ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: March 7, 2018

विरोधकांची चाचपणी

ईशान्य भारतातील तीन राज्ये सर केलेल्या आणि दिवसेंदिवस देश पादाक्रांत करीत निघालेल्या भारतीय जनता पक्षाचा वारू रोखायचा कसा या चिंतेने सध्या विरोधी पक्षांना घेरलेले दिसते. गुजरातमधील सुधारलेली कामगिरी, राजस्थान, मध्य प्रदेश पोटनिवडणुकांतील चमकदार विजय यामुळे कॉंग्रेसच्या पुनरुज्जीवनाचे चित्र निर्माण होत होते, परंतु ईशान्येतील तीन राज्यांपैकी मेघालय वगळता त्रिपुरा व नागालँडमध्ये पक्षाचे झालेले पानीपत आणि मेघालयमध्ये सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष बनूनही ... Read More »

‘हमीभाव निश्‍चिती कायद्या’च्या अंतरंगात…

– ऍड. असीम सरोदे देशातील शेतकर्‍यांच्या उत्पादनाला हमीभाव देण्यासंदर्भात ‘कृषी उत्पादन भाव निश्चिती न्यायाधिकरण कायदा २०१८’ या प्रस्तावित कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे. प्रस्तावित कायदा संसदेत पारित झाल्यास शेतकर्‍यांना आपल्यावर होणार्‍या अन्यायांविरोधात या कायद्यान्वये स्थापित झालेल्या न्यायाधिकरणात दाद मागता येईल.  भारतीय संविधानातील कलम ३२३(ब)(ग) मधील तरतुदीनुसार शेतकर्‍यांच्या उत्पादनाला हमीभाव देण्यासंदर्भातील कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावित कायद्याचे ... Read More »

राज्यातील खाण उद्योग १३ मार्चपासून बंद

>> खाण संचालनालयाचा आदेश >> सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी खाण संचालनालयाने दुसर्‍या टप्प्यात खाणपट्ट्यांचे नूतनीकरण केलेले खाण मालक व लीजधारकांना १३ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजल्यापासून खनिज उत्खनन बंद करण्याची सूचना एका आदेशाद्वारे केली आहे. दरम्यान, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला अनुसरून खाणींना जारी केलेले दुसर्‍या टप्प्यातील परवान्यांचे नूतनीकरण रद्द केले आहे, अशी माहिती मंडळाच्या सूत्रांनी दिली. सर्वोच्च ... Read More »

खाण प्रश्‍नी पुन्हा दिल्लीला जाणार : काब्राल

>> पियूष गोयल यांच्याबाबतचा कॉंग्रेसचा दावा खोटा गोव्यातील खाण प्रश्‍नी तोडगा शक्य नसून खाणमालकांची बाजू घेतल्यास तुरुंगाची हवा खावी लागेल असे सांगून केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी गोव्याच्या शिष्टमंडळाची बोळवण केल्याचा कॉंग्रेसचा दावा निखालस खोटा असल्याचा दावा आमदार नीलेश काब्राल यांनी काल पत्रकार परिषदेत केला. त्यांच्यासमवेत शिष्टमंडळात असलेले आमदार राजेश पाटणेकर व दीपक पाऊसकर हेही यावेळी हजर होते. खाण प्रश्‍नी ... Read More »

फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्‌ळकरीण मंदिरात छत्रोत्सवात गुलाल उधळताना भाविक. Read More »

वैद्यकीय उपचारांसाठी मुख्यमंत्री अमेरिकेला रवाना

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील वैद्यकीय उपचारांसाठी काल मध्यरात्री अमेरिकेला रवाना होत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे खास सचिव रूपेश कामत यांनी काल दिली. सोमवारी एका महत्त्वपूर्ण घडामोडीत मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सरकारी अधिकारी व सत्ताधारी गटाचे मंत्री व आमदारांशी चर्चा करून आपल्या अनुपस्थितीत सरकारी कामकाज हाताळण्यासाठी तीन मंत्र्याची खास समिती स्थापन केली होती. त्यानंतर ते सहा आठवड्यांच्या ... Read More »

महापौर – उपमहापौर निवडणूक १४ मार्चला

पणजी महानगरपालिकेच्या नूतन महापौर आणि उपमहापौर निवडण्यासाठी येत्या १४ मार्च रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. महानगरपालिकेचे महापौर सुरेंद्र फुर्तादो व उपमहापौर लता पारेख यांच्या एक वर्षाच्या कार्यकाळाची मुदत मार्च माहिन्यात पूर्ण होत आहे. दरम्यान, महापौर आणि उपमहापौरपदासाठी राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून महापौरपदाच्या शर्यतीत भाजप गटाचे नगरसेवक पुंडलिक राऊत देसाई सर्वांत पुढे असल्याची चर्चा सुरू आहे. माजी मंत्री बाबूश मोन्सेरात ... Read More »

फोंड्यात चालत्या मालवाहू ट्रकमध्ये चालकाचा मृत्यू

मालवाहू ट्रकाच्या चालकाला ट्रक चालवत असताना हृदय विकाराचा झटका आल्याने मृत्यू होण्याची घटना काल सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास खांडेपार, फोंडा येथील पुलावर घडली. दुर्दैवी चालकाचे नाव झेबीला अफझल खान पठाण (५०, डिचोली) असे असून झटका येण्यापूर्वी त्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला घेतल्याने मोठा अपघात टळला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जीए-०४-टी-५३०९ क्रमांकाचा मालवाहू ट्रक फोंडा येथे जात होता. खांडेपार पूल ओलांडताना चालकाला अचानक ... Read More »

भारताची पराभवाने सुरुवात, लंका ५ गड्यांनी विजयी

कुशल परेराच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर यजमान श्रीलंकेने निदाहास तिरंगी क्रिकेट मालिकेत विजयी सलामी देताना भारताचा ५ गड्यांनी पराभव केला. भारतीय संघाकडून मिळालेले १७५ धावांचे विजयी लक्ष्य श्रीलंकेने १८.३ षट्‌कांत ५ गड्यांच्या मोबदल्यात गाठले. कुशल परेराने ६ चौकार व ४ षट्‌कारांच्या सहायाय्याने ३७ चेंडूत ६६ धावांची आकर्षक खेळी करीत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. थिसारा परेराने नाबाद २२ धावांचे योगदान दिले. ... Read More »

अनुराधा रेडकर दक्षिण विभाग प्रशिक्षक

गोवा क्रिकेट संघाटच्या महिला प्रशिक्षक अनुराधा रेडकर यांची बदोडा येथे ९ ते १३ मार्चपर्यंत होणार्‍या अंडर-२३ महिलांच्या आंतर विभागीय किकेट स्पर्धेसाठी दक्षिण विभाग महिला संघाच्या प्रशिक्षक म्हणून अभिनंदनीय निवड झाली आहे. Read More »