ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: March 8, 2018

नजर केंद्राकडे

सर्वोच्च न्यायालयाच्या कठोर निवाड्याबरहुकूम राज्यातील सर्व ८८ खाणपट्‌ट्यांवरील खनिज उत्खनन बंद करण्याच्या दिशेने राज्य सरकारच्या संबंधित यंत्रणेने पावले उचलायला सुरूवात केली आहे. उत्खनन बंद ठेवा, यंत्रसामुग्री हटवा, खनिज वाहतूक बंद ठेवा असे विविध आदेश प्रशासनाने जारी केले आहेत आणि खाण उद्योगावर देखरेखीसाठी चार पथकेही तैनात केली आहेत. एकीकडे राज्याचे प्रशासन खाण बंदीच्या कार्यवाहीद्वारे सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचा मान राखण्यास पुढे सरसावले ... Read More »

पूर्व – पश्चिमेचा समतोल आणि शह

शैलेंद्र देवळाणकर जॉर्डनचे राजे किंग अब्दुल्ला दुसरे आणि व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष ट्रान दाई क्वांग यांच्या भारतभेटींमुळे मार्च महिन्याचा पहिला आठवडा भारताच्या लूक ईस्ट आणि लूक वेस्ट या धोरणांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला. जॉर्डनची बदललेलशी भूमिका पाकिस्तानला शह देण्यासाठी उपयुक्त आहे; तर हिंदी महासागरात प्रवेश करू पाहणार्‍या चीनला शह देण्यासाठी व्हिएतनामशी घनिष्ट संबंध भारतासाठी महत्त्वाचे आहेत. पूर्व व पश्‍चिमेच्या देशांशी भारत समतोल ... Read More »

खाणप्रश्‍नी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा

>> मंत्री-आमदारांचे राज्यपालांना निवेदन >> भाजप विधीमंडळ गटाची तातडीची बैठक सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील मंत्री-आमदारांच्या एका शिष्टमंडळाने काल राज्यातील खाण प्रश्‍नासंबंधीचे एक निवेदन राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांना राजभवनवर दिले. गोव्यातील खाण व्यवसाय बंद पडू नये यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा अशी सूचना केंद्राला करावी अशी मागणी सदर निवेदनाद्वारे त्यांनी राज्यपालांकडे यावेळी केली. दरम्यान, खाण ... Read More »

पर्रीकर उपचारासाठी अमेरिकेत

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार पुढील वैद्यकीय उपचारासाठी काल संध्याकाळी ५.३० वाजता अमेरिकेत दाखल झाले. ते अमेरिकेतील हॉस्पिटलमध्ये सहा आठवडे उपचार घेणार आहेत. बुधवारी पहाटे १.३० वाजता मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुख्यमंत्री पर्रीकर अमेरिकेला रवाना झाले होते. त्यांच्यासमवेत त्यांचे ज्येष्ठ पुत्र उत्पल आणि डॉक्टर आहेत, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी फेब्रुवारी ... Read More »

बाबू कवळेकरांचा अटकपूर्व जामिनासाठी नव्याने अर्ज

>> बेहिशेबी मालमत्ता प्रकरण विरोधी पक्षनेते चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांनी बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून या अर्जावरील सुनावणी १५ मार्च रोजी होणार आहे. भ्रष्टाचार विरोधी पथकाने बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कवळेकर यांच्याकडे साडेचार कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे एसीबीच्या तपासात आढळून आले आहे, ... Read More »

मनपा आकारणार व्यावसायिक शुल्क रु. ५ हजार

>> वकील, डॉक्टर आदींचा समावेश >> वार्षिक बैठकीत निर्णय महानगरपालिका क्षेत्रातील वकील, डॉक्टर व इतर व्यावसायिकांकडून परवाना व इतर शुल्कापोटी वार्षिक पाच हजार रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय महानगरपालिका मंडळाच्या सर्वसाधारण बैठकीत काल घेण्यात आला आहे. तसेच शहरात बेकायदा प्रदर्शन भरविणार्‍यांना पन्नास हजार रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त अजित राय यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. महापौर ... Read More »

मंत्र्यांच्या त्रिसदस्यीय समितीला अधिकार देणारी अधिसूचना जारी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या गैरहजेरीत राज्याचा कारभार हाताळण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तीन मंत्र्यांच्या समितीला ५ कोटी रु. तर दर एका मंत्र्याला १ कोटी रु. पर्यंतच्या विकासकामाच्या फाईल्स हातावेगळ्या करण्यासाठीचे अधिकार देण्यात आलेले असून त्यासाठीची अधिसूचना बुधवारी (आज) काढण्यात येणार असल्याची माहिती वरील समितीचे एक सदस्य व नगरविकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली. तीन सदस्यीय मंत्र्यांच्या समितीची दर ... Read More »

कुजिरा शैक्षणिक संकुलातील पार्किंग व्यवस्थेसाठी मास्टर प्लॅन

>> संकुलाचे होणार दीनदयाळ उपाध्याय असे नामकरण कुजिरा येथील शैक्षणिक संकुलाचे पं. दीनदयाळ उपाध्याय विद्या संकुल असे नामकरण केले जाणार आहे. या संकुलातील विविध समस्या सोडविण्यासाठी नियुक्त टास्क फोर्सने तेथील वाहतूक व पार्किंग समस्या सोडविण्यासाठी १० कोटी रुपये खर्चाचा मास्टर प्लॅन तयार केला आहे, अशी माहिती टास्क फोर्सचे अध्यक्ष, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. वाहतूक व ... Read More »

पुणे-बंगळुरू लढत गोलशून्य बरोबरीत

एफसी पुणे सिटी आणि बंगळुरू एफसी यांच्यात काल बुधवारी खेळविण्यात आलेला हिरो इंडियन सुपर लीगच्या उपांत्य फेरीतील पहिल्या टप्याचा सामना गोलशून्य बरोबरीत संपला. दोन्ही संघांनी जोरदार चाली रचत केलेल्या प्रयत्नांना फिनिशिंगची जोड मिळाली नाही. दुसर्‍या टप्याचा सामना रविवारी बंगळुरूमधील श्री कांतिरवा स्टेडियमवर होईल. बंगळुरूविरुद्ध पुण्याने चेंडूवरील ताब्यात ५२-४८ असे वर्चस्व राखले होते. पहिल्या सत्रात सुनील छेत्रीने फ्री-किकवर घेतलेला जोरकस फटका ... Read More »

रोहित, धवन, विराट ‘ए प्लस’ श्रेणीत

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुधवारी खेळाडूंसोबत आपली नवीन वर्षिक करार यादी काल बुधवारी जाहीर केली. यानुसार ‘ए प्लस’ या नवीन श्रेणीचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. या श्रेणीक कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, भुवनेश्‍वर कुमार व जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. या श्रेणीतील खेळाडूला बीसीसीआयकडून वर्षाला ७ कोटी रुपये मिळणार आहेत. ‘ए’ श्रेणीत महेंद्रसिंह धोनी, रविचंद्रन अश्‍विन, ... Read More »