ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: March 6, 2018

पुनरागमनायच

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या शारीरिक अस्वास्थ्याने पुन्हा एकवार गोमंतकीयांना सचिंत केले आहे. गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यासाठी अट्टहासाने स्वतः जातीने उपस्थित राहिलेल्या पर्रीकर यांची तब्येत पुन्हा बिघडल्याने गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात त्यांना दाखल करावे लागले तेव्हा गोमंतकीयांच्या काळजाचा ठोका पुन्हा चुकला होता. आता उपचारासाठी पुन्हा एकदा मुंबईत ‘लीलावती’ मध्ये दाखल होऊन त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अमेरिकेकडे पुढील उपचारांसाठी प्रयाण ... Read More »

दारूचे व्यसन समाजासमोरील मोठे आव्हान

देवेश कु. कडकडे (डिचोली) दारू ही पिशाच्याची करणी आहे असे म्हणतात. दारू पिण्याचा सर्वांत मोठा दुष्परिणाम सर्व रोगांना आमंत्रण देणारा आहे. स्त्रियांवरील अत्याचार, कर्जबाजारी होणे, लाजलज्जा गुंडाळणे आणि रस्त्यावरील अपघात ही दारूचीच देणगी आहे… दारू पिणे याला भारतीय समाजात कधीही मान्यता नव्हती. ते शिष्टसंमत नव्हते. त्यामुळे दारू पिणे म्हणजे काहीतरी घोर पाप केले, असा समज निदान आमच्या लहानपणी साधारण तीस ... Read More »

राज्यकारभार हाताळणार तीन मंत्र्यांची समिती

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पुढील वैद्यकीय उपचारासाठी मुंबई येथील लीलावती इस्पितळामध्ये काल दाखल झाले असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचारार्थ अमेरिकेला जाण्याची शक्यता मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय उपचारानिमित्त सहा आठवडे परराज्यात राहण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबईला रवाना होताना मुख्यमंत्रिपदाचा ताबा कुणाकडे सुपूर्द केलेला नाही. तथापि, आपल्या अनुपस्थितीत विकास व इतर कामांबाबत गैरसोय होऊ नये म्हणून राज्यकारभार हाताळण्यासाठी तीन ... Read More »

खाणप्रश्‍नी केंद्रीय मंत्र्यांबरोबर फलदायी चर्चा

>> सभापती प्रमोद सावंत यांचा दावा >>केंद्रीय मंत्री गडकरी व गोयल यांच्याशी बोलणी गोव्यातील खाण प्रश्‍नी तोडगा काढण्यासाठी नवी दिल्लीला गेलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने काल नवी दिल्लीत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व रेल्वे आणि कोळसा मंत्री पियुष गोयल यांच्याबरोबर गोव्यातील खाणप्रश्‍नी केलेली चर्चा फलदायी ठरल्याचे सभापती प्रमोद सावंत यांनी सांगितले. येत्या ८ रोजी शिष्टमंडळ पुन्हा नवी दिल्लीला जाणार असून ... Read More »

शिष्टमंडळाच्या पदरी निराशा

>> आम आदमी पक्षाची टीका राज्यातील खाण व्यवसाय प्रश्‍नी दिल्लीत गेलेल्या भाजप आघाडी सरकारच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या पदरी निराशा पडली आहे, अशी टीका आम आदमी पार्टीने पत्रकार परिषदेत काल केली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील खाण व्यवसाय १६ मार्च २०१८ पासून बंद होणार आहे. खाण व्यवसाय बंद पडल्यास मोठे आर्थिक संकट निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रश्‍नाकडे केंद्र सरकारचे लक्ष ... Read More »

भाजप पक्षसंघटन बांधणीसाठी खास मोहीम राबवणार

>> मार्च – एप्रिल महिन्यात मोहीम >> भाजप मुख्यालयातील बैठकीत ऊहापोह भारतीय जनता पक्षातर्फे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात मार्च व एप्रिल महिन्यात पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी खास मोहीम राबविण्यात येणार आहे. भाजप मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली काल सोमवारी घेण्यात आलेल्या पक्षाचे मंत्री, आमदार, राज्य कार्यकारिणी सदस्य, जिल्हा पंचायत सदस्य, मंडळ समित्यांचे अध्यक्ष व सरचिटणीस ... Read More »

भारत-लंका आज लढत

निधास करंडक तिरंगी टी-२० सामन्यांच्या मालिकेला आजपासून भारत व श्रीलंका यांच्यातील सामन्याने सुरुवात होणार आहे. भारताने या मालिकेसाठी आपल्या काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली असून श्रीलंकेचा संघदेखील अँजेलो मॅथ्यूज, असेला गुणरत्ने व शेहान मधुशंका यांच्याविना स्पर्धेत उतरणार आहे. कोहलीच्या अनुुपस्थितीत कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार्‍या रोहित शर्मावर सर्वाधिक दबाव असेल. दक्षिण आफ्रिकेतील टुकार कामगिरीनंतर त्याला सूर गवसणे भारतासाठी गरजेचे आहे. तीन फिरकीपटू ... Read More »

ऑस्ट्रेलियाची मालिकेत आघाडी

यजमान दक्षिण आफ्रिकेचा ११८ धावांनी पराभव करत ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ४१७ धावांचा पाठलाग करताना चौथ्या दिवशी द. आफ्रिकेची ९ बाद २९३ अशी स्थिती झाली होती. काल पाचव्या दिवशी जोश हेझलवूडने क्विंटन डी कॉकला वैयक्तिक ८३ धावांवर पायचीत करत द. आफ्रिकेचा डाव संपवला. सामन्यात १०९ धावांत ९ गडी बाद केलेला स्टार्क सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. सामना संपल्यानंतर ड्रेसिंग ... Read More »

पोपोविच यांच्यामुळे पुणे सिटीचा विक्रमी धाव

इंडियन सुपर लीगच्या चौथ्या मोसमात प्रवेश करताना एफसी पुणे सिटीवर एक नामुष्की आली होती. लीगच्या इतिहासात कधीही बाद फेरी गाठू न शकलेल्या दोन संघांमध्ये पुणे सिटीचा समावेश होता. नॉर्थईस्ट युनायटेड एफसीच्या जोडीला ते होते. यंदा याच पुणे सिटीने सर्बियाच्या रँको पोपोविच यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली हा कलंक पुसून टाकत बाद फेरीपर्यंत विक्रमी धाव घेतली. अकादमी, मार्केटिंग, चाहत्यांशी नाते अशा क्षेत्रांत प्रारंभीच ... Read More »

गोवर व कांजिण्या

वैदू भरत म. नाईक म्हटले तर गोवर-कांजिण्या हे क्षुद्र विकार, साथीचे व हवेतील आकस्मिक फेरबदलामुळे होणारे विकार आहेत. पण ज्यांना हे विकार होतात ती मुले अजाण, लहान असतात. त्यामुळे त्यांचे आईवडील मुलाच्या काळजीने घाबरून गेलेले असतात. त्यामुळे या विकारास निष्कारण महत्त्व देवून हा विकार लांबविला जातो. योग्य व वेळेवर केलेले लहानसे उपचार हा विकार पुनःपुनः उद्भवू देत नाही. एक काळ ... Read More »