्यास हे दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. येथील नेहरू स्टेडियमवर हा सामना होईल. २०१५च्या अंतिम सामन्यात हे दोन संघ आमनेसामने आले होते. तेव्हापासून हे दोन्ही संघ नेहमीचे प्रतिस्पर्धी ठरलेले नाहीत. त्यांच्यातील सामने रंगतात. त्यावेळी ... Read More »

भारताचा सहा गड्यांनी विजय

>> शार्दुल ठाकूर व वॉशिंग्टन सुंदरची भेदक गोलंदाजी शार्दुल ठाकूर व वॉशिंग्टन सुंदरच्या भेदक गोलंदाजीनंतर मनीष पांडे व दिनेश कार्तिकच्या सहजसुंदर फलंदाजीवर आरुढ होत टीम इंडियाने काल निदाहास टी-२० तिरंगी मालिकेतील सामन्यात श्रीलंकेचा ६ गडी व ९ चेंडू राखून पराभव केला. श्रीलंकेने विजयासाठी ठेवलेले १५३ धावांचे लक्ष्य भारताने १७.३ षटकांत गाठले. पांडे व कार्तिक यांनी पाचव्या गड्यासाठी ६८ धावांची अविभक्त ... Read More »