ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: February 3, 2018

राजस्थानचा कौल

राजस्थानमध्ये नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या दोन व विधानसभेच्या एक मिळून तिन्ही जागांवर कॉंग्रेसने चारलेली धूळ हा भाजपसाठी मोठा धडा आहे. केवळ राजस्थानपुरताच या निकालाचा विचार करून चालणार नाही, तर येणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने संपूर्ण देशाच्या परिप्रेक्ष्यामध्ये या निकालाकडे पाहिले जाणे आवश्यक आहे. कोठे काही चुकते आहे का याचा शोध घेण्याची आवश्यकता राजस्थानच्या या निकालाने निर्माण केलेली आहे. खरे तर राजस्थानमध्ये २०१३ ... Read More »

संरक्षण दलांची चाललेली उपेक्षा घातक

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) भारताचा वारू आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या आघाड्यांवर स्वैर ऊधळतो आहे. त्यामुळे कदाचित त्याला क्षेत्रीय व जागतिक महत्वही प्राप्त होईल. पण ते टिकवायला सक्षम संरक्षण दले असतील का हा यक्ष प्रश्‍न आहे. सरकार, प्रशासन आणि राजकीय पक्षांनी यावर गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे विद्यमान सरकारने आपले चौथे वित्त अंदाजपत्रक नुकतेच संसदेत सादर केले. या अंदाजपत्रकात तरी आपल्याला समुचित ... Read More »

विधानसभेत जॅक सिक्वेरांच्या पुतळ्यासाठी कॉंग्रेसचा ठराव

>> सर्व आमदार एकत्रित ठराव मांडणार ः कवळेकर गोवा विधानसभा परिसरात जनमत कौलाचे नेते जॅक सिक्वेरा यांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी करणारा खासगी ठराव पुढील विधानसभा अधिवेशनात कॉंग्रेस पक्षातर्फे मांडण्यात येणार असून पक्षाचे सर्व १६ आमदार एकत्रितपणे हा ठराव मांडणार असल्याचे विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी काल कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. जनमत कौलाचे एक ... Read More »

कॉंग्रेसच्या भूमिकेवर सरदेसाईंची सावध टिप्पणी

डॉ. जॅक सिक्केरा यांचा पुतळा उभारण्यासाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासगी ठराव मांडण्याच्या कॉंग्रेस विधीमंडळाच्या निर्णयावर गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गोवा फॉरवर्डने विधानसभा संकुलात डॉ. जॅक सिक्केरा याचा पुतळा बसविण्याची मागणी केली आहे. भाजप आमदारांच्या बैठकीत विधानसभा संकुलात आणखीन पुतळे बसविण्यास विरोध करण्यात आलेला आहे. आता कॉँग्रेस पक्षाने डॉ. सिक्केरा यांच्या ... Read More »

‘त्या’ ६४ पदांच्या भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार ः कॉंग्रेस

उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयातील सध्याच्या कर्मचारी भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार असून दक्षता खात्यातर्फे त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष शांताराम नाईक यांनी काल पत्रकार परिषदेत केली. एकूण ६४ पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. वरील पदांसाठी प्रत्येकी ४० लाख रु. उमेदवारांकडून मागितले जात असल्याचे वृत्त आहे. त्यासाठी उमेदवारांकडे बोलणी चालू असून पोलिसांनी यासंबंधी चौकशी करावी, अशी मागणीही नाईक यांनी ... Read More »

मोदी केअर योजनेसाठी दीर्घ प्रतीक्षा

>> कॅशलेस योजना ः कोट्यवधी कुटुंबांना लाभ गुरुवारी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात ‘मोदी केअर’ योजनेची घोषणा करताना वित्तमंत्री अरुण जेटली यांनी जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना असल्याचा दावा केला असला तरी ही योजना सुरू होण्यास तब्बल आठ महिने वाट पहावी लागणार आहे. ही योजना कॅशलेस स्वरुपाची असून त्यासाठी गांधी जयंतीची मुहूर्त निवडण्यात आल्याने तोपर्यंत त्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. एका ... Read More »

विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पनांवर भर द्यावा ः नोबेल विजेत

विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पना, विचारांचे प्रगटीकरणावर भर द्यावा, दुसर्‍याचे अनुकरण करू नये, असा सल्ला नोबेल विजेत्यांनी विद्यार्थ्यांना काल दिला. नोबेल मीडिया एबी स्वीडन, केंद्र सरकारचे विज्ञान व तंत्रज्ञान खाते आणि गोवा सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान खात्याने कला अकादमीच्या आवारात आयोजित नोबेल पारितोषिक भारत २०१८ च्या निमित्ताने नोबेल विजेत्यांनी राज्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पहिल्या सत्रात नोबेल मीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मतायश फायरकेनियस ... Read More »

मतदार ओळखपत्रांत जीईएलकडून होणार्‍या चुकांमुळे नागरिकांत संताप

राज्य निवडणूक कार्यालयाकडून दिल्या जाणार्‍या मतदार ओळखपत्रांमधील चुकांमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मतदारांकडून निवडणूक ओळखपत्रातील वाढत्या तक्रारीबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. राज्य निवडणूक कार्यालयाकडून गोवा इलेेक्ट्रॉनिक्स (जीईएल) या कंपनीकडून मतदार ओळखपत्र तयार करून मतदारांना दिली जातात. एक मतदार ओळखपत्र तयार करण्यासाठी कंपनीला चाळीस रूपये दिले जातात, अशी माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी दखल घेणार असल्याचे संयुक्त निवडणूक ... Read More »

भारत-ऑस्ट्रेलिया जेतेपदासाठी झुंजणार

>> अंडर १९ विश्‍वचषक स्पर्धेचा अंतिम सामना आज भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंडर १९ क्रिकेट विश्‍वचषकाचा अंतिम सामना आज खेळविला जाणार आहे. भारताचा पृथ्वी शॉ व ऑस्ट्रेलियाचा जेसन संघा या कर्णधारांच्या नेतृत्वगुणांचा कस या ‘ग्रँड फिनाले’मध्ये लागणार आहे. भारताने आत्तापर्यंत तीनवेळा वर्ल्डकपला गवसणी घातली असून २०१२ साली उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली अखेरच्या वेळी भारताने विश्‍वचषक आपल्या नावे केला होता. मागील वेळी ... Read More »

गोव्याच्या श्रुंगीला रौप्यपदक

>> खेलो इंडिया अंडर-१७ राष्ट्रीय शालेय स्पर्धा नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या पहिल्या खेलो इंडिया अंडर-१७ राष्ट्रीय शालेय स्पर्धेत काल पहिल्याचा दुसर्‍या दिवशी गोव्याने आणखी एका पदकाची कमाई केली. गोव्याच्या श्रुंगी बांदेकरने मुलींच्या वैयक्तिक मेडले प्रकारात हे रौप्य पदक मिळविले. या पदकाबरोबर गोव्याच्या पदकांची संख्या ४ झाली आहे. गोव्याने ही तिन्ही पदके जलतरणमध्ये प्राप्त केली. का स्पर्धेच्या दुसर्‍या दिवशी श्रुंगी ... Read More »