ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: February 1, 2018

पाठीशी उभे राहा

काश्मीरमधील शोपियानमध्ये गेल्या शनिवारी लष्कराच्या ताफ्यावर स्थानिकांनी प्राणघातक हल्ला चढवला. स्वप्रतिकारार्थ लष्कराला गोळीबार करावा लागला, त्यात दोघे नागरिक ठार झाले. आता या गोळीबाराबद्दल लष्करी अधिकार्‍यांवर खुनाचा गुन्हा नोंदवण्याचे आदेश जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी दिले आहेत. काश्मीरमध्ये देशद्रोह्यांच्या तुष्टीकरणाचे अत्यंत घाणेरडे राजकारण कसे केले जाते याचे हे ताजे उदाहरण आहे. मेहबुबा मुफ्तींच्या पीडीपीची नीती अगदी सुरवातीपासून अशीच दुटप्पी राहिलेली ... Read More »

पाकिस्तानचे अघोषित युद्ध

शैलेंद्र देवळाणकर सीमेवर सुरू असलेले शस्रसंधीचे उल्लंघन आणि त्यात निष्पाप नागरिकांचा जाणारा बळी ही सर्व पाकिस्तानची सुनियोजित रणनीती आहे. या माध्यमातून काश्मीरच्या प्रश्‍नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याचा पाकचा प्रयत्न आहे. बिथरलेल्या पाकिस्तानकडून सीमापार गोळीबार करून अघोषित युद्ध पुकारण्यात आले आहे. तथापि, भारताने याचा अत्यंत संयमाने मुकाबला करणे गरजेचे आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यानचा तणाव सध्या कमालीचा वाढला आहे. हा तणाव वाढण्याचे मुख्य ... Read More »

सरकारी नारळ विक्री आजपासून टप्प्याटप्प्याने

>> आल्तिनो-पणजी व फातोर्ड्यात शुभारंभ सरकारच्या सवलतीच्या दरातील नारळ विक्रीला आज गुरूवार १ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. पहिल्या टप्प्यात आल्तिनो-पणजी आणि फातोर्डा येथील गोवा फलोत्पादन महामंडळाच्या भाजी विक्री केंद्रावर नारळ विक्रीला सुरूवात केली जाणार आहे. साधारण पंधरा दिवसात महामंडळाच्या सर्व भाजी विक्री केंद्रावरून नारळ विक्रीला सुरूवात केली जाणार आहे, अशी माहिती शेतकी खात्याचे संचालक नेल्सन फिग्रादो यांनी काल दिली. कृषी ... Read More »

भारतभरातील तमाम खगोलप्रेमींना खग्रास चंद्रग्रहणामुळे ब्लड मून, सुपरमून व ब्ल्यूमून अशा दुर्मिळ नजराण्याचे अवकाश दर्शन घडले. अधिक भव्य व अधिक तेजस्वी असे हे चंद्रदर्शन होते त्याची झलक. Read More »

मोदी सरकारचा आज अर्थसंकल्प

केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा अखेरचा संपूर्ण अर्थसंकल्प वित्तमंत्री अरूण जेटली आज सादर करणार आहेत. देशवासियांना उत्कंठा लागून राहिलेल्या या अर्थसंकल्पात पुढील वर्षाच्या निवडणुकांवर लक्ष ठेवून प्राप्ती करात दिलासा मिळणार्‍या निर्णयाची शक्यता व्यक्त होत आहे. अर्थव्यवस्था अधिक सुदृढ करण्याच्या दृष्टीकोनातून काही निर्णय घेतले जाण्याचीही शक्यता आहे. त्यानुसार काही अत्यावश्यक इलेक्ट्रॉनिक वस्तू महाग होण्याचा अंदाज आहे. अर्थसंकल्पात जकात कर ... Read More »

एअर इंडिया विमानातून १९ लाखांचे सोने जप्त

दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कस्टम अधिकार्‍यांनी काल केलेल्या कारवाईत एअर इंडिया विमानातून (एआय-९९४) १९ लाख ९२ हजार रुपयांच्या ७२० ग्राम वजनाच्या सोन्याची चार बिस्किटे जप्त केली. कस्टम अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार काल सकाळी दुबईहून आलेल्या एअर इंडिया (एआय-९९४) विमानात जाऊन पाहणी केली असता त्यांना एका रिकामी असलेल्या आसनावर दोन लहान काळ्या रंगाची पाकिटे नजरेस पडली. ती पाकिटे हस्तगत करून त्याची पडताळणी केली ... Read More »

अर्धवेळ शिक्षकांचे पर्वरीत धरणे

सेवेत कायम केले जावे या मागणीसाठी डबल पार्टटाईम शिक्षकांनी पर्वरी येथे सचिवालयाजवळ काल सकाळपासून अर्धा दिवस धरणे धरले. आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी आलो होतो. मात्र, त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे आम्ही सचिवालयाच्या मुख्य फाटकाजवळ धरणे धरले, असे या शिक्षकांनी सांगितले. या शिक्षकांची एकूण संख्या १०४ एवढी असल्याचे सांगण्यात आले. गेल्या सुमारे २३ वर्षांपासून आम्ही उच्च माध्यमिक विद्यालयांत व्यावसायिक अभ्यासक्रमासाठीचे ... Read More »

१० दशलक्ष टन खनिजाचे वर्षअखेरीस उत्खनन शक्य

चालू आर्थिक वर्षाच्या शेवटापर्यंत राज्यात जास्तीत जास्त १० दशलक्ष टन एवढे खनिज उत्खनन होऊ शकणार असल्याचे खाण खात्यातील सूत्रांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. आतापर्यंत राज्यात ६.७ दशलक्ष टन एवढे खनिज उत्खनन झालेले आहे व मार्च महिन्यापर्यंत जास्तीत जास्त १० दशलक्ष टन खनिजाचे उत्खनन होऊ शकेल, असे दिसत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. राज्यात सध्या अवघ्याच खाणी चालू आहेत. कित्येक खाणींना ... Read More »

सरकारी शिमगोत्सव ३ मार्चपासून

राज्यातील सरकारी पातळीवरील शिमगोत्सव ३ ते १७ मार्च २०१८ दरम्यान साजरा केला जाणार आहे. शिमगोत्सव मिरवणुकीत स्पर्धात सहभागी होणार्‍या पथकांनी प्रवेश अर्ज ८ दिवस पूर्वी आयोजक समितीकडे सादर करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. शिमगोत्सव मिरवणुकीचा कार्यक्रम रात्री १० वाजेपर्यत पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे. राज्यातील सरकारी पातळीवरील शिमगोत्सवाच्या आयोजनावर चर्चा करण्यासाठी पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठक ... Read More »

नोबेल पारितोषिक मालिकेस आज प्रारंभ

नोबेल पारितोषिक मालिका भारत २०१८ च्या दुसर्‍या आवृत्तीला गुरूवार १ फेब्रुवारीला कला अकादमी पणजी येथे प्रारंभ होत आहे. या नोबेल पुररस्कार मालिकेला पाच नोबेल पुरस्कार विजेते उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त १ ते २८ फेब्रुवारीपर्यत नोबेल पुरस्कार प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते संध्याकाळी ३.१५ वाजता नोबेल पुरस्कार मालिका कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे. यावेळी जे. मायकल बिशप (१९८९ ... Read More »