ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: March 5, 2018

ऐतिहासिक निकाल

नुकत्याच झालेल्या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांद्वारे ईशान्य भारतामध्ये जोरदार मुसंडी मारून भारतीय जनता पक्षाने इतिहास घडवला आहे. त्रिपुरामधील डाव्यांचा लाल किल्ला उद्ध्वस्त करून तेथे अक्षरशः शून्यातून दोन तृतीयांश बहुमतापर्यंत भाजपाने मारलेली मजल ही अभूतपूर्व म्हणावी लागेल. फुटिरतावादाने ग्रासलेल्या नागालँडसारख्या राज्यामध्येदेखील भाजपाने दमदारपणे पाय रोवले आणि मेघालयमध्ये विशेष कामगिरी दाखवता आली नसली तरी तेथील सत्तेपासून कॉंग्रेसला दूर ठेवण्याच्या दिशेने केलेल्या प्रयत्नांना ... Read More »

विरोधी ऐक्यात ‘जर’,‘तर’ आणि ‘पण, परंतु’…

ल. त्र्यं. जोशी जर तर आणि पण परंतु निर्माण होण्याचे आणखी एक कारण आहे, पंतप्रधानपदाचा उमेदवार आणि ते अतिशय महत्वाचेही आहे. भाजपा किंवा एनडीएच्या बाबतीत आज तो प्रश्न अस्तित्वातच नाही आणि २०१९ नंतर लगेच तो निर्माण होण्याची शक्यताही नाही… येत्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीएचे भाजपा सरकार उलथून पाडायचे असेल तर विरोधी पक्षांचे ऐक्य अत्यंत ... Read More »

खाणप्रश्‍नी सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीला रवाना

>> आज करणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी चर्चा येत्या १५ मार्च रोजी राज्यातील खाण व्यवसाय बंद होऊ घातल्याच्या पार्श्‍वभूमीवर नवी दिल्लीतील नेत्यांना साकडे घालण्यासाठी काल राज्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळ नवी दिल्लीला रवाना झाले. हे शिष्टमंडळ आज सोमवारी सकाळी १० वाजता भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन खाण प्रश्‍नावर त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. ह्या शिष्टमंडळातील सर्व सदस्य रविवारीच (काल) नवी दिल्लीकडे ... Read More »

खाणी सुरू करण्यास सरकारला कॉंग्रेसचा पाठिंबा

येत्या १६ मार्च रोजीपासून राज्यातील खाण व्यवसाय बंद पडू नये अशी राज्य सरकारप्रमाणेच आमचीही इच्छा आहे. आणि म्हणूनच त्यासाठी राज्य सरकार जे काही प्रयत्न करू पाहत आहे त्याला पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय कॉंगे्रस पक्षाने घेतला आहे, असे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी काल सांगितले. रविवारी (काल) झालेल्या बैठकीत पक्षाच्या आमदारांचे त्याबाबत एकमत झाल्याचे कवळेकर म्हणाले. आज सोमवारी ह्या प्रश्‍नावर केंद्रीय ... Read More »

खाणींच्या लिलावाबाबत विविध पक्षांमध्ये मतभेद

राज्यातील खाणींचा लिलाव करण्यासाठी तयारी असल्याचे सरकारने म्हटले असतानाच राज्यातील विविध पक्ष व नेते यांच्यामध्ये मात्र त्याबाबत मतभेद आहेत. सरकारातील घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डचा लिलावाला विरोध असून विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री प्रतापसिंह राणे यांनाही खाणींचा लिलाव झालेला नको आहे. मनोहर पर्रीकर यांच्या सरकारातील एक घटक पक्ष असलेल्या व ‘गोंय, गोंयकार व गोंयकारपण’ हा ... Read More »

कॉंग्रेसच्या सल्ल्याची गरज नाही

>> भाजप प्रदेशाध्यक्षांचे सडेतोड प्रत्युत्तर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आजारपणामध्ये सरकारी कामकाजाकडे दुर्लक्ष करीत नाहीत. त्यामुळे सरकारी कामकाज हाताळण्याबाबत आम्हांला कॉंग्रेसच्या सल्ल्याची गरज नाही, असे चोख प्रत्युत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी पत्रकार परिषदेत काल दिले. मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या आजारपणामुळे सरकारी पातळीवर रखडणारे कामकाज हाताळण्यासाठी केअर टेकरची नियुक्ती करण्याची मागणी कॉंग्रेस पक्षाने केली होती. प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर म्हणाले की, ... Read More »

बारावीची परीक्षा आजपासून

गोवा शालान्त आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा सोमवार ५ मार्चपासून सुरू होत असून ती २६ मार्च पर्यंत चालणार आहे. यंदा १८५०२ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. बारावीची परीक्षा डिचोली, काणकोण, कुंकळ्ळी, कुडचडे, म्हापसा, मडगाव, पणजी, हरमल, पेडणे, पीलार, फोंडा, फर्मागुडी, वास्को, नावेली, पर्वरी, साखळी या केंद्रातून घेतली जाणार आहे. मंडळातर्फे प्रत्येक केंद्रासाठी उपकेंद्रे व आसन व्यवस्था करण्यात आली ... Read More »

रस्त्याचे काम अडवल्याने सुकूरमध्ये तणाव

>> पर्वरी पोलीस स्थानकावर ग्रामस्थांचा हल्लाबोल सुकूर येथे पंचायतीतर्फे करण्यात येणारे रस्ता रुंदीकरणाचे काम अडवून यंत्रसामग्रीची नासधूस करून कंत्राटदाराला जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी परिसरातील सरपंच, पंचायत सदस्य व ग्रामस्थांनी संशयिताच्या अटकेची मागणी करीत पर्वरी पोलीस स्थानकावर हल्लाबोल केल्याने गावात तणावाचे वातावरण होते. दरम्यान, सुकूर सरपंच संदीप वझरकर यांनी या प्रकरणी विल्बर टिकलो व अन्य काही जणांच्या विरोधात पोलिसांत तक्रार ... Read More »

जमशेदपूरला नमवून गोवा उपांत्य फेरीत

एफसी गोवा संघाने इंडियन सुपर लीगच्या चौथ्या मोसमाच्या उपांत्य फेरीत धडाक्यात प्रवेश केला. येथील जे. आर. डी. टाटा क्रीडा संकुलाच्या मैदानावर गोव्याने काल रविवारी जमशेदपूर एफसी संघाला ३-० असे गारद केले. उपांत्य फेरीसाठी या दोन संघांमध्ये थेट चुरस होती. गोव्याला बरोबरी पुरेशी होती, तर जमशेदपूरला निर्णायक विजय अनिवार्य होता, पण अनुभवी गोलरक्षक सुब्रत पॉल याला घोडचुकीमुळे सातव्याच मिनिटाला लाल कार्डसह ... Read More »

स्त्री असण्याचा अर्थ

 डॉ. अनुजा जोशी पुरुषाच्या आत लपलेल्या प्रेम, माया, वात्सल्य, समंजसपणा, हळवेपणा, जिद्द, चिकाटी, सहनशक्ती या ‘स्त्री असण्याच्या’ अर्थाने त्याच्या दंभ, अहंकार वर्चस्वी वृत्तीवर मात करायला हवी. आणि हळव्या स्त्रीत्वाला तिच्यातल्या कणखर पौरुषाने साथ द्यायला हवी… आयुष्याचं आभाळ अशा द्विगुणी ‘सार्थका’ने भरून जायला हवं… पुन्हा ८ मार्च पुन्हा जागतिक महिलादिन! पुन्हा एकवार स्त्रीच्या अस्तित्वाचा, जाणिवांचा उद्घोष! तिचं स्वातंत्र्य, मुक्ती आणि शक्तीचा ... Read More »