ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: February 6, 2018

कर्नाटकचा बिगूल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेंगलुरूमधील विराट सभेने भाजपाचे कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. गतवर्ष अखेरीस भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी प्रारंभ केलेल्या परिवर्तन यात्रेची सांगता करताना मोदींनी कॉंग्रेसमुक्त कर्नाटकची हाक दिली आहे. भाजप आणि अर्थातच कॉंग्रेससाठीही कर्नाटकची निवडणूक विलक्षण प्रतिष्ठेची आहे. पंजाब आणि कर्नाटक ही दोनच बडी राज्ये आज कॉंग्रेसच्या हाती आहेत आणि कर्नाटक हातचे गेले तर ... Read More »

‘एक गाव, एक शाळा’ कशी असावी?

टी. एम. खोबरेकर महाराष्ट्र सरकारने ‘एक गाव, एक शाळा’ योजना आखली आहे. गावात एकच आदर्श शाळा असावी यादृष्टीने आखली गेलेली ही योजना आहे, परंतु ती प्रत्यक्षात साकारू शकेल काय? महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने मराठी प्राथमिक शाळांमधील दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करून ‘एक गाव, एक शाळा’ ही योजना आखली आहे. धोरण तसे चांगले आहे. मात्र ही गावातील एकमेव शाळा ... Read More »

कवळेकरांनी ‘एसीबी’समोर येण्याचे टाळले

>> बेहिशेबी मालमत्ता प्रकरण >> विधानसभा अधिवेशनाच्या कामात व्यस्तचे कारण बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी भ्रष्टाचार विरोधी पोलिसांसमोर चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे विरोधी पक्ष नेते बाबू कवळेकर यांनी काल टाळले. येत्या विधानसभा अधिवेशनामुळे आपण व्यस्त असल्याने हजर राहू शकणार नसल्याचे कारण त्यांनी एसीबीला दिले आहे. एसीबीने त्यांना चौकशीसाठी हजर राण्यासाठी रविवारी समन्स बजावले होते. कवळेकर यांना काल सकाळी ११ वाजता आपल्यासमोर हजर राहण्यासाठीचे ... Read More »

घरोघरी वाहिनीद्वारे लवकरच गॅसपुरवठा

>> करंजाळे, ताळगावात युद्धपातळीवर काम सुरू महानगरपालिका आणि आसपासच्या भागात स्वयंपाक गॅसपुरवठा करण्यासाठी भूमिगत गॅस वाहिनी घालण्याचे काम करंजाळे, ताळगाव या भागात सुरू झाले आहे. गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया (गेल) आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे (बीपीसीएल) या कंपन्यांतर्फे गॅस वाहिनी घालण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे घरोघरी वाहिनीतून गॅस पुरवठ्याची कल्पना काही महिन्यांतच साकारणार आहे. हा प्रकल्प मार्गी लागल्यानंतर ग्राहकांना ... Read More »

ज्येष्ठ अभिनेत्री सुधा करमरकर यांचे निधन

बालरंगभूमीच्या आधारवड अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुधा करमरकर यांचे काल मुंबईत निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. करमरकर यांनी ‘मुंबई मराठी साहित्य संघा’च्या सहकार्याने १९५९ मध्ये ‘लिटिल थिएटर’ची स्थापना केली होती. लिटिल थिएटरतर्फे ‘मधुमंजिरी’ हे पहिले बालनाट्य सादर केले होते. ते खूप गाजले. त्याचे लेखन रत्नाकर मतकरी यांनी आणि दिग्दर्शन सुधाताईंनी केले होते. सुधाताईंचा जन्म १९३४ साली मुंबईत झाला. ... Read More »

पुतळ्याविषयी योग्यवेळी मतप्रदर्शन करणार : सुदिन

पर्वरी येथे विधानसभा संकुलात डॉ. जॅक सिक्केरा यांचा पुतळा उभारण्याबाबत योग्य वेळी मतप्रदर्शन करणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. राज्यात सध्या डॉ. सिक्केरा यांचा पुतळा उभारण्याचा विषय गाजत आहे. भाजपने पर्वरी येथे आणखी पुतळा उभारण्यास विरोध केलेला असताना भाजपचे आमदार तथा उपसभापती मायकल लोबो यांनी विधानसभा संकुलात पुतळा उभारण्याबाबत ... Read More »

उपसभापती आणि राष्ट्रवादीचे पुतळ्यासाठी खासगी प्रस्ताव

पर्वरी येथे विधानसभा संकुलात डॉ. जॅक सिक्केरा यांचा पुतळा उभारण्यासाठी भाजपचे आमदार तथा उपसभापती मायकल लोबो आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी दोन खासगी प्रस्ताव सभापती डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे काल सादर केले. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला १९ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. या अधिवेशनात पर्वरी येथे डॉ. सिक्केरा यांचा पुतळा उभारण्याबाबत खासगी प्रस्ताव दाखल करण्याची घोषणा उपसभापती लोबो यांनी केली ... Read More »

पुतळाप्रश्‍नी खासगी ठरावाला सर्वांचा पाठिंबा मिळेल : लोबो

गोवा विधानसभा प्रकल्प परिसरात जॅक सिक्वेरा यांचा पुतळा उभारण्यात यावा यासाठी आपण जो खासगी ठराव आणला आहे त्याला चाळीसही आमदार पाठिंबा देतील, असा विश्‍वास असल्याचे मायकल लोबो यांनी काल अनौपचारिकपणे पत्रकारांशी बोलताना सांगितले. सत्ताधारी पक्षातील सर्व आमदार व मंत्री यांनी या ठरावाला पाठिंबा द्यायला हवा, अशी आपली मागणी असल्याचे ते पुढे म्हणाले. तुमच्या पक्षाचा जॅक सिक्वेरा यांचा पुतळा उभारण्यास विरोध ... Read More »

गौरवप्राप्त कलाकारांनी तरुण कलाकारांना घडवावे

>> कला – संस्कृती मंत्र्यांचे आवाहन >> ३० कलाकारांना पुरस्कार प्रदान आजच्या कला गौरवप्राप्त कलाकारांनी कलेच्या जतनासाठी, प्रसारासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी यापुढेही तरुण कलाकारांना घडवून गोवा कलेने समृद्ध आहे हे दाखवून द्यावे असे आवाहन कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी येथे केले. कला अकादमीच्या मा. दीनानाथ कला मंदिरात काल मंत्री गावडे यांच्या हस्ते विविध कला क्षेत्रात योगदान दिलेल्या ... Read More »

भारताचा ८८ धावांनी विजय

>> सलामीवीर स्मृती मंधानाच्या ८४ धावा >> दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव डायमंड ओव्हल मैदानावर काल सोमवारी खेळविण्यात आलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेचा ८८ धावांनी पराभव केला. आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत सदर सामने होत आहेत. सलामीवीर स्मृती मंधानाच्या ८४ धावांनंतर शिखा पांडे व झुलन गोस्वामी यांच्या भेदक मार्‍यामुळे भारताला विशाल विजय साकार करता आला. ... Read More »