ब्रेकिंग न्यूज़

Monthly Archives: March 2018

एवढी घाई का?

सन २०३० चा प्रादेशिक आराखडा आणणार म्हणता म्हणता गेली सहा वर्षे शीतपेटीत टाकलेला दिगंबर कामत सरकारने तयार केलेला प्रादेशिक आराखडा २०२१ मागील दाराने लागू करण्याची पाळीच विद्यमान भाजप सरकारवर ओढवलेली दिसते. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर रुग्णशय्येवर असताना एवढ्या तातडीने त्यांच्या अनुपस्थितीत हा प्रादेशिक आराखडा एवढ्या लगबगीने लागू करण्याची विजय सरदेसाई यांची कृती संशय निर्माण करणारी आहे. प्रादेशिक आराखड्याअभावी मागील आराखड्यांच्या आडून ... Read More »

पारंपरिक युद्धाचा नवा अवतार

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) शत्रूच्या ठिकाणांवरील प्रत्यक्ष पारंपरिक आक्रमणात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे सीमापारहून झालेल्या दहशतवादी कृत्यांचा बदला घेण्यासाठी सहसा सीमापार हल्ला केला जात नाही. सीमापार कारवाईसाठी क्रॉस एलओसी ङ्गायरिंगचा पर्याय अतिशय परिणामकारी आहे. पाकिस्तानने गेल्या ३० वर्षांपासून भारताविरुद्ध छेडलेले प्रछन्न युद्ध ही पारंपरिक युद्धाची पुढची पायरी असून हे युद्ध जिंकण्यासाठी भारतीय सेनेला त्याचप्रमाणे तयारी करावी लागणार आहे. ... Read More »

सीबीएसई : बारावी अर्थशास्त्राची २५ एप्रिलला फेरपरीक्षा

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ तथा सीबीएसईच्या दहावी व बारावीच्या अनुक्रमे गणित व अर्थशास्त्र विषयांच्या पेपरफुटीनंतर दोन दिवसांच्या निदर्शनानंतर काल अर्थशास्त्र विषयाची फेरपरीक्षा येत्या २५ एप्रिलला होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र दहावीच्या गणित विषयाच्या पेपरफुटीप्रकरणी तपास सुरू असून त्या फेरपरीक्षेचा निर्णय १५ दिवसात घेण्यात येईल. ही फेर परीक्षा झाल्यास ती दिल्ली व हरयाणा या राज्यातच जुलै महिन्यात होणार आहे. याबाबतची ... Read More »

कोलवाळ तुरुंगातील पार्टीची न्यायदंडाधिकार्‍यांमार्फत चौकशी

सरकारने कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहातील भांग पार्टी प्रकरणाची न्यायदंडाधिकार्‍यांमार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी (१) यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून या भांग पार्टी प्रकरणाचा चौकशी अहवाल ३० दिवसात सादर करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. यासंबंधी गृहखात्याच्या अवर सचिव नितल आमोणकर यांनी आदेश जारी केला आहे. कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात महाशिवरात्रीच्या दिवशी गेल्या १३ ... Read More »

गृहआधारच्या नव्या ४हजार अर्जांना मान्यता : विश्‍वजीत

महिला आणि बाल कल्याण खात्याकडून गृहआधार योजनेखाली नवीन ४ हजार अर्जांना मान्यता दिली जाणार आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री विश्‍वजित राणे यांनी दिली. महिला व बाल कल्याण खात्यातर्फे महिलांसाठी स्वावलंबन योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेखाली नोंदणीकृत महिला मंडळांना दरवर्षी २० हजार रुपये देण्यात येणार आहेत. तसेच खाद्यपदार्थ व विविध प्रकारचे प्रशिक्षण घेण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी ८ हजार ... Read More »

‘रेरा’ नोंदणीचा आज अंतिम दिवस

गोवा रिअल इस्टेट रेग्युलेटरी प्राधिकरणाकडे बिल्डर, प्रवर्तक, एजंट यांना पन्नास हजार रुपयांच्या दंडाच्या रक्कमेसह नोंदणीसाठी ३१ मार्च २०१८ हा शेवटचा दिवस आहे. रेराअंतर्गत आत्तापर्यंत केवळ २० एजंट आणि ४२ इमारत प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. प्राधिकरणाने बिल्डर, एजंट यांना नोंदणीसाठी २३ मार्च २०१८ पर्यत मुदत दिली होती. तसेच, पन्नास हजार रुपयांच्या दंडासह नोंदणीसाठी ३१ मार्च २०१८ पर्यत अर्ज अपलोड करण्याची ... Read More »

खाण महामंडळाचा विचार व्हावा : क्लॉड

खाण लिजांचा लिलाव करणे हाच एकमेव पर्याय नसून खाण महामंडळही स्थापन करता येईल, असेही सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले असल्याने सरकारने त्याबाबतही विचार करावा, असे क्लॉड आल्वारीस यांनी काल सांगितले. सरकारने खाण महामंडळ स्थापन केले तर त्याचा सर्वांत जास्त फायदा हा खाण अवलंबितांनाच होणार असल्याचे आल्वारीस यांचे म्हणणे आहे. सरकारने खाण महामंडळ स्थापन केले तर खाण अवलंबितांना सहकारी तत्वावर खाणी ... Read More »

घरगुती वीज दरवाढीचा सर्वसामान्य ग्राहकांना बसणार धक्का : दिगंबर

>> निर्णयाचा वीज खात्याने फेरविचार करावा राज्याच्या वीज खात्याने घरगुती वापराच्या वीज दरात ११.४८ टक्के अशी मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी उद्या १ एप्रिलपासून होणार आहे. ही दरवाढ सर्वसामान्यांना मोठा धक्का ठरणारी असल्याने त्याबाबत फेर विचार करावा अशी प्रतिक्रिया अनेक वर्षे वीजमंत्री म्हणून काम केलेले विद्यमान आमदार दिगंबर कामत यांनी या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली. सामान्य जनतेला ... Read More »

वीज दरवाढीवर सरकारला ‘आप’ची सूचना

घरगुती वापरासाठीच्या वीज दरात ११.४८ टक्के एवढी वाढ केलेल्या गोव्याच्या वीज खात्याला व गोवा सरकारला दिल्लीतील आम आदमी सरकारकडून बरेच काही शिकता येईल, असे आम आदम पार्टीचे सरचिटणीस प्रदीप पाडगावकर यांनी काल सांगितले. २०१५ साली दिल्लीत ‘आप’चे सरकार सत्तेवर आल्यानंतर केवळ १० दिवसांत सरकारने पंचसुत्री कृती योजना अमलात आणताना जे लोक ४०० युनीटपर्यंत वीज वापरतात त्यांना वीज बिलात ५० टक्के ... Read More »

दक्षिण आफ्रिका किंचित वरचढ

दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला कालपासून प्रारंभ झाला. यजमानांनी पहिल्या दिवसअखेर ३१३ धावा करत किंचित वर्चस्व मिळविले. पाहुण्यांनी त्यांचे ६ गडी बाद करत पहिल्याच दिवशी सामना हातातून निसटणार नाही याची दक्षता घेतली. चेंडू छेडछाड प्रकरणानंतर कालपासून सुरू झालेल्या शेवटच्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यजमानांनी तिसर्‍या कसोटीतील संघच कायम ठेवला तर पाहुण्यांनी ... Read More »