ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: February 5, 2018

जखमेवर मीठ

जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी अवलंबिलेली फुटिरांच्या अनुनयाची नीती दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करू लागलेली दिसते आहे. त्यांच्या सरकारने राज्यातील दगडफेक करणार्‍या तरुणांविरुद्धचे सर्व खटले मागे घेण्याची घोषणा शनिवारी केली. गेल्याच आठवड्यात शोपियानमध्ये लष्करी जवानांनी आत्मसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबाराच्या घटनेत उलट लष्करी अधिकार्‍यांवरच खुनाचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. आता त्या पाठोपाठ तमाम भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळणारे हे दुसरे पाऊल मेहबुबांनी ... Read More »

भाजप आणि मित्रपक्ष ः किती जवळ, किती दूर?

ल. त्र्यं. जोशी (नागपूर) मत्र पक्षांनी नाराजी व्यक्त केली तेव्हा भाजपाने गंभीर विचार करण्याची आवश्यकता अधिक अधोरेखित झाली. अर्थात या प्रश्नाचा केवळ मित्र पक्षांच्या अंगानेच नव्हे तर भाजपाच्या अंगानेही विचार करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटते… शिवसेनेने २०१९ ची लोकसभा व विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर गेल्या आठवड्यात एका फेसबुक मित्राने भाजपाच्या मित्रपक्षांशी वागण्यावर आक्षेप घेतला. तो म्हणाला की, ... Read More »

म्हादईप्रश्‍नी उद्यापासून निर्णायक सुनावणी

गेल्या अनेक वर्षांपासून गोव्याची जीवनदायिनी म्हादई वाचवण्यासाठी चालू असलेला संघर्ष आता अंतिम टप्प्यात पोचला असून उद्या मंगळवार दि. ६ पासून म्हादई जललवादासमोर अंतिम सुनावणी सुरू होणार आहे. दरम्यान, म्हादईचा गोव्याकडे येणारा प्रवाह रोखत कर्नाटकाने सर्वोच्च न्यायालयाचा आदेश झुगारून कालव्याचे काम केल्याच्या गोव्याने केलेल्या तक्रारीबाबत लवादाच्या भूमिकेकडे तमाम गोमंतकीयांचे लक्ष लागले आहे. गोव्याचे पथक उद्यापासून सुरू होणार्‍या निर्णायक लढाईसाठी पूर्ण तयारीनिशी ... Read More »

बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी बाबू कवळेकरांना समन्स

भ्रष्टाचार विरोधी शाखेने बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी चौकशीसाठी विरोधी पक्षनेते चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांना आज दि. ५ रोजी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी एसीबीच्या कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावला आहे. विरोधी पक्षनेते कवळेकर यांच्या कथित बेहिशोबी मालमत्ता प्रकरणाची गेली कित्येक वर्षे चौकशी सुरू आहे. कवळेकर यांच्याकडे ४.७८ कोटींची बेहिशोबी मालमत्ता असल्याचा आरोप आहे. एसीबीच्या एका पथकाने काही महिन्यांपूर्वी कवळेकर यांच्या केपे येथील ... Read More »

प्रमुख झोपडपट्‌ट्यांचे लवकरच सर्वेक्षण

>> मुख्यमंत्री पर्रीकर यांनी दिले होते आश्‍वासन >> विकासासाठी सरकारचे पाऊल गोवा पुनर्वसन मंडळाने राज्यातील झुवारीनगर (वास्को), चिंबल (सांताक्रुझ), कामराभाट (पणजी) आणि पर्वरी येथील चार प्रमुख झोपडपट्‌ट्यांचे टोपोग्राफिकल सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झुवारीनगर येथे एका सांडपाणी निचरा प्रकल्पाच्या शुभारंभ कार्यक्रमात राज्यातील झोपडपट्‌ट्यांच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले होते. ‘त्या’ पार्श्‍वभूमीवर गोवा पुनर्वसन ... Read More »

पर्वरी पठारावर ४३ कोटी खर्चून भूमिगत वीज वाहिन्या घालणार

वीज खात्याने पर्वरी मतदारसंघातील पर्वरी पठारावरील वीज वाहिन्या भूमिगत घालण्याचा निर्णय घेतला आहे. वीज वाहिन्या भूमिगत घालण्याच्या कामावर अंदाजे ४२ कोटी ६९ लाख ६५ हजार ३७२ रुपये खर्च करण्यात येणार आहेत. राज्यातील विविध भागात खांबावरून वाहिन्या घालण्यात आलेल्या आहेत. सध्याच्या वीज वाहिन्या अनेक भागात जुनाट झालेल्या आहेत. त्यामुळे वीज खात्याने वीज वाहिन्या भूमिगत पद्धतीने घालण्याच्या कामाला हळूहळू सुरुवात केली आहे. ... Read More »

महिला कलाकारांनी सिनेसृष्टीकडे वळावे : वर्षा

>> केपे महामराठी संमेलनात मुलाखत रंगली महिला कलाकारांनी चित्रपटसृष्टीकडे वळावे. मात्र, पाश्‍चात्य वेशभूषा, संस्कारांचे अनुकरण करू नये. स्वत:चा स्वाभिमान राखावा असे स्पष्ट मत प्रख्यात अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी व्यक्त केले. केपे येथील दुसर्‍या महामराठी संमेलनात डॉ. अजय वैद्य यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. ब्रह्मचारी नाटकाद्वारे आपला नाट्य क्षेत्रात प्रवास सुरु झाला. या नाट्यप्रयोगाच्यावेळी चित्रपट निर्माते व कलाकार सचिन पिळगावकर ... Read More »

आयसीसी अंडर १९ संघात पाच भारतीय

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने काल रविवारी ‘आयसीसी अंडर १९ सर्वोत्तम ११’ खेळाडूंचा संघ जाहीर केला. विश्‍वविजेत्या भारतीय संघातील पाच खेळाडूंना यामध्ये स्थान मिळाले आहे. काल शनिवारी भारताच्या अंडर १९ संघाने ऑस्ट्रेलियाचा ८ गड्यांनी पराभव करून चौथ्यांदा विश्‍वचषकाला गवसणी घातली होती. या यशाचे प्रमुख शिल्पकार ठरलेल्यांना आयसीसी संघात पसंती देण्यात आली आहे. आघाडी फळीतील तिन्ही खेळाडू हे भारतीयच असून पृथ्वी शॉ (२६१ ... Read More »

दुसरी वनडे भारताच्या खिशात!

>> युजवेंद्र चहलचे पाच बळी भारताने दक्षिण आफ्रिकेला दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात ९ गडी राखून धूळ चारत सहा सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेले ११९ धावांचे सोपे आव्हान भारतीय संघाने अवघ्या २०.३ षटकांमध्ये पूर्ण करत तब्बल १७७ चेंडू राखून विजयाला गवसणी घातली. भारताकडून खेळताना शिखर धवनने सर्वाधिक नाबाद ५१ धावांची आणि कर्णधार विराट कोहलीने ४६ धावांची नाबाद ... Read More »

पीव्ही सिंधूला उपविजेतेपद

अमेरिकेच्या बेईवान झांगने पी.व्ही. सिंधूचा पराभव करत डॉ. अखिलेश दास गुप्ता इंडिया ओपन या वर्ल्ड टूर सुपर ५०० दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेचे काल जेतेपद पटकावले. तासभर रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात झांगने सिंधूचा २१-१८, ११-२१, २२-२० असा तीन गेममध्ये पराभव केला. गेल्या वर्षी या स्पर्धेचे जेतेपद सिंधूने पटकावले होते. परंतु, यावेळी तिला ते राखता आले नाही. बेईवानने पहिल्यांदा या स्पर्धेचे जेतेपद पटकावले. सिंधूने ... Read More »