ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: January 24, 2018

पुरे झाले पुतळे!

गोवा विधानसभा संकुलामध्ये सध्याच्या भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुतळ्या व्यतिरिक्त अन्य कोणताही पुतळा बसवू नये असा ठराव भारतीय जनता पक्षाने केल्याने सरकारमधील एक घटक असलेल्या गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी पुढे केलेल्या त्या मागणीतील हवा निघून गेली आहे. विद्यमान सरकारचे प्रमुख अंग असलेल्या भाजप आणि मगो ह्यांनी आपापली भूमिका स्पष्ट केल्याने पुतळ्याचा हा विषय आता येथेच संपायला हरकत नाही. विधानसभा ... Read More »

भारतीय प्रजासत्ताकापुढील आव्हाने

ऍड. असीम सरोदे इंग्रजांची जुलमी राजवट उलथवून टाकत भारताने स्वातंत्र्य मिळवले आणि संविधानाची अंमलबजावणी सुरू करून २६ जानेवारी १९५० रोजी गणराज्य किंवा प्रजासत्ताक देश म्हणून ओळख मिळवली. तथापि, आज देशातील परिस्थिती पाहता प्रजेची सत्ता आहे का, प्रजेला त्यांच्या अधिकारांविषयी-हक्कांविषयी माहिती करून दिली गेली आहे का असा प्रश्‍न निर्माण होतो. याचे कारण आपल्याकडे लोकांच्या सहभागातून लोकशाही ही संकल्पना मागे पडत गेली ... Read More »

शिवसेना आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार

>> राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत उद्धव ठाकरेंची घोषणा >> नेतेपदी आदित्य ठाकरेंची निवड आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा काल शिवसेनेने केली. मुंबईत शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत स्वबळावर लढण्याचा ठराव टाळ्यांच्या गजरात संमत करण्यात आला. यावेळी उद्धव यांचे तरुण पुत्र व युवा सेनेचे नेते आदित्य यांनाही राजकीय बढती देत पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नेतेपदी स्थान देण्यात आल्याची घोषणा करण्यात ... Read More »

डीएसएस, गृहआधार, लाडली लक्ष्मी योजनांचे सरकारकडून सर्वेक्षण सुरू

गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने (जीईएल) सरकारच्या दयानंद सामाजिक सुरक्षा, गृह आधार, लाडली लक्ष्मी या योजनांच्या परिणाम विवरण सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. सर्वेक्षक लाभार्थींच्या घरी भेट देऊन सर्वेक्षण करणार आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गृहआधार, दयानंद सामाजिक सुरक्षा योजनांचे सर्वेक्षण करण्याची घोषणा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केली होती. तसेच उत्पन्न मर्यादा ओलांडलेल्या महिलांना गृह आधार योजनेचा लाभ दिला जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. ... Read More »

पुढील आठवड्यापासून राज्यातील रेल्वे स्थानकांवर कदंबची बससेवा

दंब वाहतूक महामंडळ करमळी, थिवी आणि मडगाव रेल्वे स्थानकावरून प्रवासी बससेवेची व्यवस्था पुढील आठवड्यापासून सुरू करणार आहे. दाबोळी विमानतळावरून वाहतूक करणार्‍या कदंबच्या बससेवेचा टप्पा टप्प्याने विस्तार केला जाणार आहे, अशी माहिती कदंब वाहतूक महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डेरीक नेटो यांनी काल दिली. मडगाव, करमळी, थिवी या प्रमुख रेल्वे स्टेशनवरून कदंब बससेवा सुरू करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. रेल्वेच्या वेळापत्रकानुसार बससेवा ... Read More »

गोवा फॉरवर्डची पुतळ्याची मागणी कायम : ट्रॉजन

वधानसभा संकुलात यापुढे कुणाचाही पुतळा उभारायचा नाही असा निर्णय भाजपने आपल्या गाभा समितीच्या बैठकीत घेतलेला असला तरी विधानसभा संकुलात जनमत कौलाचे हिरो जॅक सिक्वेरा यांचा पुतळा उभारण्यात यावा ही पर्रीकर सरकारातील एक घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्ड पक्षाची मागणी कायम आहे. पक्षाने ती सोडून दिली नसल्याचे गोवा फॉरवर्ड पक्षाचे मुख्य प्रवक्ते ट्रॉजन डिमेलो यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले. ... Read More »

गो गोवा नाऊ’ पोर्टलचे अनावरण

>> नवहिंद समुहाचा उपक्रम दैनिक नवप्रभाचे इंग्रजी भावंड असलेल्या ‘धी नवहिंद टाईम्स’ ह्या गोव्यातील आघाडीच्या व सर्वाधिक खपाच्या वृत्तपत्राने सेसेरपेु.लेा हे ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे. इंडिएन चेस ग्रॅण्डमास्टर व माजी जागतिक बुध्दीबळपटू व सध्याचे जागतिक वेगवान बुध्दीबळपटू विश्‍वनाथ आनंद यांच्या शुभहस्ते हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. ह्या पोर्टलमुळे पर्यटक तसेच गोव्यातील जनता यांना गोव्याविषयीची इत्यंभूत माहिती उपलब्ध होऊ ... Read More »

जायबंदी नदाल स्पर्धेबाहेर

अव्वल मानांकित राफेल नदाल याचे यंदाची ऑस्ट्रेलियन ओपन जिंकण्याचे स्वप्न भंग पावले आहे. उजव्या पायाच्या जांघेचा स्नायू दुखावल्यामुळे नदालला क्रोएशियाच्या मरिन चिलिच याच्याविरुद्धचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना अर्ध्यावरच सोडावा लागला. नदालने सामना सोडला त्यावेळी ३-६, ६-३, ६-७ (५), ६-२, २-० अशी स्थिती होती. पहिला व तिसरा सेट जिंकलेल्या नदालला दुसरा व चौथा सेट गमवावा लागला. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या खेळाडूने ग्रँडस्लॅम ... Read More »

कांगारू उपांत्य फेरीत

इंग्लंडचा ३१ धावांनी पराभव करत ऑस्ट्रेलियाने अंडर १९ क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. १२७ धावांचा यशस्वीपणे बचाव करताना ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा डाव ९६ धावांत संपवला. केवळ ३५ धावांत तब्बल ८ बळी घेणारा लेगस्पिनर लॉईड पोप सामन्याचा मानकरी ठरला. विजयासाठी १२८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने बिनबाद ४७ अशी मजल मारली होती. परम उप्पलने एक गडी बाद केला. तत्पूर्वी, इंग्लंडच्या ... Read More »

वास्कोवरील विजयासह धेंपो पुन्हा अव्वल स्थानी

ज्योकिम अब्रांचिस आणि सुरज हडकोणकर यांनी दुसर्‍या सत्रात नोंदविलेल्या गोलांच्या जोरावर धेंपो स्पोटर्‌‌स क्लबने वास्को स्पोटर्‌‌स क्लबचा २-० असा पराभव करीत गोवा फुटबॉल संघटना आयोजित गोवा प्रो-लीग फुटबॉल स्पर्धेच्या १२व्या फेरीतील सामन्यात पूर्ण गुणांची कमाई केली. या विजयामुळे धेंपो स्पोटर्‌‌स क्लबचे १० सामन्यांतून २४ गुण झाले असून ते गुणतक्त्यात अव्वल स्थानी पाहोचले आहेत. तर पराभूत वास्को स्पोटर्‌‌स क्लब ९ सामन्यांतून ... Read More »