ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: January 27, 2018

वेध अर्थसंकल्पाचे

प्रजासत्ताक दिनानंतर आता देशाला वेध लागले आहेत ते येत्या एक फेब्रुवारीस सादर होणार असलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाचे. पुढील वर्षी लोकसभा निवडणूक होणार आहे. म्हणजे त्या वर्षीचा अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्पच असेल. त्यामुळे यंदाचा मोदी सरकारचा या कार्यकाळातील शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असेल. गतवर्षीपासून रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे न मांडता मुख्य अर्थसंकल्पाचा भाग म्हणून मांडण्यास सुरुवात झालीच आहे. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून यंदाच्या अर्थसंकल्पाची ... Read More »

चीनची वॉर ऑन टू ङ्ग्रंट पॉलिसी

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) शक्सगाम खोर्‍यावर कब्जा केल्यानंतर पीओकेमधील गुंतवणुकीच्या रक्षणासाठी चीनने तेथे आपले सैनिक तैनात केले आहेत हे उघडगुपीत आहे. या भागात पिपल्स लिबरेशन आर्मीचे बळ वृद्धिंगत करण्यामागे सामग्री व्यापकता वृध्दिंगत करून आगामी युध्द नवीन, सुधारित तंत्रज्ञानाच्या बळावर लढण्याचा आणि वेळ पडल्यास भारताला सामरिक व राजकीय धडा शिकवण्याचा चीनी हेतू आहे. सियाचिनच्या उत्तरेला पाकिस्तान आक्युपाईड काश्मिरचा (पीओके) पूर्वपार हिस्सा ... Read More »

प्रजासत्ताकदिनी दिल्लीत राजपथावरील संचलनात मोटारसायकलवरून चित्तथरारक कसरती सादर करताना सीमा सुरक्षा दलातील ‘सीमा भवानी’ पथकातील महिला जवान. Read More »

१ फेब्रुवारीपासून सवलतीच्या दरात नारळ

>> कृषिमंत्र्यांची घोषणा >> प्रत्येक कुटुंबाला मिळणार महिना ३० नारळ सध्या नारळाचे दर गगनाला भिडले असल्याने सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी १ फेब्रुवारीपासून सवलतीच्या दरात नारळ उपलब्ध करण्यात येणार असल्याची घोषणा कृषिमंत्री विजय सरदेसाई यांनी मडगाव येथे प्रजासत्ताकदिन सोहळ्यात बोलताना केली. राज्यात नारळाचे दर गगनाला भिडले असल्याने सर्वसामान्य जनतेला नारळ मिळणे कठीण बनले आहे. दैनंदिन जेवणात नारळ ही गोमंतकीयांची महत्त्वाची वस्तू ... Read More »

अर्थसंकल्पात सर्वसामान्यांवर कराचा बोजा नसेल : मुख्यमंत्री

राज्याच्या २०१८ -१९ च्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांवर कराचा जादा बोजा लादला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. शिक्षण क्षेत्रातील सुधारणावर भर देण्याचे संकेत मुख्यमंत्री पर्रीकर यांनी यावेळी दिले. अर्थसंकल्पात सर्वसामान्य जनतेच्या हिताला प्राधान्यक्रम दिला जाणार आहे. सध्याच्या योजना कायम राहणार आहेत. सरकारी विविध खात्यांच्या अर्जांची छपाई बंद करून अर्ज ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करण्यावर विचार केला ... Read More »

मंगलोर भीषण अपघातात पर्वरी येथील वकील ठार

>> तिघे सहकारी गंभीर जखमी शुक्रवारी सकाळी मेंगलोर येथे झालेल्या एका बस व चारचाकी गाडीच्या भीषण अपघातात पर्वरी येथील राज नदाफ हा तरूण वकील जागीच ठार झाला. तर त्याचे मित्र परेश सावंत, रक्षित नाईक व वामन गांवकर हे गंभीररित्या जखमी झालेले असून त्यांच्यावर मेंगलोर येथील ए. जे. इस्पितळात उपचार चालू आहेत. वरील चौघे मित्र शुक्रवारी सुटी व नंतर शनिवार, रविवारी ... Read More »

बायोगॅसवर चालणार्‍या ५० बसेस कदंब घेणार

बायोगॅसवर चालणार्‍या ५० बसेस् कदंब महामंडळ खरेदी करणार असून त्यासाठी महामंडळाच्या पर्वरी येथील डेपोत बायोगॅससाठीची टाकी उभारण्यात येणार असल्याची माहिती कदंब महामंडळाचे चेअरमन कार्लुस आल्मेदा यांनी काल दिली. या बायोगॅसवरील बसेस् खरेदी करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून निधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. वरील निधी मिळाल्यानंतर ह्या बसेससाठी निविदा काढण्यात येणार आहेत. महामंडळाकडे बायोगॅसवर चालणारी एक बस सध्या आहे. स्कार्निया ह्या ... Read More »

भारत सेमीफायनलमध्ये

बांगलादेशचा १३१ धावांनी पराभव करत भारताने अंडर १९ विश्‍वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. २६५ धावा फलकावर लगावल्यानंतर भारताने बांगलादेशचा डाव १३४ धावांत गुंडाळून विश्‍वचषकातील आपली स्वप्नवत वाटचाल कायम ठेवली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर भारताचा सलामीवीर मनोज कालरा ९ धावांवर बाद झाला. यानंतर कर्णधार पृथ्वी शॉने शुभमन गिलच्या साथीने डाव पुढे नेला. पृथ्वी शॉ ४० धावांवर बाद ... Read More »

सायनाचा सिंधूला धक्का

भारताची माजी क्रमांक एकची खेळाडू सायना नेहवालने वर्चस्व गाजवताना ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या व द्वितीय मानांकित पी.व्ही. सिंधू हिचा सरळ गेममध्ये २१-१३, २१-१९ असा पराभव केला. या विजयासह सायनाने ३५०,००० युएस डॉलर्स बक्षीस रकमेच्या इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. कोपराच्या दुखापतीनंतर पुनरागमन करत असलेल्या सायनाने आपल्या वर्चस्वाच्या दिवसातील खेळाची काल झलक दाखवताना सिंधूला नामोहरम केले. अंतिम फेरीत स्थान मिळविण्यासाठी सायनाचा ... Read More »

मिश्र दुहेरीत बोपण्णा अंतिम फेरीत

भारताच्या रोहन बोपण्णा याला आपल्या दुसर्‍या ग्रँडस्लॅम जेतेपदाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केवळ एका विजयाची गरज असून काल शुक्रवारी त्याने आपली हंगेरीची जोडीदार टिमिया बाबोस हिच्यासह खेळताना मिश्र दुहेरी गटातून ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. बोपण्णाच्या सर्व्हिसला बाबोस हिच्या परतीच्या तडाखेबंद फटक्यांची साथ लाभल्याने या जोडीचा विजय सुकर झाला. त्यांनी उपांत्य फेरीत ब्राझिलच्या मार्सेलो डेमोलिनेर व स्पेनच्या मारिया ... Read More »