ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: February 13, 2018

कोण कोणत्या बाजूस?

काश्मीरसंदर्भात काल दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. पहिल्या घटनेत श्रीनगरच्या मध्यवस्तीतील सीआरपीएफच्या एका मुख्यालयावर दहशतवादी हल्ला झाला. दुसर्‍या घटनेत सर्वोच्च न्यायालयाने शोपियान गोळीबार प्रकरणात मेजर आदित्यकुमार या १०, गढवाल रायफलच्या अधिकार्‍याविरुद्ध जम्मू काश्मीर पोलिसांनी नोंदवेल्या खुनाच्या गुन्ह्यासंबंधीच्या कारवाईस तूर्त मज्जाव केला आहे. जम्मूतील सुंजवानमधील हल्ल्यापाठोपाठ खुद्द श्रीनगर शहराच्या मध्यवस्तीत पुन्हा अशा प्रकारचा आत्मघाती हल्ला चढवला जातो हे जम्मू काश्मीरमधील परिस्थिती सध्या ... Read More »

स्त्रियांवरील वाढते अत्याचार चिंताजनक

शंभू भाऊ बांदेकर एका बाजूने हजारो वर्षापासून सुसंस्कृतपणाची आपल्या देशाची परंपरा सांगणार्‍या देशात आता स्त्रियांवरील अत्याचारांची परंपरा जणू जन्माला घातली जात आहे. प्रत्येकाने विचार करण्यासारखीच अशी ही बाब आहे. केंद्र सरकार काय किंवा राज्य सरकार काय, स्त्रियांच्या सबलीकरणासाठी त्यांच्यावर होणारे जुलूम, जबरदस्ती, अत्याचार नाहीसे करण्यासाठी प्रयत्नशील असते. ते सरकार मग कुठल्याही राजकीय पक्षाचे असो, त्यांनी स्त्रीमुक्तीसाठी आणि स्त्री सबलीकरणासाठी प्रयत्नशील ... Read More »

पुतळ्यांच्या ठरावांचा कामकाजात समावेश न करण्याचा निर्णय

>> अन्य खासगी ठराव विधानसभेत स्वीकृत पर्वरी येथे विधानसभा संकुलात पुतळ्याची मागणी करणारे पाच खासगी ठराव आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या खासगी कामकाजात समाविष्ट न करण्याचा निर्णय विधानसभेने काल घेतला. येत्या १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या राज्य विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी भाजपचे आमदार तथा उपसभापती मायकल लोबो आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी जॅक सिक्वेरा यांचा पुतळा उभारण्यासाठी खासगी ठरावाची नोटीस दिली होती. ... Read More »

लष्करी अधिकार्‍यांवरील एफआयआरला स्थगिती

शोपियान येथील एका कारवाई दरम्यान लष्करी गोळीबारात तीन नागरिकांच्या मृत्यूप्रकरणी जम्मू काश्मीर पोलिसांनी एफआयआर दाखल केलेल्या मेजर आदित्य कुमार व अन्य लष्करी अधिकार्‍यांवर कोणतीही कारवाई करू नये असा आदेश काल सर्वोच्च न्यायालयाने दिला. या एफआयआरला न्यायालयाने स्थगिती दिली. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकर व न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी काल सुनावणी झाली. मेजर आदित्य कुमार यांचे ... Read More »

ग्रेटर पणजी पीडीए स्थापनेचा आदेश आज

माजी मंत्री बाबुश मोन्सेरात यांच्या नेतृत्वाखालील बहुचर्चित ग्रेटर पणजी ह्या नव्या नियोजन आणि विकास प्राधिकरणाच्या स्थापनेसाठीचा आदेश आज दि. १३ रोजी येणार असून त्यासाठीची फाईल यापूर्वीच कायदा खात्याकडे पाठवण्यात आली असल्याचे नगर आणि नियोजन खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांनी काल सांगितले. गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश केलेले माजी मंत्री बाबुश मोन्सेरात यांना ग्रेटर पणजी पीडीएचे अध्यक्षपद देण्यात येणार असून त्यावरील इतरांची ... Read More »

खाणींच्या विषयावर सर्वपक्षीय बैठक बोलवावी ः कॉंग्रेस

खाणींचा विषय योग्य प्रकारे हाताळता न आल्याने खाण बंदीची परिस्थिती पुन्हा ओढवली असून खाणीचा विषय गुंतागुंतीचा बनत चालला आहे. या विषयावर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. तसेच खाण क्षेत्रातील भागधारकांची खास बैठक घेऊन त्यांच्याशी विचार विनिमय करावा, अशी मागणी गोवा प्रदेश कॉँग्रेस समितीचे अध्यक्ष शांताराम नाईक यांनी पत्रकार परिषदेत काल केली. कॉंग्रेस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नाईक ... Read More »

आरोग्य खाते परिचारिकांच्या २०० जागा लवकरच भरणार

आरोग्य खात्यातर्फे परिचारिकांच्या २०० जागा लवकरच भरण्यात येणार आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी काल दिली. बांबोळी येथील नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये एका कार्यक्रमात बोलताना आरोग्य मंत्री राणे यांनी ही माहिती दिली. नर्सिंग इन्स्टिटूटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सूचना आरोग्य मंत्री राणे यांनी केली. राज्यात परिचारिकांच्या अनेक जागा रिकाम्या आहेत. सरकारकडून पहिल्या टप्प्यात समारे २०० नर्सचे जागे भरण्यात येणार आहे. नर्सच्या ... Read More »

…म्हणूनच गोव्यात सिनेपंढरी बनली ः सचिन खेडेकर

कलासक्त असणे हा गोव्याचा गुण घेण्यासारखा आहे. गोवा हे कलेचे, संस्कृतीचे माहेरघर आहे म्हणूनच इथे इफ्फीच्यारुपाने नाट्यपंढरीची सिनेपंढरी होवू शकली असे गौरवोद्गार ख्यातनाम अभिनेता सचिन खेडेकर यांनी काढले. आयुष्यभर कलेची सेवा केली. कलेसाठी आयुष्य वेचले त्यांचा शासनाने आदर करावा ही फार मोठी गोष्ट आहे, असे प्रतिपादन त्यांनी काल येथे केले. कला-संस्कृती संचालनालयातर्फे काल गोवा राज्य सांस्कृतिक पुरस्कार (२०१६-१७) बारा कलाकारांना, ... Read More »

देशातील ३१ पैकी ११ मुख्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल

>> सर्वात श्रीमंत चंद्राबाबू नायडू ः अरुणाचलचे प्रेमा खांडू सर्वात तरुण नॅशनल इलेक्शन वॉॅच आणि असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स यांनी देशातील २९ राज्यांचे मुख्यमंत्री आणि २ केंद्रशासित प्रदेशातील मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या शपथपत्राच्या केलेल्या विश्‍लेषणात एकूण ३१ मुख्यमंत्र्यांपैकी ११ मुख्यमंत्र्यांच्या (३५ टक्के) विरोधात गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र, केरळ, दिल्ली, झारखंड, पंजाब, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ... Read More »

दक्षिण आफ्रिकेसाठी आज विजय अत्यावश्यक

>> पाचव्या एकदिवसीय सामन्याद्वारे भारताला मालिका विजयाची संधी भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा एकदिवसीय सामना आज खेळविण्यात येणार आहे. चौथा सामना जिंकून यजमानांनी मालिकेतील आव्हान कायम राखले असले तरी आजचा सामनादेखील त्यांच्यासाठी ‘करो या मरो’च असणार आहे. चौथ्या लढतीत भारताच्या फिरकीपटूंना झोडपून काढल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा आत्मविश्‍वास उंचावला असून पाचव्या सामन्यात याची पुनरावृत्ती करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. पावसाचा व्यत्यय व ... Read More »