ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: January 26, 2018

अराजक

देश आज प्रजासत्ताक दिन साजरा करतो आहे आणि उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये ‘पद्मावत’ चित्रपटाच्या निमित्ताने जवळजवळ अराजक माजले आहे. रस्तोरस्ती गुंडपुंडांनी जाळपोळ आणि नासधुशीचे, दगडफेकीचे सत्र अवलंबिलेले दिसते आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी दावोसमध्ये विदेशी गुंतवणूकदारांना भारतामध्ये गुंतवणूक करण्यासाठी येण्याचे आमंत्रण देत असताना भाजपचीच राजवट असलेल्या गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरयाणामध्ये हे जे काही चालले आहे ते पाहिल्यास ... Read More »

संविधानातील पंचतत्त्वे आणि विकासासाठी पंचसूत्री

शंभू भाऊ बांदेकर स्वतंत्र भारतातील समाजवादी लोकशाहीने आपल्याला बरेच काही दिले आहे, तरी अजूनही आपल्याला बरेच मिळवायचे आहे. काय, केव्हा, कसे मिळवायचे यावर प्रजासत्ताकाच्या निमित्ताने संबंधितांनी विचार करणे ही आज देशाची व देशवासियांची निकड होऊन बसली आहे. आपला भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला आणि त्यानंतर पहिली कामगिरी सुरू झाली ती भारतीय संविधानाच्या रचनेची. स्वातंत्र्यानंतर तब्बल अडीच वर्षांच्या ... Read More »

बंदमुळे कर्नाटकात जनजीवन विस्कळीत

>> म्हादई पाणीतंटा >> गोव्यातील वाहनांवर दगडफेक >> कदंबला आर्थिक फटका म्हादई पाणीतंटा प्रश्‍नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी करीत कर्नाटकातील कन्नड संघटना आणि शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या कर्नाटक बंदला काल चांगला प्रतिसाद लाभला. कर्नाटक परिवहन मंडळाची बससेवा, बहुसंख्य शाळा, बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्याने जनजीवनावर परिणाम झाला. बंदच्या काळात गोव्यातील काही खासगी वाहनांवर दगडफेक करण्यात आल्याचे वृत्त आहे. या ... Read More »

टॅक्सीसेवा सुरू करण्याचा कदंब महामंडळाचा विचार

कदंब महामंडळ टॅक्सीसेवा (कॅबी) सुरू करण्याच्या विचारात असून याविषयी प्रस्तावाचा अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती कदंब महामंडळाचे अध्यक्ष तथा वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. कदंब महामंडळ प्रवासी वाहतूक सेवा पुरविण्याचे काम करीत आहे. टॅक्सीसुद्धा प्रवासी वाहतुकीसाठी वापरली जात आहे. महामंडळाच्या संचालकांच्या बैठकीत टॅक्सीसेवा सुरू करण्यावर विचारविनिमय करण्यात आला आहे, असेही अध्यक्ष ... Read More »

स्पीड गव्हर्नर बसविण्यासाठी टॅक्सींना सहा महिने मुदतवाढ

सरकारने पर्यटक टॅक्सींना स्पीड गव्हर्नर बसविण्यासाठी ३१ जुलै २०१८ किंवा दोन – तीन उत्पादकांचे स्पीड गव्हर्नर वाजवी दरात उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत मुभा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीची नोटीस वाहतूक खात्याचे संचालक निखिल देसाई यांनी काल जारी केली आहे. राज्यातील पर्यटक टॅक्सींना २८ फेब्रुवारी २०१८ पर्यंत स्पीड गव्हर्नर बसविण्याचे बंधन घालण्यात आलेे होते. त्यामुळे वाहतूक खात्याकडून पर्यटक टॅक्सींना फिटनेस सर्टीफीकेट ... Read More »

शाळा प्रवेशावेळी देणग्या घेतल्यास कारवाईचा इशारा

>> शिक्षण खात्याचे परिपत्रक जारी राज्यातील शिक्षण संस्थांच्या व्यवस्थापनांनी शालेय प्रवेशासाठी शिक्षण खात्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे. मुलांना शाळेत प्रवेश देताना गैरमार्गाचा अवलंब करू नये. गैरमार्गाचा वापर करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा शिक्षण खात्याने दिला आहे. राज्यातील काही शिक्षण संस्थांकडून मुलांना शालेय प्रवेश देताना गैरमार्गाचा अवलंब केला जात आहे. प्रवेशासाठी पालकांकडून कॅपिटेशन फी, देणग्या स्वीकारणे, पालकांच्या मुलाखती, स्क्रिनिंग ... Read More »

काणकोणात ५ हजार लोकांचे ऐतिहासिक एकत्रित समूहगान

देळे, काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या ‘राष्ट्र एकताकी आवाज’ या कार्यक्रमाला काणकोणवासीयांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. चावडीवरील श्री मल्लिकार्जुन देवास्थानच्या मैदानावर आयोजित या ऐतिहासिक अशा कार्यक्रमात काणकोण तालुक्यातील शाळा, उच्च माध्यमिक विद्यालये, महाविद्यालये, अंगणवाडी सेविका, महिला मंडळ, स्वयंसहाय्य गट, विविध सांस्कृतिक संस्था आणि क्रीडा संस्थांचे प्रतिनिधी मिळून ५ हजारपेक्षा अधिक जणांनी ‘एक सूर ... Read More »

बुमराहचे ‘पंकच’; भारताचे दमदार पुनरागमन

>> दुसर्‍या डावात १ बाद ४९ >> आफ्रिकेला १९४वर रोखले दु्रतगती गोलंदाज जसप्रीत बुमराहने कारकिर्दीत प्रथम मिळविलेले पाच बळी आणि त्याला भुवनेश्वर कुमारने दिलेल्या उपयुक्त साथीच्या जोरावर भारताने तिसर्‍या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १९४ धावांवर संपुष्टात आणत दमदार पुनरागमन केले. प्रत्युत्तरात खेळताना भारताने आपल्या दुसर्‍या डावात काल दुसर्‍या दिवसाचा खेळ संपेपर्यंत १ गड्याच्या मोबदल्यात ४९ अशी धावसंख्या उभारत ४२ ... Read More »

अपराजित भारताची लढत आज बांगलादेशशी

>> अंडर-१९ विश्वचषक गट फेरीतील तीनही सामने सहज जिंकत अपराजीत वाटचाल करीत असलेल्या पृथ्वी शॉच्या नेतृत्वखालील भारतीय युवा संघाची आज अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशशी लढत होणार आहे. भारताने गट फेरीतील आपल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर १०० धावांनी मात केली होती. त्यांनंतर दुसर्‍या सामन्यात पापुआ न्यू गिनीचा धुव्वा उडविला होता तर तिसर्‍या व शेटवच्या लढतीत झिम्बाब्वेच्या संघाला सहज नमवित उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात ... Read More »

सायना-सिंधू उपांत्यपूर्व फेरीत समोरासमोर

भारताच्या पीव्ही सिंधी आणि सायना नेहवाल यांनी जकार्तात सुरू असलेल्या इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या आपल्या शुभारंभी लढती जिंकत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आता उपांत्यपूर्व फेरीत त्या दोघी समोरासमोर ठाकणार आहेत. दुखापतीतून सावल्यानंनतर पुनरागमन केलेल्या सायनाने काल चीनच्या जागतिक २०व्या स्थानावरील चेन शियाओशिनवर २७ मिनिटे चाललेल्या लढतीत २१-१२, २१-१८ अशी मात केली. तर सिंधूने एकतर्फी झालेल्या लढतीत मलेशियाच्या गोह जिन ... Read More »