ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: March 12, 2018

असंतोषाचे ढग

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या राज्यातील अनुपस्थितीमुळे निर्माण झालेल्या निर्नायकी अवस्थेबाबत आजवर सोशल मीडियावरून गहजब चालला होता, परंतु आता विरोधकांबरोबरच खुद्द सत्ताधारी आमदारांनीही आपली नाराजी जाहीरपणे प्रकट करायला सुरूवात केलेली दिसते. पर्रीकर उपचारांसाठी न्यूयॉर्कला जातात न जातात तोच एवढ्या अल्पावधीत हा असंतोष चव्हाट्यावर येणे हे काही चांगले चिन्ह नव्हे. ही परिस्थिती जनतेच्या मनामधील अनिश्‍चितता अधिक गडद करणारी आणि राज्याच्या विद्यमान सरकारच्या ... Read More »

डाव्यांच्या हिंसक दडपशाहीचा पराभव

ल. त्र्यं. जोशी त्रिपुरातील पराभवाला डाव्या विचाराचा पराभव म्हणायचे काय हा प्रश्न निर्माण होतो. मला असे वाटते की, हा डाव्या विचारांची झूल पांघरुन त्यांनी केलेल्या हिंसक दडपशाहीचा पराभव आहे. कारण गेल्या २५ वर्षांत त्रिपुरामध्ये ‘नंगा नाच’ म्हणता येईल असा कारभार सुरु होता. नुकत्याच आटोपलेल्या त्रिपुरा, नागालँड व मेघालय विधानसभांच्या निवडणुकीच्या निकालावर विविध प्रतिक्रिया व्यक्त होत असतानाच सर्वांना त्रिपुराच्या निकालांचे विश्लेषण ... Read More »

खाणप्रश्‍नी लवकरच मंत्रिमंडळ बैठक : सुदिन

राज्यातील खाण प्रश्‍नावर मंत्रिमंडळाची लवकर बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत खाण विषयावर सविस्तर चर्चा करून ठराव संमत करून केंद्र सरकारला पाठविला जाणार आहे, अशी माहिती भाजप आघाडी सरकारातील ज्येष्ठ मंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल दिली. राज्यातील खाण व्यवसाय बंद झाल्यास १३०० कोटी रुपयांना थेट फटका बसणार आहे. तसेच ३००० कोटी रुपयांना अप्रत्यक्षरीत्या फटका बसणार आहे. ... Read More »

३० हजार शेतकर्‍यांचा महामोर्चा मुंबईत दाखल

>> आज विधानसभेला घालणार घेराव महाराष्ट्रभरातील ३० हजारहून अधिक शेतकरी रखरखीत उन्हाची पर्वा न करता राजधानीतील महाराष्ट्राच्या विधानसभेला आज सोमवारी घेराव घालून निदर्शने करण्यासाठी काल मुंबईत दाखल झाले. राज्यातील कृषी क्षेत्रातील विद्यमान प्रतिकूल स्थितीची दखल घेण्यास अपयशी ठरल्याचा ठपका या शेतकर्‍यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित सरकारवर ठेवला आहे. तब्बल १८० कि. मी अंतराचा खडतर प्रवास करीत हे शेतकरी काल ... Read More »

जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी कार्यालयातील प्रलंबित प्रकरणांची संख्या गेली १२ हजारांवर

राज्यातील जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी कार्यालयात मागील तीन वर्षात सुमारे १२ हजार १२० प्रकरणे तुंबून पडली आहेत, अशी माहिती मिळाली आहे. राज्य विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार नीलेश काब्राल यांच्या एका प्रश्‍नाला महसूलमंत्री रोहन खंवटे यांनी जिल्हाधिकारी व इतर कार्यालयात तीन वर्षातील प्रलंबित व इतर कामकाजाची लेखी स्वरूपात विस्तृत माहिती दिली आहे. उत्तर गोव्यातील जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी कार्यालयात ५७१७ प्रकरणे ... Read More »

महापौरपदासाठी मोन्सेरात गटातर्फे विठ्ठल चोपडेकर उमेदवार घोषित

>> उपमहापौरपदासाठी अस्मिता केरकर महानगरपालिकेच्या येत्या १४ मार्च २०१८ रोजी होणार्‍या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी माजी मंत्री बाबुश मोन्सेरात यांनी आपल्या गटाचे महापौरपदाचे उमेदवार म्हणून नगरसेवक विठ्ठल चोपडेकर आणि उपमहापौरपदाचे उमेदवार म्हणून नगरसेविका अस्मिता केरकर यांच्या नावाची घोषणा काल केली. दोनापावल येथील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये माजी मंत्री मोन्सेरात यांच्या उपस्थितीत बाबुश समर्थक गटाच्या १५ नगरसेवकांची बैठक पार पडली. या बैठकीत ... Read More »

मच्छिमारी बोटींसाठी पेट्रोल अनुदान नियम झाले कडक

विदेशात नोकरी करणार्‍या मच्छीमारांच्या बोटींसाठी पेट्रोल अनुदान न देण्याचा निर्णय मच्छिमारी खात्याने घेतला आहे. मच्छिमारी खात्याकडून मच्छीमारांना आर्थिक साहाय्य करण्यासाठी पेट्रोल अनुदान दिले जाते मच्छीमारी बोटीसाठी दिल्या जाणार्‍या पेट्रोल अनुदानाचे नियम आणखी कडक केले आहेत. या संबंधीची सूचना मच्छीमारी खात्याचे संचालक तथा सचिव गोविंद जैस्वाल यांनी जारी केली आहे. मच्छिमार बोटीचा मालक विदेशात नोकरी करीत असेल आणि आपल्या बोटीच्या वापराबाबत ... Read More »

दीन दयाळ स्वास्थ्य योजनेच्या कंपनी निवडीसाठी निविदा जारी

आरोग्य संचालनालयाने दीन दयाळ स्वास्थ्य सेवा योजनेखाली आरोग्य विमा कंपनी निवडण्यासाठी निविदा जारी केली आहे. विमा कंपन्यांना निविदा व कागदपत्रे सादर करण्यासाठी २७ मार्च २०१७ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. राज्य सरकारने सप्टेंबर २०१६ पासून दीन दयाळ स्वास्थ्य सेवा योजना राबविली जात आहे. या आरोग्य विमा योजनेचे कंत्राट युनायटेड इंडिया इन्श्युरन्स कंपनीने मिळविले आहे. या योजनेखाली सरकारी व खासगी हॉस्पिटलमध्ये ... Read More »

‘त्या’ पत्रकारासंदर्भात हस्तक्षेप करावा

>> मुफ्तींची राजनाथना विनंती काश्मीरात सुरक्षा दलांवर दगडफेक करणार्‍यांना सामील असल्याच्या आरोपावरून गेल्या वर्षीपासून एनआयएच्या अटकेत असलेल्या युवा छायापत्रकार काम्रान युसूफ याच्या सुटकेसंदर्भात हस्तक्षेप करावा अशी विनंती जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना केली आहे. काम्रान युसूफ (वय २०) या युवा छायापत्रकाराचे जीवन बरबाद होऊ नये यासाठी आपण राजनाथ सिंह यांना याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची विनंती केली ... Read More »

बंगळुरू अंतिम फेरीत

इंडियन सुपर लीगमध्ये चौथ्या मोसमात पदार्पण करणार्‍या बंगळुरू एफसीने अंतिम फेरीत धडक मारली. येथील श्री कांतीरवा स्टेडियमवर उपांत्य फेरीतील दुसर्‍या टप्यात एफसी पुणे सिटीविरुद्ध बंगळुरूने ३-१ असा भारदस्त विजय मिळविला. घरच्या मैदानावर कर्णधार सुनील छेत्री बंगळुरूच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने शानदार हॅट्‌ट्रिक नोंदविली. छेत्रीने १५व्या मिनिटाला खाते उघडले. दुसर्‍या सत्रात एकूण ६४व्या मिनिटाला पुण्याच्या सार्थक गोलुईने गोलरेषेपाशी छेत्रीला पाडले. रेफ्रींना ... Read More »