ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: March 1, 2018

गरज निष्पक्ष तपासाची

माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना काल सीबीआयने आर्थिक गैरव्यवहारासंबंधीच्या तपासात सहकार्य न केल्याच्या आरोपाखाली अटक केली. अलीकडे शीना वोरा हत्येमुळे गाजलेल्या पीटर आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या मालकीच्या आयएनएक्स मीडियाला कार्ती यांनी अर्थमंत्रीपदावर असलेल्या आपल्या पित्याच्या पदाचा ‘प्रभाव’ वापरून फायदा मिळवून देऊन त्या बदल्यात दहा लाखाची दलाली स्वीकारल्याचे हे तथाकथित प्रकरण आहे. आज कोट्यवधींच्या घरातील दलालीच्या अशा ... Read More »

काळ धोक्याचा; गरज उपाययोजनांची

शैलेंद्र देवळाणकर २०१८ हे वर्ष काश्मीरसाठी आणि भारत – पाकिस्तानच्या संघर्षाच्या दृष्टीने अत्यंत घातक वर्ष ठरण्याची शक्यता काही सुरक्षा विश्‍लेषक आणि गुप्तहेर यंत्रणा वर्तवत आहेत. दुसरीकडे सीमापार गोळीबार करून घुसखोरांना पाकिस्तान सुरक्षाकवच देत आहे. या पार्श्‍वभूमीवर भारताने एका बाजूला पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर कोंडी करतानाच काऊंटर टेररिझम टेक्निक बळकट करण्याची गरज आहे. सध्या पाकिस्तानपुरस्कृत सीमापार गोळीबार आणि दहशतवादी कृत्यांमुळे काश्मिरमध्ये अशांतता ... Read More »

खाणप्रश्‍नी आज पर्वरीत होणार सर्वपक्षीय बैठक

गोव्यातील खाण लीज गैरव्यवहारांसंदर्भात अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने एका निवाड्याद्वारे दणका दिल्यानंतर येथील खाण व्यवसायावर मोठे संकट ओढवले असल्याने त्यावर तोडग्याबाबत चर्चेसाठी आज गुरुवारी पर्वरीतील सचिवालयात सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सदर निवाड्यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जनतेने चिंता करण्याची गरज नसल्याचे वक्तव्य केले होते. मात्र अचानक मुख्यमंत्र्यांची प्रकृती बिघडल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेल्या भागातील जनतेत चिंतेचे वातावरण पसरले. ... Read More »

अभिनेत्री श्रीदेवी पंचत्वात विलीन

दुबईत शनिवारी अपघाती निधन झालेल्या अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर विलेपार्ले येथील स्मशानभूमीत काल संध्याकाळी ५.३० वाजता शासकीय इतमामात बॉलीवूड कलाकार, चाहते यांच्या मोठ्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पती बोनी कपूरसह त्यांचे कुटुंबीय व चाहत्यांनी श्रीदेवींना साश्रूनयनांनी निरोप दिला. मंगळवारी रात्री श्रीदेवी यांचे पार्थिव दुबईहून खाजगी विमानाने मुंबईत आणण्यात आल्यानंतर काल सकाळी त्यांच्या निवासस्थानी ते अंत्यदर्शनासाठी ठेवले होते. अंत्यदर्शनासाठी सकाळपासून बॉलिवूडमधील नामवंत ... Read More »

मनोहर पर्रीकरांनी सहकारी मंत्र्याकडे मुख्यमंत्रिपदाचा ताबा द्यावा ः कॉंग्रेस

आजारी असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा ताबा अद्याप कोणाकडेही दिला नसल्याने राज्याचे प्रशासन पूर्णपणे ठप्प पडल्याचा दावा काल कॉंग्रेसने केला. प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष शांताराम नाईक यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले मुख्यमंत्री पर्रीकर यांनी आपल्या पदाचा ताबा कोणाही सहकार्‍याकडे द्यायला हवा कारण मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत प्रशासन पूर्णपणे ठप्प झाले आहे. पर्रीकर हे आपल्या एखाद्या सहकारी मंत्र्याकडे पदाचा ताबा का देत ... Read More »

कार्ती चिदंबरमना अटक

कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी माजी केंद्रीय वित्तमंत्री चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना काल सकाळी सीबीआयने चेन्नईतील विमानतळावरच अटक केली. काही दिवसांपूर्वी सीबीआयने त्यांच्या चार्टर्ड अकौंटंटलाही अटक केली होती. अटकेनंतर दिल्लीतील न्यायालयाने कार्ती चिदंबरम यांना एका दिवसाची सीबीआय कोठडी सुनावली. शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या पीटर मुखर्जी व इंद्राणी मुखर्जी यांच्या आयएनएक्स मिडिया या कंपनीला २००७ साली नियमाहून अधिक ... Read More »

मुख्यमंत्री पर्रीकरांची प्रकृती स्थिर

>> शुक्रवारी लिलावतीत अपॉईंटमेंट गोवा वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या दोन-तीन दिवसांपासून अतिसार व डिहायड्रेशनसाठी उपचार घेणार्‍या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे काल गोमेकॉतील सूत्रांनी सांगितले. गोमेकॉतील तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्या प्रकृतीकडे बारीक लक्ष ठेवून आहेत. पर्रीकर यांनी सध्या पूर्णपणे विश्रांती घ्यावी व सरकारी कामकाज हाताळू नये व आजारी असताना त्यांनी सरकारी फाईल्स हातावेगळ्या करण्याच्या प्रयत्नात मानसिक ताण घेऊ नये, ... Read More »

विनानोंदणी प्लॅस्टिक पिशव्याविक्री करणार्‍यांवर १ एप्रिलपासून कारवाई

>> पणजी मनपा ः मासिक ४ हजार रुपये शुल्क पणजी महापालिकेकडे नोंदणी न करता महापालिकेच्या कार्यक्षेत्रात प्लॅस्टिक पिशव्यांची विक्री करणार्‍यांवर येत्या १ एप्रिलपासून कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त अजित रॉय यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. ज्या दुकानदारांना प्लॅस्टिकच्या पिशव्या विकायच्या असतील त्यांना पणजी माहपालिकेकडे रितसर त्यासाठीची नोंदणी करावी लागेल. ही नोंदणी करणार्‍यांना प्लॅस्टिकच्या पिशव्या विकण्यासाठीचा परवाना म्हणून नंतर दर ... Read More »

‘बंजारा’ला एसटी दर्जा वक्तव्यप्रश्‍नी लोबोंवर टीका

>> गाकुवेधकडून आंदोलनाचा इशारा परराज्यातून गोव्यात आलेल्या बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार, असे एका कार्यक्रमातून जाहीर करणारे गोव्याचे उपसभापती मायकल लोबो यांच्यावर काल ‘गाकुवेध’ने पत्रकार परिषदेत जोरदार टीका केली. तसेच लोबो यांनी तसा प्रयत्न केल्यास गाकुवेध आंदोलन छेडेल, असा इशारा दिला. बंजारा समाज हा गोव्यातील नव्हे त्या समाजातील लोक हे गोव्यात राहत असले तरी ते ... Read More »

एटीकेला दणका देत गोव्याची चौथ्या स्थानावर झेप

एफसी गोवा संघाने हीरो इंडियन सुपर लिगच्या चौथ्या मोसमात गतविजेत्या एटीकेवर ५-१ असा दणदणीत विजय नोंदविला. याबरोबरच गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर झेप घेत गोव्याने बाद फेरीच्या आशा कायम राखल्या. नेहरू स्टेडीयमवरील घरच्या मैदानावर गोव्याने पूर्वार्धातच तीन गोलांचा धडाका लावत भक्कम पकड घेतली. एफसी गोवाच्या या विजयामुळे केरळा एफसीचे बाद फेरीत प्रवेशाच्या आशा संपुष्टात आल्या. आता एफसी गोवा आणि जमेशदपूर यांच्यात ४ ... Read More »