ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: February 12, 2018

खरे हल्लेखोर

जम्मूमधील संजवानमध्ये जैश ए महंमदच्या दहशतवाद्यांनी चढवलेला आत्मघाती हल्ला हा भारतमातेच्या उरावरील आणखी एक घाव आहे. दरवर्षी अशा प्रकारचे अगणित आत्मघाती हल्ले होत असूनही या सर्वांची पाकिस्तानातील पाळेमुळे उखडून फेकण्याची हिंमत अद्याप भारत सरकार दाखवू शकत नाही ही शरमेची बाब आहे. सर्जिकल स्ट्राईकने या देशाचा जागवलेला देशाचा स्वाभिमान पुन्हा लयाला गेला की काय असे वाटण्याजोगी आज परिस्थिती आहे. काश्मीर खोर्‍यात ... Read More »

नकारात्मकतेचा घंटानाद

ल. त्र्यं. जोशी (नागपूर) नकारात्मकता हा काही भारतीयांच्या विचारपध्दतीचा नवा आयाम नाही. माझ्या आठवणीप्रमाणे १९८० च्या दशकात त्यावेळचे नागपूर तरुण भारतचे मुख्य संपादक दि. भा. घुमरे यांनी ‘निगेटिव्हीजम’ या शब्दाचा वापर करुन या प्रकाराकडे लक्ष वेधले होते. कोणत्याही गोष्टीचा सकारात्मक विचार करायचे टाळून नकारात्मकच विचार करण्याच्या या प्रवृत्तीला घुमरे यांनी ‘निगेटिव्हीजम’ म्हटले होते. पण अलीकडे व विशेषत: नरेंद्र मोदी पंतप्रधान ... Read More »

सुंजवानमधील चारही दहशतवाद्यांचा खात्मा

>> शहीद सैनिकांची संख्या ५ वर : दहा नागरीक जखमी जम्मू-पठाणकोट मार्गावर असलेल्या सुंजवान लष्करी तळावर शनिवारी पहाटे जैश-ए-मोहम्मद या संघटनेच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याविरोधातील मोहीम भारतीय जवानांनी सर्व चारही दहशतवाद्यांचा खात्मा करून फत्ते केली असली तरी या तुंबळ धुमश्‍चक्रीत हौतात्म्य पत्करलेल्या जवानांची संख्या काल पाचवर गेली. एका स्थानिक नागरीकाचाही यावेळी मृत्यू झाला. या मोहिमेदरम्यान परिसरातील सहा महिला व बालकासह १० ... Read More »

खाणींचा लिलाव धोकादायक

>> कॉंग्रेस ः स्थानिक उद्योजकांकडेच व्यवसाय हवा गोवा फॉरवर्ड पार्टीचे प्रमुख व नगर नियोजन खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांच्या पाठोपाठ कॉंग्रेस पक्षानेही राज्यातील खाणींचा लिलाव करणे धोक्याचे ठरणार असल्याचे म्हटले असून हा लिलाव केला जाऊ नये, अशी भूमिका घेतली आहे. प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष शांताराम नाईक यांना काल यासंबंधी विचारले असता ते म्हणाले की, राज्यातील खाणींचा लिलाव करण्यात आला तर देशभरातील ... Read More »

सरकारने खाण महामंडळ स्थापन करावे ः क्लॉड अल्वारीस

>> गोवा फाऊंडेशनतर्फे सरकारसमोर पर्याय सरकारने खाण महामंडळ स्थापन करावे. राज्यातील सर्व खाणी स्वतःच्या ताब्यात ठेवाव्यात व केवळ खनिज उत्खननाचा लिलाव करावा. हा लिलाव करताना कुठल्या खाणपट्ट्यातून किती खनिजाचे उत्खनन करता येईल ते स्पष्ट करावे म्हणजे कुणालाही अमर्यादपणे खनिज उत्खनन करता येणार नाही. ५ ते १० हेक्टरपर्यंतचे छोटे खनिज पट्टे उत्खननासाठी स्थानिक लोकांना द्यावेत. त्यासाठी ह्या लोकांना त्यांच्या सहकारी सोसायट्या ... Read More »

‘त्या’ वाहतूक पहारेकर्‍याची अज्ञातांविरुध्द पोलीस तक्रार

पोलीस खात्याने वाहतूक नियमभंग करणार्‍याची छायाचित्रे घेण्यासाठी नियुक्त केलेल्या आदित्य कटारिया नामक वाहतूक पहारेकर्‍याला जाब विचारण्याचा प्रयत्न काही नागरिकांनी सांताक्रुज येथे केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात ओल्ड गोवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वाहतूक पहारेकर्‍याला जाब विचारणे, हुज्जत घालणार्‍याविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी शुक्रवारी दिला होता. त्यानंतर केवळ चोवीस तासात वाहतूक पहारेकर्‍याला घेराव घालून जाब विचारण्याची ... Read More »

रशियन प्रवासी विमान दुर्घटनाग्रस्त ः ७१ ठार

रशियाची राजधानी मॉस्को शहराच्या सीमेनजीक काल एक प्रवासी विमान दुर्घटनाग्रस्त होऊन त्यातील सहा कर्मचार्‍यांसह सर्वच्या सर्व ७१ जण ठार झाले. या अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मॉस्कोतील दोमोदेदोवो विमानतळावरून सारातोव एअरलाईन्सच्या या विमानाने उड्डाण केले होते. मॉस्कोहून ते ओरस्क येथे जात होते. विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटातच या विमानाचा रडारशी संपर्क तुटला. त्यानंतर ते विमानतळापासून सुमारे ४० कि. मी. ... Read More »

राजकारणात पुढे येण्यासाठी महिलांना प्रोत्साहनाची गरज

>> ‘डिफिकल्ट डायलॉग्ज’ परिसंवादात सूर राजकारणामध्ये महिलांना पुढे येण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. केंद्र व राज्यस्तरावर ३३ टक्के आरक्षण मिळविण्यासाठी महिलांनी दबाव गट निर्माण केला पाहिजे, असे प्रतिपादन पवन के. वर्मा यांनी येथे काल केले. दोनापावल पणजी येथील गोवा इंटरनॅशनल सेंटर आणि गोवा विद्यापीठ यांनी संयुक्त विद्ममाने आयोजित ‘डिफिकल्ट डायलॉग’ या विचार महोत्सवात राजकारणात महिला या विषयावरील चर्चेत वर्मा बोलत ... Read More »

चहलच्या ‘नो बॉल’मुळे भारताचा पराभव

यजमान दक्षिण आफ्रिकेने चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतावर ५ गड्यांनी विजय मिळवत सहा सामन्यांच्या मालिकेतील आपले आव्हान कायम राखले होते. पहिले तिन्ही सामने जिंकून मालिका विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करणार्‍या भारतीय संघाच्या विजयी दौडीला या पराभवामुळे ब्रेक लागला. केवळ २७ चेंडूंत नाबाद ४३ धावा केलेला यष्टिरक्षक फलंदाज हेन्रिक क्लासेन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० ... Read More »

मध्य प्रदेशकडून गोव्याची हार

>> विजय हजारे क्रिकेट स्पर्धा विजय हजारे क्रिकेट स्पर्धेतील काल रविवारी झालेल्या लढतीत गोव्याला मध्यप्रदेशकडून ८ गड्यांनी दारुण पराभव स्वीकारावा लागला. ‘क’ गटात असलेल्या गोव्याने प्रथम फलंदाजी करताना २२० धावा केल्या. मध्यप्रदेशने केवळ २५.४ षटकांत विजयी लक्ष्य गाठत १४६ चेंडू राखत विशाल विजयाला गवसणी घातली. मध्यप्रदेशने या सामन्यात नाणेफेक जिंकून गोव्याला प्रथम फलंदाजी दिली. अमोघ देसाई (३९) व स्वप्नील अस्नोडकर ... Read More »