ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: January 19, 2018

लाड पुरेत!

गोव्यातील पर्यटक टॅक्सी चालकांच्या मुजोरीविरोधात प्रथमच सरकार एवढ्या खमकेपणाने बंद मोडून काढण्यासाठी उभे राहिल्याचे काल दिसून आले. प्रत्येकवेळी या टॅक्सीवाल्यांच्या मागण्या घेऊन रदबदली करण्यासाठी मायकल लोबो, विजय सरदेसाई, चर्चिल आलेमाव वगैरे राजकारणी मंडळी पुढे होऊन आपापल्या मतपेढ्या सांभाळायची आणि सरकारही टॅक्सीवाल्यांना बाबापुता करीत राहायचे. जेवढ्या सवलती गोव्यात या टॅक्सीवाल्यांनी आजवर आपल्या पदरात पाडून घेतल्या आहेत, तेवढ्या कोणत्याही राज्याने दिलेल्या नाहीत. ... Read More »

लोकशाहीचा तिसरा स्तंभ धोक्यात!

शंभू भाऊ बांदेकर पुनश्‍च लोकशाहीचा तिसरा आधारस्तंभ धोक्यात येऊ पाहत आहे. यावेळचे म्हणणे तर सरन्यायाधीशांवरच बेतले आहे. न्यायदेवता आंधळी नाही, ती भारतीय लोकशाहीकडे डोळसपणे पाहत आहे, हे पटवून देण्यासाठी ठोस व महत्त्वपूर्ण भूमिका बजवावी लागेल. एखाद्या राजकीय पक्षातील नेत्याने किंवा कार्यकर्त्याने पत्रकार परिषद घेऊन आपल्या नेतृत्वावर गंभीर आरोप करून खळबळ माजवणे हे आता भारतीय लोकशाहीचे जणू अविभाज्य अंग होऊ लागले ... Read More »

आजच्या टॅक्सीवाल्यांच्या संपाला एस्मा लागू

सरकारने राज्यातील पर्यटक टॅक्सी चालकांच्या आजच्या संपाला एस्मा लागू केला आहे. गोवा अत्यावश्यक सेवा व्यवस्थापन कायदा १९८८ अर्तंगत ‘एस्मा’ लागू करण्यात आला असून प्रवासी व माल वाहतूक करणार्‍यांच्या संपावर बंदी घालण्यात आली आहे. सरकारी यंत्रणा पर्यटक टॅक्सी मालकांच्या संपामुळे निर्माण होणार्‍या परिस्थितीला समर्थपणे तोंड देण्यासाठी सज्ज झाली आहे. पर्यटक टॅक्सी मालकांच्या संपाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस ... Read More »

दोनापावलच्या अपघातात दोघे युवक जागीच ठार

दोनापावल येथे काल पहाटे ४.३० च्या सुमारास ट्रिपल सीट बसवून यामा मोटरसायकलवरून बेफाम वेगाने जाणार्‍यांनी सूचना फलकाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघा युवकांचे जागीच निधन झाले तर एक युवक गंभीर जखमी झाला आहे. अपघातात सापडलेले युवक मित्रा बाजार करंजाळे पणजी येथील रहिवाशी आहेत. या अपघातात रूफ आन्तोनियो वेल्हो (१६) आणि सोहेल शेख (१९) जागीच ठार झाले तर जेसबन पावलो सिक्वेरा ... Read More »

प्रदूषण नियंत्रणासाठी रिसाईक्लिंग उद्योगांना प्राधान्य हवे : विरेंद्र सिंग

देशातील पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रणासाठी रिसाइक्लिंग उद्योगांना प्राधान्यक्रम देण्याची गरज आहे. रिसाइक्लिंग उद्योगाला वेगळा खास दर्जा देऊन विशेष संरक्षण देण्याची गरज आहे. या उद्योगातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती शक्य आहे, असे प्रतिपादन केंद्रीय स्टीलमंत्री चौधरी विरेंद्र सिंग यांनी काल येथे केले. मॅटल रिसाईक्लिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या बांबोळी येथे आयोजित पाचव्या एमआरएआय आंतरराष्ट्रीय संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात केंद्रीय मंत्री सिंग बोलत ... Read More »

डॉ. सिक्वेरांच्या पुतळ्याबाबत सरकारचे नाटक ः कॉंग्रेस

म्हादई, कोळसा प्रदूषण, नद्यांचे राष्ट्रीयीकरण, कॅसिनो या मुख्य मुद्यांवरून नागरिकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारकडून डॉ. जॅक सिकेरांचा पुतळा उभारण्याचे नियोजनबध्द नाटक रचण्यात आले आहे, अशी टिका कॉँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत काल केली. राज्यातील आघाडी सरकारचे घटक असलेल्या गोवा फॉरवर्डचे नेते व मंत्री विजय सरदेसाई यांच्याकडून सिक्केरा यांचा पुतळा उभारण्याची मागणी केली जाते. आघाडी सरकारमधील ... Read More »

२१ राज्यांच्या खाण मंत्र्यांची आज पणजीत बैठक

देशातील एकवीस राज्यांतील खाणमंत्र्यांची बैठक केंद्रीय खाणमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या अध्यक्षतेखाली आज पणजीत घेण्यात येत आहे. या बैठकीत खनिज विषयक मुद्यांचा उहापोह करण्यात येणार आहे. या बैठकीत १९ राज्यातील खाण मंत्री उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. देशातील लिलाव पध्दतीची सद्यस्थिती या बैठकीतून समोर येणार आहे. तसेच यासाठी असलेले ऑनलाईन पोर्टल, मोबाईल ऍप, ट्रान्सपरन्सी, ऑक्शन मॉनिटरींग ऍँड रिसोर्स ... Read More »

‘न्यूड’ चित्रपटाला सेन्सॉरकडून लाभले ‘अ’ प्रमाणपत्र

गोव्यात गेल्या नोव्हेंबरमध्ये पार पडलेल्या ४८ व्या इफ्फी चित्रपट महोत्सवातून वगळण्यात आलेल्या ‘न्यूड’ या दिग्दर्शक रवी जाधव यांच्या मराठी चित्रपटाला सेन्सॉर बोर्डने कोणत्याही कटविना प्रमाणित केले आहे. या चित्रपटाला ‘अ’ प्रमाणपत्र मिळाले आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ‘न्यूड’ चित्रपट इफ्फीत दाखवला जाणार होता. मात्र अंतिम यादीतून नंतर त्याला वगळण्याचा निर्णय केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने घेतला होता. महोत्सवाच्या परीक्षकांना कोणतीही माहिती न ... Read More »

‘पद्मावत’ चित्रपटावरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली

प्रदर्शनाअधीच वादाचा केंद्रबिंदू ठरलेल्या ‘पद्मावत’ या चित्रपटाच्या येत्या २५ रोजीपासूनच्या प्रदर्शनाचा मार्ग काल सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशामुळे मोकळा झाला. या न्यायालयाने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर चार राज्यांनी घातलेल्या बंदी आदेशाला स्थगिती दिली. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने अन्य राज्यांमध्येही या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यावर निर्बंध घातला आहे. न्या. ए. एम. खानविलकर व न्या. डी. वाय. चंद्रचूड यांचा या खंडपीठावर समावेश ... Read More »

वावरिंका, मुगुरुझा स्पर्धेबाहेर

ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत धक्कादायक निकालांची मालिका गुरुवारीदेखील कायम राहिली. पुरुष एकेरीत नववा मानांकित स्टॅन वावरिंका, सातवा मानांकित डेव्हिड गॉफिन यांच्यासह सॅम क्वेरी (१३) यांना दुसर्‍या फेरीतील पराजयासह स्पर्धेबाहेरचा रस्ता धरावा लागला. महिला एकेरीत जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांमध्ये स्थान मिळालेल्या स्पेनच्या तृतीय मानांकित गार्बिन मुगुरुझा हिला ‘पॅकअप’ करावे लागले. जागतिक क्रमवारीत ९७व्या स्थानी असलेल्या अमेरिकेच्या टेनिज सँडग्रेन याने स्वित्झर्लंडच्या वावरिंका याला ... Read More »