ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: February 7, 2018

प्रत्युत्तराची प्रतीक्षा

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने पुन्हा एकवार आपली कुरापतखोरी सुरू केली आहे. नुकत्याच राजौरी जिल्ह्यातील भिंबर गली भागामध्ये पाकिस्तानने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात आपल्या कॅप्टन कपिल कुंडू या उमद्या अधिकार्‍याला त्याच्या तीन सहकार्‍यांसह हौतात्म्य प्राप्त झाले. गेल्या वर्षीपासून पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर सातत्याने युद्धबंदीचे उल्लंघन करीत असे हल्ले सुरू ठेवले आहेत. अशा प्रकारचा क्षेपणास्त्र हल्ला म्हणजे जणू युद्धाचीच ललकार ... Read More »

अब्रुनुकसानी आणि कायदा

ऍड. असीम सरोदे केजरीवाल आणि जेटली यांच्यातील अब्रुनुकसानीचे प्रकरण सध्या नव्याने चर्चेत आले आहे. मुळातच आपल्याकडे अब्रूनुकसानीचा कायदा हा पूर्णपणे दुर्लक्षित राहिलेला आहे. शक्य असेल तेव्हा कोणालाही काहीही बोलण्याचे स्वातंत्र्य आहे, परवानगी आहे असे वातावरण भारतात आहे. वास्तविक, लोकशाहीला अमान्य असलेल्या प्रकारांबद्दल शासनाने कठोर भूमिका घेण्याचा प्रयत्न करणे हा एक प्रकारे लोकशाहीवर हल्लाच आहे हेही यानिमित्ताने लक्षात घ्यावे लागेल. केंद्रीय ... Read More »

पुतळा प्रश्‍नावरून राजकारण तेजीत

>> विधानसभेत आणखी तीन पुतळ्यांची मागणी >> भाजप व मगोचे खासगी ठराव पर्वरी येथील विधानसभा संकुलात पुतळे उभारण्याच्या प्रश्‍नावरून शह काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे. काल डिचोलीचे भाजपचे आमदार राजेश पाटणेकर यांनी पर्वरी येथे विधानसभा संकुलात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचा खासगी ठराव सादर केला. तर सावर्डे मतदारसंघाचे मगोपचे आमदार दीपक पाऊसकर यांनी डॉ. राम मनोहर लोहिया आणि टी. ... Read More »

इस्पितळावर हल्ला चढवून पाकिस्तानी दहशतवादी फरार

श्रीनगरमधील एका इस्पितळावर दहशतवाद्यांनी हल्ला चढवून इस्पितळात आरोग्य तपासणीसाठी आणलेल्या एका पाकिस्तानी कैद्याला पळवून नेण्याची घटना काल घडली. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले असून अनेक पोलीस जखमी झाले आहेत. पळून गेलेला दहशतवादी अबू हंजुला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. श्रीनगरच्या एसएमएचएस इस्पितळावर काल दुपारी दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला. दहशतवादी अबू हंजुला याची तपासणी करण्यासाठी इस्पितळात आणण्यात आले होते. त्याचा ... Read More »

अभ्यासक्रमात योगाचा समावेश करावा

>> मगो केंद्रीय समितीच्या बैठकीत ठराव पर्वरी येथे विधानसभा संकुलात डॉ. राम मनोहर लोहीया, डॉ. टी. बी. कुन्हा यांचे पुतळे उभारणे, राज्यातील राज्यमार्ग आणि जिल्हा मार्गांना स्वातंत्र्य सैनिकांची नावे द्यावीत आणि शिक्षण क्षेत्रात माध्यमिक व उच्च माध्यमिक स्थरावर योगाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा, असे ठराव मगोपच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत काल संमत करण्यात आले. मगोपचा स्थापना दिवस १० मार्च रोजी धूमधडाक्यात ... Read More »

वास्कोत एमपीटी कामगारांचा रोजगार बचावासाठी महामोर्चा

मुरगाव बंदरातील खनिज मालाची निर्यात बंद झाल्याने तसेच गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने एमपीटीला कोळसा हाताळणी करण्यास निर्बंध लादले असल्याने या बंदरात कित्येक जणांना रोजगाराला मुकावे लागले आहे. गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या या भूमिकेविरुध्द मुरगाव बंदरातील बेरोजगार कामगारांनी ‘रोजगार बचाव अभियान’ संघटना तयार करून काल सकाळी तीन हजारांपेक्षा अधिक कामगारांनी वास्को शहरातून शांततापूर्ण रॅली काढून एमपीटीवरील निर्बंध मागे घेण्याची ... Read More »

‘त्या’ उमेदवारांच्या उद्यापासून मुलाखती

>> उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील भरती येथील उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील कनिष्ठ कारकून पदासाठी ८ ते १० फेब्रुवारी दरम्यान अर्ज सादर केलेल्या उमेदवारांच्या तोंडी मुलाखती घेण्यात येणार आहेत. तर डेटा एन्ट्री ऑपरेटरपदासाठी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची तोंडी मुलाखती १२ फेब्रुवारीला उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात येणार आहेत. उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात कंत्राटी पद्धतीवर दहा महिन्यांसाठी ४० कनिष्ठ कारकून आणि २४ ... Read More »

‘फेव्हरिट’ मैदानावर द.आफ्रिकेचा कस

>> भारताविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना आज भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील सहा एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आज न्यूलँड्‌सच्या मैदानावर खेळविण्यात येणार आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये यजमानांचे हे सर्वांत आवडते मैदान असून या मैदानावर ३३ पैकी २८ सामन्यांत त्यांनी विजय मिळविला आहे. परंतु, फिरकी व दुखापती यामुळे त्रस्त असलेल्या द. आफ्रिकेला आपल्या फेव्हरिट मैदानावर जिंकण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागणार हे मात्र ... Read More »

भारताची हॉंगकॉंगवर मात

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी.व्ही. सिंधूच्या धमाकेदार कामगिरीमुळे काल मंगळवारी भारताने आशियाई सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत हॉंगकॉंगवर ३-२ असा थरारक विजय मिळविला. सायनाने माघार घेतल्यामुळे सिंधूवरील जबाबदारी वाढली होती. सिंधूने सर्वप्रथम एकेरीतील सामना जिंकला व यानंतर एन.सिक्की रेड्डीसह दुहेरीतील सामना जिंकून भारताचा विजय साकारला. इंडिया ओपनच्या अंतिम फेरीतील पराभवातून सावरताना सिंधूने काल महिला एकेरीच्या पहिल्या सामन्यात यिप पुई यिन हिच्यावर २१-१२, ... Read More »

भारतासाठी सोपा ‘ड्रॉ’

ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे ४ ते १५ एप्रिल या कालावधीत होणार्‍या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या मिश्र सांघिक बॅडमिंटन संघाला सोपा ‘ड्रॉ’ लाभला आहे. काल मंगळवारी जाहीर ‘ड्रॉ’नुसार भारताचा ‘अ’ गटात समावेश करण्यात आला आहे. या गटात पाकिस्तान, स्कॉटलंड व श्रीलंका हे देश आहेत. या ड्रॉमुळे भारताचा बाद फेरीतील प्रवेश निश्‍चित मानला जात आहे. मागील वेळी भारताने बॅडमिंटनमध्ये १ सुवर्ण, १ ... Read More »