ब्रेकिंग न्यूज़

Monthly Archives: February 2018

थोडी वाट पाहूया

अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूच्या कारणांबाबत नाना वार्ता आणि वदंता सतत कानी पडत आहेत. शवचिकित्सा अहवालात त्यांचा मृत्यू बाथटबमध्ये बुडाल्याने झाल्याचे कारण दर्शवण्यात आले असल्याने शंकाकुशंकांना ऊत आलेला दिसतो. दुबईमध्ये कोणाचाही इस्पितळाबाहेर मृत्यू झालेला असेल तर त्यासंबंधीची एक कायदेशीर प्रक्रिया असते. शवचिकित्सेनंतर तो अहवाल पब्लीक प्रोसिक्युटर्स ऑफिसला पाठवला जातो आणि त्यानुसार त्यासंबंधी अधिक चौकशी करायची की नाही ते हा संबंधित विभाग ... Read More »

पत्नी व मुलांच्या संपत्तीचे स्त्रोतही आता उघड

ऍड. असीम सरोदे निवडणुकांदरम्यान शपथपत्र सादर करताना उमेदवारांच्या, विशेषतः प्रस्थापित उमेदवारांच्या संपत्तीत झालेली डोळे दिपवणारी वाढ ही सामान्यांना अस्वस्थ करणारी होतीच; पण त्यातून राजकारण हे भ्रष्टाचाराचे कसे आगर बनले आहे हेही दर्शवणारी होती. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ताज्या निकालामुळे येणार्‍या काळात उमेदवारांना स्वतःच्याच नव्हे तर पत्नी आणि मुलांच्या संपत्तीचे स्रोतही जाहीर करावे लागणार आहेत. हा निर्णय क्रांतिकारी आणि ऐतिहासिक आहे… निवडणुकीला ... Read More »

श्रीदेवी मृत्यूप्रकरणाची फाईल दुबई सरकारकडून बंद

>> खाजगी विमानाने रात्री उशिरा पार्थिव मुंबईत दाखल; आज दुपारी होणार अंत्यसंस्कार सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवी यांच्या गेल्या शनिवारी झालेल्या संशयास्पद मृत्यूनंतर या प्रकरणाचे कसून तपासकाम करून दुबई सरकारच्या वकिलांनी या प्रकरणाची फाईल बंद करण्याचा निर्णय घेतला. या संपूर्ण प्रकरणाच्या तपासकाम पूर्ततेनंतर श्रीदेवी यांचे पार्थिवही काल संध्याकाळी त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान रात्री ९.३० वा. श्रीदेवी यांचे पार्थिव खासगी विमानाने ... Read More »

धावत्या रो-रो रेल्वेतील ट्रकला मयेजवळ आग

बर्नींग ट्रेनचा थरार काल मयेवासीयांना पाहायला मिळाला. अवजड वाहनांची वाहतुक करणार्‍या रेल्वेतील एका ट्रकला अचानक आग लागली. हळदणवाडी जंक्शन ते तिखाजन जंक्शनपर्यंत हा थरार मयेवासियांनी अनुभवला. ट्रक ड्रायव्हरने प्रसंगावधान राखून ट्रॅकवर चालत जाऊन रेल्वे चालकाला याची माहिती दिली व तिखाजन रेल्वे गेट क्रॉसवरून आगीचे तांडव थांबविले. डिचोली अग्नीशमन दल, ओल्ड गोवा अग्नीशमन दलांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. तोपर्यंत वाहनाचे ... Read More »

‘कामधेनू’च्या उल्लंघनप्रकरणी शेतकर्‍यांना वसुलीसाठी नोटीसा

पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय खात्याच्या कामधेनू योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणार्‍या शेतकर्‍यांकडून खात्याने अनुदान वसुलीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत सोळा शेतकर्‍यांना अनुदान वसुलीसाठी नोटीस पाठविण्यात आली असून आणखी शंभरच्या आसपास शेतकर्‍यांना नोटीस पाठविली जाणार आहे, अशी माहिती खात्याच्या सूत्रांनी दिली. सरकारकडून राज्यातील दुधाच्या उत्पादनात वाढ करण्याच्या उद्देशाने कामधेनू योजना राबविण्यात येत आहे. या योजनेखाली शेतकर्‍यांना भरघोस अनुदान दिले जात आहे. ... Read More »

५९ उद्योजकांचे प्रलंबित ३६ लाखांचे कर्ज माफ

>> मंत्रिमंडळ मान्यतेनंतर आदेश जारी सरकार दरबारी गेली कित्येक वर्षे प्रलंबित असलेले ५९ उद्योजकांचे सुमारे ३६ लाख ३७ हजार ९४१ रुपयांचे कर्ज अखेर माफ करण्यात आले आहे. यासंबंधीचा आदेश उद्योग खात्याचे अवर सचिव ए. एस. महात्मे यांनी जारी केला आहे. गोवा मुक्तीनंतर राज्यातील उद्योग धंद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खास कर्ज योजना राबविण्यात आली होती. या योजनेखाली १८९० जणांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी ... Read More »

हज यात्रेकरुंच्या विमान तिकिट दरात कपात

हज यात्रेला मक्केत जाणार्‍या मुस्लिम यात्रेकरुंसाठी विमान तिकिट दरात केंद्र सरकारने भरीव कपात केली असल्याची माहिती केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी दिली आहे. मोदी सरकारचे हे एक महत्वाचे पाऊल असल्याचे ते म्हणाले. देशभरातील २१ विमानतळांवरून हजला भाविक जातात. एअर इंडिया, सौदी एअरलाईन्स व फ्लायनास यासह अन्य कंपन्यांच्या तिकिट दरात ही कपात करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. सरकारने हाज ... Read More »

मुख्यमंत्री पर्रीकरांकडून उपचारांना प्रतिसाद

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमध्ये तिसर्‍या दिवशी उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री पर्रीकर उपचारांना प्रतिसाद देत असून प्रकृतीत सुधारणा होत आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. रविवारी रात्री मुख्यमंत्री पर्रीकर यांना डिहायड्रेशनचा त्रास जाणवू लागल्याने गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले होते. मुख्यमंत्री पर्रीकर यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. बुधवारी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री ... Read More »

भारतीय लष्कराने ११७ दिवसांत उभारला एल्फिन्स्टन रोड पूल

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात एल्फिन्स्टन रेल स्थानकातील अरुंद पदपुलावरील भीषण दुर्घटनेनंतर भारतीय लष्कराने ११७ दिवसात परळ ते एल्फिन्स्टन रोड पूल, करी रोड व आंबिवली स्थानकावरील पुलाचे काम पूर्ण करण्यात यश मिळवले. या प्रकल्पाचे उद्घाटन काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री पियुष गोयल आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. गेल्या वर्षी वरील अरुंद पुलावरील चेंगराचेंगरीत २२ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या ठिकाणी ... Read More »

राज्याच्या औद्योगिक स्थितीवर श्‍वेतपत्रिका काढण्याची मागणी

सरकारने राज्यातील औद्योगिक स्थितीबाबत श्‍वेतपत्रिका जारी करावी, अशी मागणी गोवा कामगार महासंघाचे अध्यक्ष ऍड. अजितसिंह राणे यांनी पत्रकार परिषदेत काल केली. राज्यातील उद्योग क्षेत्रातील बर्‍याच कामगारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कुंडई औद्योगिक वसाहतीमध्ये कंपनीच्या बाहेर एका कर्मचार्‍याने आत्मदहन करून घेतले आहे. असा प्रकार पुन्हा कुठेही घडू नये म्हणून वेळीच योग्य पाऊल उचलावे, अशी मागणी ऍड. राणे यांनी केली. ... Read More »