ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: March 9, 2018

नजरबंदी

भारतीय जनता पक्षाने शून्यातून भरारी घेत त्रिपुरामधील वीस वर्षांची डावी राजवट उद्ध्वस्त केल्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांकडून उन्मादाच्या भरात लेनीनचा पुतळा पाडण्यात आला आणि देशभरात पुतळे पाडण्याचे वा त्यांची नासधूस करण्याचे पेवच फुटले आहे. एकमेकांच्या विचारधारांप्रती किती पराकोटीचा दुस्वास समाजामध्ये भिनवला जात आहे याचा प्रत्ययच या घटनांतून येत आहे. निवडणुकांमध्ये जय – परायजाची पारडी वरखाली होतच असतात. एखाद्या विचारधारेची पकड असलेल्या सरकारची ... Read More »

माहिती हक्क कायदा : एक प्रभावशाली शस्त्र

आयरिश रॉड्रिगीज बिहारमधील जनतेला एका फोन कॉलवर माहिती अधिकाराखाली प्रश्न विचारता येतात. माहिती शुल्कापोटीचे दहा रुपये त्या कॉलसाठी आकारले जातात. अशा प्रकारची सुविधा गोव्याच्या जनतेला का मिळू नये? माहिती हक्क कायदा २००५ हा कायद्याचा अतिशय महत्वाचा असा घटक आहे. या कायद्यामुळे ‘आम आदमी’ सरकारी यंत्रणेसमोर ङ्गार काळ ‘असहाय’ होऊ शकत नाही. माहिती हक्क कायद्यामुळे जनतेला सरकारासंदर्भात माहिती मिळविणे अधिक सुलभ ... Read More »

पर्रीकर मुख्यमंत्री असेपर्यंत सरकारला मगोचा पाठिंबा

>> पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांची ग्वाही >> विलीनीकरणाचे वृत्त फेटाळले मुख्यमंत्रिपदी मनोहर पर्रीकर असेपर्यंत मगो पक्षाचा आघाडी सरकारला पाठिंबा राहणार आहे, अशी ठाम ग्वाही मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. मगोचे भाजपमध्ये विलीनीकरण ही निव्वळ अफवा असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. उद्या १० मार्च रोजी होणार्‍या मगो पक्ष स्थापना दिन कार्यक्रमावर विचारविनिमय करण्यासाठी आयोजित बैठकीनंतर अध्यक्ष ... Read More »

खासगी जागेतील घरे कायदेशीर करण्यास मुदतवाढ : महसूलमंत्री

खासगी जमिनीतील अनधिकृत घरे कायदेशीर करण्यासाठी निर्धारित मुदतीत अर्ज सादर करू न शकलेल्या घर मालकांचे अर्ज स्वीकारण्यात येतील. घरमालकांना अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत खास वटहुकूम जारी केला जाणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री रोहन खंवटे यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. सरकारने खासगी जमिनीतील अनधिकृत घरे कायदेशीर करण्यासाठी तारीख निश्‍चित करून अर्ज सादर करण्याचे आवाहन घरमालकांना केले होते. खासगी जमिनीतील ... Read More »

जागतिक महिलादिनी काल राजस्थानातील झुंझुनू गावातील महिलांशी थेट संवाद साधत समस्या जाणून घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. Read More »

टीडीपीच्या दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे

केंद्रातील मोदी सरकारला मोठा झटका देताना चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देशमच्या गजपती राजू आणि वाय. एस. चौधरी यांनी आपल्या मंत्रिपदाचे राजीनामे काल पंतप्रधान मोदी यांच्याकडे सोपवले. टीडीपीच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले असले तरी एनडीए सरकारला आमचा बाहेरून पाठिंबा असेल असे नायडू यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले आहे. टीडीपीच्या मंत्र्यांनी राजीनामे देण्यापूर्वी पंतप्रधानांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याशी फोनवरून चर्चा ... Read More »

मोपा विमानतळाच्या जागेतील वृक्षतोडीला ४ आठवड्यांची स्थगिती

>> मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने नियोजित मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेतील वृक्षतोडीला चार आठवड्यांसाठी तात्पुरती स्थगिती दिली असून रेनबो वॉरियर्स या बिगर सरकारी संस्थेच्या याचिकेवर चार आठवड्यांत निवाडा देण्याचा आदेश प्रधान वनसंरक्षकांना काल दिला आहे. पेडणे तालुक्यातील नियोजित मोपा विमानतळाच्या जागेतील झाडे तोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. विमानतळाच्या जागेतील सुमारे २१, ७०३ झाडे तोडण्यास वनखात्याने ... Read More »

‘सेनेटरी पॅड’ विल्हेवाटीसाठी स्त्री सखी योजनेचा शुभारंभ

गोवा कामगार कल्याण मंडळाने राज्यातील खासगी कंपन्यांमध्ये काम करणार्‍या महिला व शालेय मुलींना स्वच्छतेची सुविधा उपलब्ध करणारी नवीन अनोखी स्त्री सखी योजना महिला दिनी काल कार्यान्वित केली. महिलांना कंपन्यांमध्ये कामाच्या ठिकाणी स्वच्छ वातावरण उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. खासगी कंपन्यांमध्ये सेनेटरी पॅडची विल्हेवाट लावण्यासाठी खास यंत्रे उपलब्ध करण्याची योजना सुरू केली आहे. राज्यातील पाच ते सहा मोठ्या कंपन्यांनी महिला ... Read More »

टीम इंडियाची बांगलादेशवर मात

डावखुरा सलामीवीर शिखर धवनच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर युवा खेळांडूंचा भरणा असलेल्या भारतीय संघाने बांगलेशवर ६ गड्यांनी मात करीत कोलंबोतील प्रेमदास स्टेडियमवर खेळविण्यात येत असलेल्या निदाहास तिरंगी क्रिकेट स्पर्धेत शानदार विजयासह आपले खाते खोलले. पहिल्या लढतीत भारताला यजमान श्रीलंकेकडून पराभव स्वीकारावा लागला होता. बांंगलादेशकडून मिळालेले १४० धावांचे विजयी लक्ष्य भारतीय संघाने १८.४ षट्‌कांत गाठले. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली ... Read More »

स्कॉटलंड ‘सुपर सिक्स’ फेरीत

स्पर्धेतील आपला सलग तिसरा विजय नोंदवून काल गुरुवारी स्पर्धेच्या ‘सुपर सिक्स’ फेरीत स्थान मिळविले. स्कॉटलंडने काल नेपाळचा ४ गडी व ५१ चेंडू राखून पराभव केला. विजयासाठी मिळालेले १५० धावांचे माफक लक्ष्य स्कॉटलंडने ४१.३ षटकांत ६ गडी गमावून गाठले. १३६ चेंडूंचा सामना करताना ७ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ८८ धावांची खेळी करणारा स्कॉटलंडचा कर्णधार काईल कोएट्‌झर सामन्याचा मानकरी ठरला. नाणेफेक ... Read More »