ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: February 2, 2018

निराशाजनक

आजवरच्या परंपरेप्रमाणे बड्या धनदांडग्यांना कोणताही अपाय न करता केवळ प्रामाणिक करदात्या मध्यमवर्गाच्या खिशात हात घालून गरीबांच्या आणि शेतकर्‍यांच्या कल्याणाची बात करणारा सुमार अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी काल संसदेत सादर केला. ‘आयजीच्या जिवावर बायजी उदार’ असाच हा प्रकार आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना, गोरगरीबांचे हित, शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट वगैरे नेहमीच्या चमकदार घोषणा यंदाही अर्थसंकल्पामध्ये आहेत, परंतु सर्वसामान्य पगारदार आयकरदात्यांनी सरकारी ... Read More »

नोकरदारांच्या तोंडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प

शशांक गुळगुळ शेतकरी आत्महत्या करीत आहेत, औद्योगिक मरगळ आहे, तरुण नोकर्‍या मागत आहेत या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व खासदार यांचे मानधन वाढविण्याचा प्रस्ताव या अर्थसंकल्पात आहे व दर पाच वर्षांनी वाढ करायचीच असाही प्रस्ताव या अर्थसंकल्पात आहे. भारत माता की जय! केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काल लोकसभेत २०१८-२०१९ या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प नोकरदारांच्या तोंडाला ... Read More »

शेतकर्‍यांना दिलासा, मध्यमवर्गाची उपेक्षा

>> आयकर दात्यांस ४० हजारांची प्रमाण वजावट >> गरीब कुटुंबांना ५ लाख रुपयांचे वैद्यकीय संरक्षण >> खरीप पिकांना उत्पन्नाच्या दीडपट हमीभाव >> आयात मालावर १० टक्के समाजकल्याण अधिभार >> महिलांचे ईपीएफ योगदान ३ वर्षे ८ टक्के करण्याचा प्रस्ताव >> आयकर व सेवांवरील अधिभार ३ ऐवजी ४ टक्के >> ज्येष्ठ नागरिकांना अनेक सवलती >> दीर्घ भांडवली नफ्यावर १० टक्के कर >> ... Read More »

गोवा वैज्ञानिक हब म्हणून विकसित करणार

>> भारत-नोबेल- २०१८च्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांची माहिती गोवा हे देशातील वैज्ञानिक हब म्हणून विकसित करण्याचा सरकारचा विचार आहे. राज्यात विज्ञान शिक्षण अधिक सक्षम करण्याबरोबर वैज्ञानिक वैचारिकता वाढविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. वैज्ञानिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी दोन नवीन एज्युकेशन हब स्थापन केले जाणार आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी येथे काल केली. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याच्या बायो टेक्नोलॉजी विभाग, ... Read More »

पहिल्या टप्प्यात दोन महिने नारळविक्री

>> मुख्यमंत्री : पणजी, मडगावातील फलोत्पादन केंद्रांवर नारळ विक्री सुरू राज्यातील सत्तरी, सांगे, केपे, काणकोण या तालुक्यातील माकडांनी उच्छाद घालून नारळ पीकाची नासधूस केल्याने नारळ उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आल्तिनो पणजी येथे काल दिली. गोवा राज्य फलोत्पादन महामंडळाच्या सवलतीच्या दरातील नारळ विक्रीचा आल्तिनो-पणजीतील केंद्रावर शुभारंभ केल्यानंतर मुख्यमंत्री पर्रीकर बोलत होते. यावेळी गृहनिर्माण मंत्री ... Read More »

राजस्थानमधील दोन्ही लोकसभा पोट निवडणुकीत कॉंग्रेस विजयी

>> विधानसभेची एक जागाही कॉंग्रेसलाच राजस्थानमध्ये लोकसभेसाठी दोन जागांच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपला धूळ चारीत दोन्ही जागा जिंकल्या आहेत. यामुळे या राज्यात लवकरच होणार्‍या विधानसभा निवडणुकाही भाजपसाठी संघर्षपूर्ण ठरण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केली आहे. काल जाहीर झालेल्या निकालानुसार अलवर लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे डॉ. करणसिंह यादव यांनी भाजपचे डॉ. जसवंत सिंह यादव यांचा पराभव केला. डॉ. करणसिंह यांना ५ लाख ... Read More »

संजय दत्तच्या लवकर तुरुंगमुक्तीचा निर्णय योग्यच

>> मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा मुंबईतील १९९३च्या बॉम्बस्फोटानंतर बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा झालेल्या अभिनेता संजय दत्त याला तुरुंगातून लवकर मुक्त करण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय योग्य होता असा निर्वाळा काल मुंबई उच्च न्यायालयाने दिला. वरील प्रकरणी तुरुंगवास भोगणार्‍या संजय दत्तची तुरुंगातून आठ महिने लवकर मुक्तता करण्यात आली होती. या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर काल न्या.. ... Read More »

विराटचे शतक; भारताचा विजयी शुभारंभ

>> रहाणे, कुलदीप चमकले; दक्षिण आफ्रिकेवर ६ गड्यांनी मात कर्णधार विराट कोहलीचे दमदार शतक आणि त्याने अजिंक्य रहाणेसमवेत (७९) केलेल्या १८९ धावांच्या भागीदारीच्या जोरावर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर ६ गड्यांनी मात करीत ५ लढतींच्या वन-डे मालिकेत विजयी शुभारंभ करीत १-० अशी आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेकडून मिळालेले २७० धावांचे विजयी लक्ष्य भारतीय संघाने ४५.३ षट्‌कात ४ गड्यांच्या मोबदल्यात गाठले. रोहित ... Read More »

गोव्याने तामिळनाडूला १-१ बरोबरीत रोखले

>> वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल राखीव खेळाडू कॅरन कॉस्ताने दुसर्‍या सत्राच्या अंतिम क्षणात नोंदविलेल्या गोलाच्या जोरावर गोव्याने तामिळनाडूला १ -१ असे बरोबरीत रोखत उदिशा येथे कालपासून सुरू झालेल्या २३व्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत गुण विभागून घेतला. गोव्याच्या प्रशिक्षकांनी कालच्या या आपल्या शुभारंभी सामन्यात करिष्मा शिरवलकर या एकमेव स्ट्रायकर खेळाडूसह सुरुवात केली. गोव्याने या सामन्यात आक्रमक सुरुवात करताना दुसर्‍याच मिनिटाल ... Read More »

गोव्याच्या झेवियरला जलतरणमध्ये सुवर्ण व रौप्य

>> खेलो इंडिया अंडर-१७ राष्ट्रीय शालेय स्पर्धा नवी दिल्ली येथे कालपासून सुरू झालेल्या पहिल्या खेलो इंडिया अंडर-१७ राष्ट्रीय शालेय स्पर्धेत काल पहिल्याचा दिवशी गोव्याने १ सुवर्ण व २ रौप्य मिळवून ३ पदकांची कमाई केली. गोव्याने ही तिन्ही पदके जलतरणमध्ये प्राप्त केली. गोव्याच्या झेवियर मायकल डिसोझाने १ सुवर्ण व १ रौप्य पदक मिळविले. त्याने मुलांच्या १०० मीटर्स बटरफ्लाय प्रकारात ०ः५७ः८५ अशी ... Read More »